आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धचंद्राकृती पुष्परचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साहित्य— २, ३ किंवा ५ अर्धगोलाकार फांद्या नीट निवडून घ्याव्यात, त्या अर्धगोल साधण्यासाठी वापराव्या. मध्यभागी लावण्यासाठी ३ ते ५ किंवा अधिक फांद्या घ्याव्या. रचनेच्या आकारानुसार सुंदर फुले. गुलाब, जरबेरा, झेंडू, शेवंती, कमळ किंवा आॅर्किड इत्यादी फुले वापरतात. गरज पडल्यास फांद्यांना एकमेकांना बांधण्यासाठी हिरव्या रंगाचा दोरा किंवा रबरबँड, पिनहोल्डर, ओअॅसिस किंवा चिकन मेश, ते झाकण्यासाठी काचेच्या गोट्या किंवा दगड.
पात्र— गोल, अंडाकृती कमी उंचीचे, ताम्हण किंवा त्यासारखे साधारण सपाट अथवा मध्यम उंचीचे पात्र वापरतात.
कृती— अर्धगोल साधण्यासाठी लावण्यात येणाऱ्या मुख्य फांद्या गोलाकार बाक असलेल्या निवडाव्या, अथवा दोऱ्याने थोडे बांधून किंवा वाकवून बाक द्यावा. त्या फांद्या एकाच जातीच्या असाव्या. अर्धगोलाच्या एका बाजूला मोठी फांदी लावतात, ती साधारणपणे पात्राच्या दीडपट उंचीचीच निवडतात व दुसऱ्या विरुध्द बाजूला लावण्यात येणारी फांदी थोडी लहान निवडतात. अशा तऱ्हेने चंद्रकोर साधतात. निशिगंध, ग्लॅडिओला, आॅर्किड यांसारख्या फुलांच्या किंवा इतर झाडांच्या खाली जाड व टोकाशी निमुळत्या होत जाणाऱ्या फांद्या निवडतात. मध्यभागी हवी तशी योग्य आकाराची फुले खोचतात. अशी ही रचना मध्यभागी जाड व टोकाकडे चंद्रकोरीप्रमाणे निमुळती होत जाते. द्वितीयेची बारीक किंवा अष्टमीची जाडसर चंद्रकोर साधता येते. पिनहोल्डर झाकण्यासाठी गोल्डन रॉड, अॅस्परॅगस यांसारख्या वनस्पतींच्या छोट्या फांद्या वापरल्या तरी चालतात. डायनिंग टेबल किंवा बैठकीत एका बाजूला छोट्या टेबलावर जागेची रंगसंगती लक्षात घेऊन ही रचना ठेवता येते.
बातम्या आणखी आहेत...