आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Jayant Choudhari Article About Flower Structure

पुष्‍परचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्रजी S रचनेत तिच्या नावाप्रमाणेच पुष्पपात्रात पाने व फुले रचतात. जर या S रचनेला एससारखेच पण कमी गोलाकार फांद्या वापरून केले तर ती लेझी एस (lazy S) रचना तयार होते. तिला “होगार्थ” या चित्रकाराच्या नावावरून “होगार्थ वाक” रचना (The Hogarth Curve) असे म्हटले जाते. या रचनेत गोलाकार तसेच रेखीव फांद्या वापरतात म्हणजे एस आकार सुबक दिसतो.
पुष्पपात्र : नेहमी उंच पुष्पपात्रच वापरतात कारण त्यातच S आकार शोभून दिसतो. उंच मानेचे अरुंद तोंडाचे असल्यास उत्तम.
पिनहोल्डरपेक्षा चिकन मेश वापरतात किंवा फुलझडीच्या तारांसारख्या बारिक तारांचा गोळा बनवून तो पुष्पपात्रात बसवतात व त्यात फुले खोचतात. रचना पूर्ण झाल्यावर तार किंवा चिकनमेश दिसू नये याची काळजी घेतली जाते.
साहित्य : S आकार बनण्यासाठी एकाच जातीच्या दोन सुंदर गोलाकार असलेल्या फांद्या. केंद्रबिंदूला लावण्यासाठी रचनेच्या आकारानुसार ३, ४, किंवा ५ अशी सुंदर गुलाब, शेवंती, जर्बेरा, अॅस्टर अथवा कार्नेशनची कमी अधिक उंचीची फुले एकमेकांशी सुसंगत दिसतील अशा तऱ्हेने खोचावी. चिमूटभर साखर, मीठ घालून पात्रात पाणी घालून रचनेला सुरुवात करावी.
कृती :
पुष्पपात्राच्या उजवीकडे व डावीकडे वाक असलेल्या दोन मुख्य फांद्या निवडा. एस आकाराचा वरचा अर्धा भाग बनवण्यासाठी जी फांदी वापरतात ती मुख्य फांदी धरली जाते. तिचा वर दिसणारा भाग पात्राच्या उंचीच्या दीडपट असावा लागतो. तिला पुष्पपात्रातील चिकन मेशमध्ये उभे किंवा थोडे तिरपे खोचतात.
दुसरी फांदी पहिलीपेक्षा थोडी लहान उंचीची पण पहिल्या फांदीच्या विरुद्ध दिशेला वाक असलेली निवडतात. एस अाकाराचा खालचा अर्धा भाग बनवण्यासाठी ती वापरतात. पहिल्या फांदीशी व्यवस्थितपणे सुसंगती साधून दुसरी फांदी खोचावी. जेथे या दोन्ही फांद्या लावल्या तो रचनेचा केंद्रबिंदू असतो. तेथे ताजी, मोहक फुले किंवा इक्झोरा (ixora) सारख्या फुलांचा एक गुच्छ किंवा दोनतीन गुच्छ रचनेच्या आकारानुसार लावावेत.
रचना उंच असल्यामुळे तिला ठेवण्यासाठी खोलीचा कोपरा निवडावा किंवा धक्का लागणार नाही अशा ठिकाणी भिंतीच्या जवळ ठेवावे.
drjayantipc@gmail.com