आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Anik Khadake Article About Oxinium Knee Surgery Performed In Jalgaon

नवे संशोधन ऑॅक्झिनियम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अस्थिविकार उपचार व शल्यचिकित्सेसाठी आवश्यक असणाऱ्या तसेच मानवाच्या शारीरिक रचनेस सुसंगत कृत्रिम सांधेनिर्मितीमध्ये ऑक्झिनियमचा उपयोग फायदेशीर असल्याचे दिसून आले. यावर अधिक संशोधन होऊन नवीन पद्धतीने सांधेनिर्मिती सुरू झाली.

सांधे-गुडघे प्रत्यारोपणातील उपचार
सध्याच्या काळात गुडघेदुखीचे प्रमाण खूपच वाढले आहे. ज्येष्ठ नागरिक, स्त्रिया तसेच व्यंग असणारे अचानक गुडघे क्षतिग्रस्त झालेली कमी वयाची मुले व तरुण रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. प्राथमिक अवस्थेतील गुडघेदुखीकडे दुर्लक्ष केले म्हणजे गुडघेदुखी गंभीर रूप धारण करते. गुडघेदुखीवर अनेकांगी उपचार शक्य आहेत.

कृत्रिम सांधेनिर्मितीमध्ये ऑक्झिनियमचा उपयोग अत्यंत फायदेशीर: कृत्रिम सांधे तयार करताना कोबाल्ट-क्रोम या मिश्रधातूचा उपयोग होतो. प्रगत वैद्यकीय संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कृत्रिम सांधेनिर्मिती क्षेत्रात वेगाने प्रगती होत आहे. संपूर्ण सांधा किंवा त्याच्या भागांचे प्रत्यारोपण अत्यंत सुलभरीतीने व परिणामकारक व्हावे म्हणून नवनवीन पद्धतींनी दर्जेदार उत्पादने निर्माण केली जात आहेत. अस्थिविकार उपचार व शल्यचिकित्सेसाठी आवश्यक असणाऱ्या तसेच मानवाच्या शारीरिक रचनेस सुसंगत कृत्रिम सांधेनिर्मितीमध्ये ऑॅक्झिनियमचा उपयोग फायदेशीर असल्याचेदिसून आले. यावर अधिक संशोधन होऊन नवीन पद्धतीने सांधेनिर्मिती सुरू झाली.


झिरकॉन धातूचा अंतर्भाव : कोबाल्ट क्रोमपासून तयार केलेल्या सांध्यांच्या तुलनेत आक्झिनियमचे सांधे अधिक प्रभावी असल्याचे दिसून आले. ऑॅक्झिनियम सांधे तयार करताना सांध्याच्या पृष्ठभागावर झिरकॉन धातूचा अंतर्भाव करतात. या प्रक्रियेत झिर्कोनियमच्या बाह्यस्तराचे सिरॅमिकमध्ये रूपांतर केले जाते. झिरकॉन खनिज सिरॅमिकसोबत असल्याने त्यात ऑक्सिजन शोषला जाऊन घर्षणाची तीव्रता कमी होते. धातूवर सिरॅमिक पृष्ठभाग वापरल्याने चरे किंवा खाचा पडण्यास प्रतिबंध होतो. या पृष्ठभागावर हाय डेन्सिटी पॉलिथीनचे भाग जोडून उत्पादित लवचिक, एकसंध परंतु मजबूत असा ऑक्झिनियम पदार्थ कोबाल्ट-क्रोमच्या तुलनेत सुमारे साडेचार हजार पटींत सक्षम होतो. यापासून दीर्घकाळ टिकणारे सांध्यांचे भाग तयार करता येतात.

अस्थिविकारांवरील उपचारतंत्र : कमी वयातील रुग्णांच्या शारीरिक वाढीचा वेग ज्येष्ठ व्यक्तींच्या तुलनेत अधिक असतो. वाढता भार व जलद हालचालींमुळे अस्थिरोपणानंतर पॅटेलोफमारल, कॉम्पोनन्ट फेल्युअर, बंध सैल होणे, अशा अडचणींची शक्यता वाढते. या सर्व बाबी विचारात घेता दीर्घकाळ टिकाऊ, किमान घर्षणांक, अत्यंत लवचिक व तितकाच मजबूत, कमाल कोनात सहज फाकण्याचे वैशिष्ट्य असणाऱ्या रुग्णांवर कृत्रिम सांधेरोपण करताना ऑक्झिनियम प्रकारच्या सांध्यांचा उपयोग करणे अधिक योग्य ठरू शकते. वैद्यकशास्त्रात अविरत संशोधन सुरू असते. नवनवीन तंत्रज्ञानाची अखंडित भर पडतच असते. कृत्रिम सांधेरोपण व एकूणच अस्थिविकारांवरील उपचारतंत्र त्यास अपवाद नाही. यादृष्टीने विचार करता आजमितीस ऑक्झिनियमपासून िनर्मित कृत्रिम सांधे हे त्यातले नवीनतम संशोधन आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरू नये.
(लेखक हे गुडघे प्रत्यारोपणतज्ज्ञ आहेत)