आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रॉनिक किडनी फेल्युअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीआरएफ (मूत्रपिंडाचे) अकार्यक्षमतेमुळे रक्तातील पोटॅशियम, क्रिएटिनाइन, सेरम, सोडियम, युरिया या घटकांतील रक्तातील विसंगती दर्शवतात. लक्षणस्वरूपात मळमळ, उलटी, पोटदुखी, घाबरणे, सूज, रक्ताल्पता, चक्कर, अतिशय थकवा, चिडचिड या सर्वांनी रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक मरणयातना भोगतात. अतिशय खर्चिक ठरणारा हा आजार आहे.

मूत्रपिंडाचा दीर्घकालीन आजार
उपचारासाठी किचकट, कष्टाने साध्य होणारा तसेच रुग्ण, नातेवाईक व वैद्य (डॉक्टर) यांची परीक्षा घेणारा हा आजार. रुग्ण लवकर आयुर्वेदाकडे आल्यास कमी काळात दुरुस्त होणारा, खूप जास्त औषधोपचार करून थकलेला, डायलिसिससारखा पर्याय वापरूनही साध्य न होणारा. बरा करण्यास कठीण पण रुग्ण-नातेवाईक यांनी आयुर्वेदिक औषधोपचार व वारंवार पंचकर्मासोबत नेटाने पथ्य पालन केल्यास बरा होऊ शकतो, असे अनुभव सांगतात.

मूत्रपिंडाचा हा आजार किंवा दीर्घकालीन आजार हे मूत्रपिंडाची कमी होत जाणारी कार्यक्षम दर्शवते. सुरुवात कुठल्याही आजारासाठी केलेल्या दीर्घकालीन आधुनिक औषधोपचार किंवा छोट्या आजारासाठी घेतले जाणारे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतले जाणारे दीर्घकालीन औषधोपचार, व्यसनाधीनता, जागरण आणि इतर कारणे.

सीआरएफ (मूत्रपिंडाचे) अकार्यक्षमतेमुळे रक्तातील पोटॅशियम, क्रिएटिनाइन, सेरम, सोडियम, युरिया या घटकांतील रक्तातील विसंगती दर्शवतात. लक्षणस्वरूपात मळमळ, उलटी, पोटदुखी, घाबरणे, सूज, रक्ताल्पता, चक्कर, अतिशय थकवा, चिडचिड या सर्वांनी रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक मरणयातना भोगतात. आधुनिक वैद्यकशास्त्रात अतिशय खर्चिक ठरणारा हा आजार आयुर्वेदाच्या कक्षेतून पाहिल्यास मूत्रकृच्छ या निदानांतर्गत घेता येईल. रुग्णाची अवस्था, वय, लक्षणे व रुग्ण-नातेवाइकांची जिद्द या जोरावर हा आजार आयुर्वेद पद्धतीने बरा करता
येऊ शकतो.

आजार कसा घडतो आणि बिघडतो?
सतत चुकीचा औषधोपचार किंवा विविध आजारांसाठी घेतली जाणारी औषधे. सततची बदलत जाणारी दिनचर्या, खानपान, व्यायामाचा अभाव, जागरण, मलावरोध या कारणांनी रक्तधातूवर परिणाम होतो. पचनातील विविध तक्रारी प्रथमदर्शनी दिसायला लागतात. त्याकडे रुग्णांचे दुर्लक्ष होऊन रुग्णांची दिनचर्या चालूच असते. यांचे परिणामी मूत्रपिंडाची कार्यक्षमता व रक्तातील सेरम क्रिएटिनाइन, सेरम सोडियम, सेरम पोटॅशियम याचे प्रमाण विसंगत होते. यात सेरम क्रिएटिनाइन हे मूत्रपिंडाची अकार्यक्षमता दर्शवते. साधारणत: या आजाराचे निदान हे कुठल्यातरी इतर आजारासोबत जसे मधुमेह, उच्च रक्तदाब, दीर्घकालीन ताप किंवा इतर दीर्घकालीन औषधांचे आजार चालू असताना किंवा त्यानंतरच्या दुष्परिणाम स्वरूप केवळ मूत्रपिंडाचाच आजार आहे व इतर कुठलाही आजार नाही, असे रुग्ण कमी आढळतात. काही रुग्णांमध्ये जन्मजात मूत्रपिंड विकृती असू शकते, या कारणांसाठी आयुर्वेदात वेगळे औषधोपचार आहेत. त्याचे वेगळे विस्तृत वर्णन करता येईल.

औषधोपचार आयुर्वेदिक दृष्टिकोनातून
आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार रक्ताची विसंगती दूर करणारी किंवा तसा प्रयत्न करणारी औषधे आणि डायलिसिससारखी प्रदीर्घ चालणारी खर्चिक त्रासदायक व दिलासा न देणारी उपचारपद्धती. सरतेशेवटी किडनी प्रत्यारोपणाचा पर्याय वापरणे, तोही अतिशय किचकट सामान्य रुग्णाला न परवडणारा. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून रुग्णाचे वय, आजाराचे स्वरूप, लक्षणे, अवस्था, मूत्रपिंडाची स्थिती म्हणजेच रोग आणि रुग्ण यांचे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून योग्य निदान करून औषधोपचार करणे.

औषध व पंचकर्माचे योग्य नियोजन
आजार घडण्यामागचा नेमका कार्यकारणभाव समजून त्यानुसार औषध व पंचकर्माचे योग्य नियोजन, सोबतच रुग्णाला दिली जाणारी खानपानातील पथ्ये यांचे योग्य पालन, रुग्ण व नातेवाईक यातील सातत्यपूर्ण विश्वासाने कमी काळात रुग्ण बरा होऊ शकतो. तसेच रुग्ण नवीन असल्यास खूप लवकर आयुर्वेदाकडे आला असता लवकर बरा होतो. खूप उशिरा किंवा डायलिसिससारखा पर्याय वापरून आलेला रुग्ण बरा होण्यास थोडा वेळ लागतो. संपूर्ण विश्वासाने व सातत्याने केलेले औषधोपचार व पंचकर्मे या शोधन चिकित्सेने आजार बरे करणे साध्य होऊ शकते.