आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जलचरांचे रंगढंग!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रंग आणि गंधात संकेत दडलेले असतात. हे केवळ मनुष्यप्राण्यांत नव्हे जलचरांमध्येही आढळते. किट्ल फिशसारखा मासा तर परिस्थितीनुरूप रंगबदलाची कियमा साधतो…
कटल मासा चमकदार सफेद झेब्रा रंगाचा अवलंब मादीला मोहित करण्यासाठी करतो. हा रंग त्याचा मिलन संकेतच असतो. दुसऱ्या एखाद्या नर कटलशी झुंज द्यायला तयार आहोत, हा संदेशही याच रंगाद्वारे दिला जातो.

गंध हा रसायनाशी निगडित गुणधर्म आहे. ध्वनी हा भौतिक गुणधर्म आहे. तसेच प्रकाश आणि आर्द्रताही भौतिक गुणधर्म आहेत. प्रकाश ही उत्तेजित करणारी (Stimulus) प्रेरणा आहे. उत्तेजकापासून दूर किंवा उत्तेजकाकडे आकर्षणारं वर्तन taxis म्हणून ओळखलं जातं. आकर्षण हे Positive phototaxis म्हणून गणलं जातं. अर्थातच, दुरावा हे निगेटिव्ह असतं. या प्रतिक्षिप्त क्रिया तत्काळ साधल्या जातात. विणीच्या हंगामात दिवस प्रकाशमान होत असताना काही पक्षी आपली अंडी आपल्या पोटाखाली घेतात. काही प्राण्यांच्या बाबतीत उत्तेजक महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी पाव्होलोव्हच्या कुत्र्याचं उदाहरण दिलं जातं. ठरावीक तऱ्हेची घंटी वाजली की, कुत्र्यात भुकेची भावना तीव्र होते. ग्रे गीज पक्ष्यांचा अभ्यास करताना लॉरेंझ या शास्त्रज्ञाला एक आगळी गोष्ट ध्यानात आली. ही पिल्लं आपल्या पालकांच्या मागोमाग न जाता, माणसाच्या पावलांमागं जातात. हा उत्तेजकतेचा प्रकार समजला जातो. खूरयुक्त जनावरांच्या पिलांच्या बाबतीत त्यांना सावलीची जाणीव होते, तेव्हा दूध पिण्याच्या अपेक्षेने ती पिल्लं मान उंचावतात. पक्ष्यांच्या बाबतीतही असंच घडतं. घरट्यावर जेव्हा कसली तरी सावली पडते, तेव्हा पिल्लं चोची रुंदावतात.

स्पर्श तथा इतर ज्ञानेंद्रियांशीही अॅपिजमेंट्स निगडित आहेत. मार्जार कुळातील सर्व पिल्लं (सिंहाचे छावे, वाघाचे बछडे, मांजरीची पिल्लं इ.) त्यांच्या तोंडास आईच्या केसांचा स्पर्श होताच दूध पिण्यास सुरुवात करतात. ट्री पायथन हा अजगर. याचे स्पर्शेंद्रिय चांगलंच तीक्ष्ण असतं. सावजाच्या शारीरिक उष्णतेवरून तो त्याची शिकार करू शकतो. तर स्ली स्लेटरसारखा प्राणी आर्द्रतेशी संवेदनशील असतो.

रंग हे गुणवैशिष्ट्य रसायनाशी निगडित आहे. काही प्राणी रंग गुणधर्माचा वापर अॅपिजमेंटमध्ये करतात. ऑक्टोपस, स्व्कीड, कटल फिश (Cuttle fish) या जलचरांना निसर्गाने रंगीत शाईच बहाल केली आहे. कट्ल फिशचा रंगोत्सव चांगलाच रंजक आहे. कट्ल फिश साधारणपणे १० कि.ग्रॅ. वजनाचा आणि दीड मीटर लांबीचा जलचर. जगातील बहुतेक सर्व समुद्रांत आढळतो. कटललाही ऑक्टोपसप्रमाणं आठ पाय असतात. डोळे भले मोठे असतात. राजकारणात दलबदलू ‘प्राणी’ असतात, तसा हा रंगबदलू. याचं शरीर (त्वचा) फ्लॅशिंग म्हणजे चकाकणाऱ्या रंगांचं असतं. स्व्कीड आणि ऑक्टोपसप्रमाणं या चकाकीचा उपयोग ते झुंजताना वा मिलन समयी करतात.

कटल मासा रंग बदलू शकतो. त्यामुळं हा समुद्र सरडा म्हणूनही ओळखला जातो. पिवळा, लाल, तपकिरी, काळा अशा रंगांचे पिगमेंट क्रोमोफोरस त्याच्या शरीरात असतात. १ चौ.मि.मी. क्षेत्रात सुमारे २०० पिगमेंट सेल्स असतात. याचे मूड‌्स बदललेल्या रंगांशी निगडित असतात. शार्क, इतर मोठे मासे; एवढंच काय, मोठे कटल्सही लहान कटल्सची शिकार करतात. या शिकाऱ्यांना फसवण्यासाठी रंगबदल त्यांच्या कामी येतात. मुख्य म्हणजे, या रंग किमयेद्वारे मिलनास्तव ते मादीला आकृष्ट करतात. चमकदार सफेद झेब्रा रंगाचा अवलंब माद्यांना मोहित करण्यासाठी करतात. हा रंग त्यांचा मिलन संकेतच असतो. दुसऱ्या एखाद्या नर कटलशी झुंज द्यायला तयार आहोत, हा संदेशही याच रंगाद्वारे दिला जातो. झुंजीतून माघार घ्यायची झाल्यास, नर शरीरातून रंगीत शाई बाहेर सोडतो. (स्व्कीडच्या बाबतीतदेखील हेच पांढरं निशाण असतं.) उगीच दोघांचीही शक्ती वाया जायला नको. ‘मी दुसरीकडे जमलं तर बघतो’, हा संदेश या शाईवहनात असतो. काही नर कटल मासे तर दादा कटलना फसवण्यासाठी आपला रंग मादीसारखाच बनवतात. त्यामुळे त्यांची शिकार करण्याच्या तयारीत असलेल्या मोठ्या कटल माशांची फसगत होते. (मादीशी झुंज थोडीच द्यायची असते?) मादीला एक पाय कमी असतो. नराने आपला एक पाय दुमडून घेतला की तो मादीच असल्याचा इतर जलचरांचा गैरसमज होतो.

दोन कटल नरांची शारीरिक झुंज अशी नसतेच. एकमेकांना घाबरवण्याचा प्रयत्न ते करत असतात (पैलवानांच्यात होणारी खडाखडी). झुंजीत जिंकलेला नर लगेच मादीशी सहगमनासाठी तयार होतो. त्याच्या खास सोंडेद्वारे तो मादीला पकडून ठेवतो. नर-मादीची तोंडं एकमेकांसमोर येतात. नर आपली वीर्य पिशवी मादीच्या तोंडात सारतो. मिलन झाल्यानंतर काही तासांतच मादी अंडी टाकायला सुरुवात करते. अंडी टाकेपर्यंत नर मादीची काळजी घेत असतो, तिचं संरक्षण करत असतो. एका वेळी सुमारे २०० अंडी ती घालते. नर ती अंडी उशीच्या आकाराच्या बळकट कवचांमध्ये ठेवतो. काही नर शरीरातील शाईने ही कवचं रंगवतातही. १९ दिवसांनंतर पिल्लं बाहेर येतात. ती सुमारे १ सें.मी. लांबीची असतात. तथापि अंडी टाकल्यानंतर मादी मरण पावते. त्यामुळेच कटल फिशमध्ये ५ ते १० नरांमागे १ मादी, हे प्रमाण असतं. तिची काळजी घेणं ही नराची जबाबदारी असते.

भूक अथवा इतर गोष्टींची जाणीव पालकांना करून देण्यासाठीही अॅपीजमेंटचा वापर होतो. निम्नस्तरीय तथा विकसित प्राण्यांच्या पिल्लांत ही वृत्ती जन्मजात असते. ती निसर्ग देणगीच आहे. त्याशिवाय पिल्लं जगूच शकणार नाहीत. साऱ्या सस्तन पिलांना दूध कसं चाखावं, हे ज्ञान जन्मजात असतं. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या पिलांना पालकाने घास भरवावा, यासाठी तोंड उघडण्याचं ठाऊक असतं. पक्ष्यांची पिल्लं आपल्या चोची चांगल्या रुंद उघडतात. काही काही वेळा कलकलाटही करतात. पालक समजतात, पिल्लाला भूक लागली. भूक लागली की माणूस अगर इतर सस्तन प्राण्यांची बालकं असाच रडून आकांत करतात. ही तंत्रं Threat displays म्हणून ओळखली जातात. ती आक्रमक समजली जातात.
eknathjosh@gmail.com
बातम्या आणखी आहेत...