आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटी लागी जीवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नामदेव, ज्ञानदेवांनी केलेल्या तीर्थयात्रेमुळे त्यांना समाजातील सर्वच स्तरांतील लाेकांचे सूक्ष्म निरीक्षण त्यांना करता अाले. तत्कालीन समाजात भक्ती करण्याचे जटिल मार्ग हाेते. यज्ञयागादीचं जसं प्राबल्य हाेतं त्याचप्रमाणे व्रतवैकल्ये अाणि कर्मकांड यांचेही. हे हेमाद्रिपंडितांच्या ‘चतुर्वर्ग-चिंतामणी’ या ग्रंथावरून त्याचप्रमाणे मु. ग. पानसे यांच्या ‘यादवकालीन महाराष्ट्र’ या ग्रंथावरून अापल्याला लक्षात येतं.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात तेरावे शतक हे अत्यंत महत्त्वाचं अाहे. कारण या कालातील काही धर्मसंप्रदायांनी याच काळामध्ये या इतिहासाला फार वेगळं वळण दिलं अाणि त्यामुळे त्याचा फार माेठा परिणाम पुढच्या सात-अाठ दशकांवर झाला. तेराव्या शतकात महाराष्ट्रात नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय अाणि वारकरी संप्रदाय हे प्रमुख तीन धर्म संप्रदाय हाेतेे. त्यापैकी नाथ अाणि वारकरी संप्रदायांची परंपरा फार प्राचीन अाहे. नाथ संप्रदायाचा प्रसार उत्तर भारतातही त्या अाधीच्या काळापासून हाेता तर वारकरी संप्रदायाचा उगम पुंडलिकाच्या काळापासून झाला. पांडुरंग प्रत्यक्ष पुंडलिकाच्या घरी अाला त्याकाळाचा उल्लेख ‘युगे अठ्ठावीस
विटेवरी उभा’ असा केला जाताे. संत नामदेवांनी पांडुरंगाच्या मुखातूनच या प्रसंगाचं असं वर्णन केलं अाहे. पांडुरंग म्हणतात,
युगे झाली अठ्ठावीस । अजुनही न म्हणसी बैस ।।
यावरून हा काळ फार पुरातन असावा, एवढंच फार तर म्हणता येईल. पण त्या अाधारे शतकाचा उल्लेख करता येत नाही. संत ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत हे वैष्णव हाेते व ते वारीला जात असत म्हणजे घराण्याच्या परंपरेत ते वैष्णव वारकरी हाेते. तर ज्ञानदेवादी भावंडं गुरूपरंपरेनं नाथ सांप्रदायिक हाेती. शैव अाणि वैष्णव यांच्यामध्ये यादव काळात असलेले संघर्ष टाळण्यासाठी ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत हरिहरैक्याची भूमिका दिली. समतावादी भूमिका घेऊन समाजातील सर्व जातीपातींच्या लाेकांना वारकरी संप्रदायाच्या छत्राखाली एकत्र अाणलं. त्यामुळे गाेराकुंभार, सावतामाळी, सेना महाराज, नरहरी महाराज साेनार यांसारखी वेगवेगळ्या जातीतील संतमंडळीही या संप्रदयाचं नेतृत्व करायला पुढे अाली. त्यानंतर चाेखाेबा, बंका महाराज, कूर्ममेळा यासारखे संत अाणि मुक्ताबाई, साेयरामाई, जनाबाई, निर्मळा यासारख्या स्त्री संतही वारकरी संप्रदायात अाल्या.
अशा प्रकारे वारकरी संप्रदायानं यादव काळात म्हणजे तेराव्या शतकात भक्ती करून मुक्ती प्राप्त करण्याचा मार्ग माेकळा केल्यानं वारकरी संप्रदायाची परंपरा मुळात पुरातन असली तरी खऱ्या अर्थानं ज्ञानदेव, नामदेवांच्या काळात त्यांच्या प्रेरणेनंच यादवकाळात वारकरी, संप्रदायाला नवा उजाळा मिळाला, नवं रूप प्राप्त झालं. त्यात नवचैतन्य अालं त्याला नवी संजीवनी लाभली. त्याचप्रमाणे नामदेव, ज्ञानदेवांनी केलेल्या तीर्थयात्रेमुळं त्यांना समाजातील सर्वच स्तरांतील लाेकांचं सूक्ष्म निरीक्षण करता अालं. हे चतुर्वर्ग-चिंतामणी, यादवकालीन महाराष्ट्र या ग्रंथांवरून दिसते. अाषाढी नि कार्तिकी या दाेन्ही वाऱ्यांत गेल्या अाठ दशकांत असंख्य वारकऱ्यांची मांदियाळी विठूचरणी येते. ध्यास नि ही अास भेटी लागी जीवा लागलीसे अास हीच असते की नाही?
- लेखक ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक आहेत.
बातम्या आणखी आहेत...