आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिन: समाजाभिमूख संशोधनाचा वसा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९७१ मध्ये विद्यापीठात प्रा. गं. बा. सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठी स्तोत्रवाङ््मय’ या विषयावरील पहिला प्रबंध सादर झाला. त्यानंतर विभागात अनेक साहित्यिक, साहित्यप्रकार, रचनाप्रकार यांच्यावर संशोधन झाले आहे. डॉ. स. गं. मालशे, डॉ. भीमराव कुलकर्णी, डॉ. मीना जोशी, डॉ. चंद्रकांत वर्तक, डॉ. विजया राजाध्यक्ष, डॉ. अनंत देशमुख, डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे अशा अनेक मार्गदर्शकांचे मार्गदर्शन विद्यार्थिनींना मिळाले आहे...
 
५ जुलै १९१५ रोजी सुरू झालेल्या श्रीमती ना. दा. ठाकरसी उर्फ एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठामध्ये मराठी हा विषय  प्रारंभापासूनच शिकवला जात होता. मराठीतील थोर तत्वज्ञ साहित्यिक वामन मल्हार जोशी हे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे सहकारी होते. पुढे १९५६ मध्ये पदव्युत्तर मराठी विभाग सुरू झाला, तेव्हापासून आजपर्यंत पदव्युत्तर अभ्यास आणि संशोधन विभागात सुरू आहे.

१९७१ मध्ये विद्यापीठात प्रा. गं. बा. सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठी स्तोत्रवाङ््मय’ या विषयावरील पहिला प्रबंध सादर झाला. त्यानंतर विभागात अनेक साहित्यिक, साहित्यप्रकार, रचनाप्रकार यांच्यावर संशोधन झाले आहे. डॉ. स. गं. मालशे, डॉ. भीमराव कुलकर्णी, डॉ. मीना जोशी, डॉ. चंद्रकांत वर्तक, डॉ. विजया राजाध्यक्ष, डॉ. अनंत देशमुख, डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे अशा अनेक मार्गदर्शकांचे मार्गदर्शन विद्यार्थिनींना मिळाले आहे.

सध्या विभागामध्ये १५ विद्यार्थिनींचे पीएच.डी.करिता संशोधन सुरू आहे. विद्यार्थिनींना संशोधनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांची पूर्वतयारी चांगली व्हावी या हेतूने एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाने एम.ए.च्या अभ्यासक्रमात संशोधन विषयाच्या तीन अभ्यासपत्रिकांचा समावेश केला आहे. संशोधन प्रक्रियेविषयीचा तत्वविचार विद्यार्थिनी दुसऱ्या सत्रात शिकतात. तिसऱ्या सत्रात त्या प्रक्रियेचे उपयोजन करायचे असते आणि चवथ्या सत्रात त्यांना प्रबंधिका सादर करायची असते. एम.फिल. व पीएच.डी. पदवीकरिता जी संशोधन प्रक्रिया राबवली जाते ती या विद्यार्थिनी एम.ए. करतानाच आत्मसात करतात. त्यामुळे त्यापुढे जेव्हा एम. फिल वा पीएच.डी करण्यासाठी येतात तेव्हा त्यांचा दृष्टिकोन तयार असल्यामुळे विषयाच्या निवडीपासून सूची, ग्रंथालयाचा वापर, टिपणी इ. बाबतीत त्यांची तयारी दिसून येते.

सध्या विभागात गझल, गीतकाव्य, रूपककथा या साहित्यप्रकारांवर आणि भालचंद्र नेमाडे, द. मा. मिरासदार, प्रतिमा इंगोले यांसारखे लेखक आणि ना. घ. देशपांडे, ना. धों. महानोर यासारखे कवी यांच्या साहित्यकृतींवर संशोधन सुरू आहे. या शिवाय वि.दा. सावरकर आणि नरेंद्र दाभोळकर यांसारख्या विचारवंत साहित्यिकांवरही संशोधनपर कार्य सुरू आहे.

(मराठी विभागप्रमुख, एस.एन.डी.टी. विद्यापीठ मुंबई )
Aruna.dubhashi@gmail.com
बातम्या आणखी आहेत...