आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवादाचे पारंपरिक माध्यम बदलले, राजकीय पक्षांवरील विश्वास घटला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
-इंटरनेटचा प्रभाव अाणि परिणाम 
मागच्या दाेन दशकांमध्ये अमेरिकेतील दाेन प्रमुख पक्ष दुबळे बनले. त्यामुळे नागरिकांच्या हितरक्षणाकडे कमालीचे दुर्लक्ष हाेत अाहे. न्यूयाॅर्क विद्यापीठातील विधी शाखेचे प्राेफेसर सॅम्युअल इसाक्राॅफ यांनी राजकीय पक्षांवर शाेधनिबंध तयार केला अाहे, ज्यामध्ये त्यांनी २०१६ मध्ये इंटरनेटमुळे राजकीय पक्षांच्या घटलेल्या लाेकप्रियतेची कारणमीमांसा केली अाहे. त्यात प्राेफेसर इसाक्राॅफ म्हणतात, असा काेणताही पक्ष नाही, ज्याकडे पक्षांतर्गत उणिवा किंवा त्रुटी दूर करण्याचे तंत्र असेल, ज्यामध्ये पारंपरिक धाेरणांसाठी वरिष्ठांचीच मदत घेतली जात असावी. 

- अनिश्चिततेचा काळ... 
राजकीय पक्षांमध्ये अाता संस्थात्मक व्यवस्थेचा परिणाम मर्यादित स्वरूपाचा अाहे. प्राेफेसर इसाक्राॅफ यांनी लाेकशाहीवादी राजकारणाच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली अाहे. त्यांनी युनिव्हर्सिटी अाॅफ टेक्सासच्या लाॅ स्कूलमध्ये म्हटले की, अाम्ही अाता अशा काळात अाहाेत, जिथे लाेकशाहीसमाेर अनेक अाव्हाने उभी अाहेत.  पारदर्शकता वाढल्यामुळे राजकीय पक्षांची वचनबद्धता निकाली निघत अाहे. विधिमंडळे दुबळी ठरू लागली अाहेत. सामाजिक एकतेची भावना धूसर हाेत अाहे. लाेकशाहीवादी घटकांचे बळ कमी हाेत चालले अाहे. 
 
- २०१६ महत्त्वाचे वर्ष... 
प्राेफेसर इसाक्राॅफ यांच्या मते, राजकीय पक्षांचा प्रभाव कमी करण्यामध्ये इंटरनेटवर अाधारित संवाद, संपर्क महत्त्वाची भूमिका बजावू लागला अाहे. राजकीय पक्ष ज्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधत त्यावर या तंत्राने कडी केली. उमेदवारांपर्यंत पाेहाेचण्यासाठी ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटसारखी माध्यमे अाहेत. इंटरनेटच्या या काळात २०१६ मध्ये पार पडलेली निवडणूक ही लाेकशाही दुबळी ठरल्याचे प्रमाण मानली जाईल. इंटरनेटचा फायदा घेणाऱ्यांनी दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा प्रसार करण्यात  कसूर ठेवली नव्हती. 
 
- इंटरनेट सहायकदेखील... 
- लंडनच्या किंग्ज काॅलेजमधील रशियन इन्स्टिट्यूटचे संचालक सॅम्युअल ग्रीन यांच्या मते, पुतीन यांच्या निर्देशाखाली झालेली सायबर हॅकिंग तुलनात्मकदृष्ट्या चांगली हाेती. 
- युनिव्हर्सिटी अाॅफ लंडनच्या क्रिस्टियन वेकारीदेखील साेशल मीडिया हा उमेदवार अाणि राजकीय पक्षाला जनाधार मिळवून देण्यात उपयुक्त ठरताे, असे म्हणतात. 

निष्कर्ष : राजकारणात संवाद महत्त्वाचा ठरताे. त्यात इंटरनेटने महत्त्वाचे स्थान पटकावले अाहे. त्यास लाेकशाहीदेखील अपवाद ठरली नाही.
बातम्या आणखी आहेत...