आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाेमिअाेपॅथी : अाजाराला पूर्णविराम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१८१० मध्ये जर्मन जिअाॅलाॅजिस्टने कलकत्ता येथे त्याच्याबराेबर काम करणाऱ्या लाेकांसाठी प्रथमच हाेमिअाेपॅथी अाैषधांचा वापर केला. पण हाेमिअाेपॅथी डाॅक्टर हाेनिंगर्बग भारतात पाेहाेचले ते लाहाेरचे राजे रणजितसिंह यांना झालेल्या स्वरयंत्राच्या पॅरालिसिसच्या उपचारांसाठी. यशस्वी उपचारानंतर ते कलकत्ता येथे स्थायिक झाले. त्याकाळी वारंवार येणाऱ्या साथीच्या अाजारांवर हाेमिअाेपॅथीच्या अाैषधाने उपचार करून अनेक रुग्णांचे प्राण वाचविले व निराेगी व्यक्तींना साथीच्या अाजाराचा प्रादुर्भाव हाेऊ नये यासाठी हाेमिअाेपॅथीत असलेली प्रतिबंधक अाैषधे देऊन अाजार हाेण्यास अटकाव घातला. साथीचे अाजार व इतर अाजारांवरील हाेमिअाेपॅथि अाैषधांच्या चांगल्या परिणामांमुळे हाेमिअाेपॅथिचा माेठ्या प्रमाणात प्रसार संपूर्ण बंगालमध्ये झाला. कलकत्यातील अॅलाेपॅथिक डाॅक्टरांनी हाेमिअाेपॅथी अाैषधांचे चांगले परिणाम बघून हाेमिअाेपॅथिचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली व पहिले हाेमिअाेपॅथिचे काॅलेज सुरू झाले ते १८७८मध्ये. हळुहळू हाेमिअाेपॅथी सर्व माेठ्या शहरात पसरली.
 
हाेमिअाेपॅथिचा प्रसार हाेण्याची मुख्य कारणे हाेती ती म्हणजे काेणताही दुष्परीणाम शरीरावर न हाेता अाजार कायमचा बरा हाेताे हा अनुभव. तसेच पुन्हा पुन्हा अाजार हाेेण्याची प्रवृत्ती कायमची नाहीशी करण्याची क्षमता. हाेमिअाेपॅथिचा प्रसार हाेत असताना त्याकाळी विशेेष असे निर्बंध नसल्याने अनेक वैद्यकीय शिक्षण न घेतलेल्याा व्यक्तींनी हाेमिअाेपॅथिची पुस्तके वाचून अाैषधे देण्यास सुरुवात केली व त्यामुळे काही प्रमाणात हाेमिअाेपॅथी विषयीचे गैरसमज पसरले व ते अाजही तसेच अाहेत. त्यात कांदा, लसूण व काॅफी हे हाेमिअाेपॅथिचे शत्रू अाहेत व उपचार चालू असतातना ते मुळीच खाऊ नये अन्यथा हाेमिअाेपॅथिची अाैषधे काम करत नाहीत असा माेठा गैरसमज अाजही अाहे. पण, हाॅ. हानिमान यांनी मांडलेल्या हाेमिअाेपॅथीचा सखाेल अभ्यासक त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णास कांदा, लसूण व काॅफीचा अाहारातील वापर पूर्णपणे टाळा असे सांगत नाही. कारण डाॅ. हानिमान यांनी वरील पदार्थाचा खाण्यामधील अतिवापर टाळावा असे सांगितले अाहे. पण, अजिबात खाऊ नये असे सांगितले नाही. अनेक जणांना हाेमिअाेपॅथिच्या छाेट्याशा गाेळ्या अापला अाजार बरा करू शकतील का? अशी शंका येते. कारण बऱ्याच जणांना वेगवेगळ्या गाेळ्या, इंजेक्शन्स, सलाईन  अाणि पांढरे डगळे घालून फिरणाऱ्या नर्स व डाॅक्टर यांची लगबग म्हणजेच खरी ट्रीटमेंट असे नकळत मनावर बिंबले अाहे व या छाेट्याशा हाेमिअाेपॅथिच्या गाेळ्या मला कशा काय राेगमुक्त करु शकतील अशी शंका त्यांना ‘सुरक्षित’ व अाजार कायमचा बरा करणारया हाेेमिअाेपॅथिच्या उपचारांपासून दूर ठेवते.
 
...तर हाेऊ शकताे परिणाम 
हाेमिअाेपॅथिचा छंद असलेले काहीजण पुस्तके वाचून अाैषधे घेतात व अापल्या जवळील व्यक्तींना देतात पण  हाेमिअाेेपॅथिक उपचार हे व्यक्तीनुसार केले जातात. अाजारावर किंवा अाजारांच्या नावावर अाैषधे दिली जात नाहीत. 
docybk@gmail.com
बातम्या आणखी आहेत...