Home | Magazine | Niramay | Dr. Writes About Summer Drinks is Cool

...तरी उन्हाळाही हाेईल ‘कुल’

डाॅ. शीतल गायधनी, अाहारतज्ज्ञ | Update - Apr 24, 2017, 03:08 AM IST

उन्हाच्या तडाख्याने अंगाची काहिली हाेते. घसा काेरडा पडताे अन् कधी एकदाचे थंड पदार्थ वा ज्यूस सेवन करू असं हाेतं. पण असे थंड पदार्थ वा ज्यूस प्यायल्यावर घसादुखी, खाेकला, कफ हाेणे, सर्दी यांसारख्या समस्याही उदभवतात. अशा परिस्थितीत नक्की काय करावे, उन्हाळ्यात काय कावे अाणि काय खाऊ नये हे अापल्याला माहीत नसते.

  • Dr. Writes About Summer Drinks  is Cool
    उन्हाच्या तडाख्याने अंगाची काहिली हाेते. घसा काेरडा पडताे अन् कधी एकदाचे थंड पदार्थ वा ज्यूस सेवन करू असं हाेतं. पण असे थंड पदार्थ वा ज्यूस प्यायल्यावर घसादुखी, खाेकला, कफ हाेणे, सर्दी यांसारख्या समस्याही उदभवतात. अशा परिस्थितीत नक्की काय करावे, उन्हाळ्यात काय कावे अाणि काय खाऊ नये हे अापल्याला माहीत नसते. खरं तर उन्हाळ्याच्या काळात शरीरातील पाण्याचे प्रमाण अपसुक कमी हाेते. त्यामुळे स्वाभाविकपणे अशक्तपणा येताे. काम केल्याने वा उन्हात फिरल्याने घाम येताे. या घामावाटे पाेषक द्रव्ये बाहेर पडतात. बऱ्याचदा कडक उन्हातून घरी अाल्यावर लगेचच अापण पंखा जाेरात लावताे वा एसी सुरु करताे. त्याच वेळी थंड पदार्थही सेवन करताे. त्यामुळे कफ, सर्दी, खाेकल्यासारखे विकार उदभवू शकतात. उन्हाळ्याच्या काळात कफ पातळ हाेताे. परिणामत: शरीरातील भूक मंदावते. त्यातून प्रतिकारशक्ती कमी हाेऊन अशक्तपणात वाढ हाेते.
    -उन्हात दिवसभर किवा जास्त वेळ फिरायचे झाल्यास प्रत्येक अर्ध्या तासानंतर सावलीत थांबून थंड पाणी प्यावे. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित होण्यास मदत होऊन ऊन लागत नाही.
    -उन्हाळ्यात लिंबू सरबत, कैरीचे पन्हे, कोकम सरबत, अननस व मोसंबीचा रस यासारखी शुष्कता घालवून शरीरास ताजेपणा देणारे पदार्थ घरात असू द्यावेत.

    - सुंठ कफ कमी करते, भूक वाढवते, पचन सुधारते. त्यामुळे तहान भागवण्यासाठी धने-जिरे-खडीसाखर यांचे पाणी घेतो तेव्हा त्यात चिमूटभर सुंठपावडर अवश्य घालावी.

Trending