आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर, वेफर्स, बिस्कीटं टाळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अति प्रमाणात व गरजेपेक्षा जास्त व सातत्याने आहार सेवन करणे, स्थूलता यांमुळे कर्करोगाची शक्यता वाढते. त्यामुळे प्रमाणात आहार सेवन करणे, षड‌्रसांनी युक्त आहार सेवन करणे महत्त्वाचे ठरते. यासोबत ताजा आहारही आवश्यक असतो. भारतामध्ये विशेषत्वाने स्त्रियांमध्ये शिळे अन्न खाण्याची परंपरा आहे. यामुळेसुद्धा कर्करोगास आमंत्रण मिळू शकते. सातत्याने थंड, किंवा मायक्रोवेवमध्ये गरम केलेल्या, किंवा फ्रिजमध्ये थंड करून पुन्हा गरम केलेल्या पदार्थांमध्ये खूप प्रमाणात ऑक्सिडेशन होते. असे पदार्थ नेहमी खाल्ल्यास विविध व्याधी निर्माण होण्यास सुरुवात होते. कर्करोग हा शिळे अन्न खाण्यामुळे होणारा महत्त्वाचा आजार आहे.
 
दुसरा महत्त्वाचा घटक ज्यामुळे कर्करोग बळावतो, तो म्हणजे साखर. साखर ही ग्लुकोज व फ्रक्टोजपासून तयार होते व त्यामुळे त्यामध्ये अत्याधिक माधुर्य निर्माण होते. याच कारणाने त्यात अत्याधिक उष्मांकदेखील असतात. शरीरातील बऱ्याच पेशींचे पोषण ग्लुकोजमुळे होत असते. त्याचप्रमाणे ही साखर कर्करोगाने ग्रस्त विकृत पेशींचेही पोषण करते व कर्करोगास वाढवते. कर्करुग्णांनी साखर सेवन बंद केल्यास कर्करोगातील विकृत पेशींची वाढ खुंटते व कर्करोग पसरण्याची गती मंदावते. साखरेमध्ये अपोषित उष्मांक जास्त असल्याने साखरेच्या माध्यमातून विशेष पोषण आपणास मिळत नाही.

साखरेसोबत आहारातील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे, आपण उपवासाला खातो ते बटाटे चिप्स. हे बटाटे तळल्यावर एक तर त्यात खूप प्रमाणात मीठ टाकावे लागते व हे बटाटे खूप तेलात तळत असताना त्यात एक विषाक्त पदार्थ तयार होतो. या पदार्थाचे नाव acrylamide असे आहे. हा पदार्थ सिगारेटच्या धुरात किंवा काही बांधकामाच्या साहित्यात आढळतो. हा पदार्थ कर्करोग निर्माण करतो. आपल्याकडे वेफर्सरूपी तळलेले बटाटे उपवासाला किंवा अल्प आहार म्हणून खाण्याची पद्धत आहे. असे तळीव बटाटे ज्यात अत्याधिक मीठ आहे व ज्यात acrylamideचे प्रमाण खूप जास्त आहे, याच्या सातत्याच्या सेवनाने कर्करोगास आमंत्रण मिळते. लहान मुले व वयोवृद्ध लोक आवड म्हणून नित्यनेमाने अशा पदार्थांचे सेवन करतात व बऱ्याच चयापचयात्मक आजाराला बळी पडतात. याशिवाय केक, बिस्किट्स व खारीसारख्या पदार्थांमध्ये acrylamideचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळावे.
अनेक वेळा आजारी व्यक्ती चिप्स, खारी, टोस्ट व बिस्किट्स हलके अन्न म्हणून सेवन करतात. या पदार्थांचे प्रमाण रुग्णाच्या आहारात भरपूर असते. हे पदार्थ नियमित खाणे हे कर्करोगास आमंत्रणच जणू. ज्या पदार्थांमध्ये रिफाइन्ड कर्बोदके असतात, तेही पदार्थ टाळलेलेच बरे.   
 
 sangitahdesh@rediffmail.com
बातम्या आणखी आहेत...