आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता तुझी ‘पाळी’; स्वच्छता ठेव निराळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येत्या २८ मे हा जागतिक स्वच्छता दिन. यानिमित्त विविध ठिकाणी नुकतेच विविध कार्यक्रम पार पडले. यातीलच एक भाग म्हणून नाशिकमधील महिला संघटनांनी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या संयुक्त विद्यमाने ‘ब्लेस टू ब्लीड’ हे अभियान सुरू केले आहे. खरेतर मासिक पाळी म्हणजे निसर्गनियम. नवीन जन्म रुजवण्यासाठी निसर्गाने स्त्रीला दिलेले वरदान. परंतु, अज्ञान आणि अस्वच्छता यामुळे हा काळ अनेक महिलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतो. त्यावर उपाय म्हणून मिरर फाउंडेशन आणि नाशिकमधील महिला संघटनांनी महिलांच्या जागृतीसाठी हे अभियान आखले आहे. महिलांच्या आरोग्यापासून परिसराच्या स्वच्छतेपर्यंतचा प्रचार-प्रसार यात केला जाईल. शासनाने सॅनिटरी नॅपकीनवरील कर काढून टाकावी ही मागणीही केली जाईल. हे अभियान २८ मे २०१७ ते २८ मे २०१८ असे वर्षभर सुरू राहणार अाहे. यानिमित्तच मासिक पाळीच्या काळात महिलांनी शारिरीक स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे  अाहे. यावर प्रकाश टाकणारा हा विशेष लेख...
 
जगामध्ये पाळी यायच्या वयातील मुली या वयाच्या १० वर्षांपासून ते तिचे वय जसजसे वाढत जाते तसे म्हणजे अगदी पाळी बंद हाेईपर्यंत तिला स्वत:च्या अाराेग्याची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. गर्भाशयातून हाेणारा स्त्राव, मग ती पाळी येणे असू शकते किंवा पांढरा स्त्राव अथवा गर्भपात झाल्यानंतर, बाळंतपण झाल्यानंतर, गर्भाशयाचे अाॅपरेशन झाल्यानंतर कुठल्याही कारणामुळे स्त्रियांना जाे याेनीमार्गाकडून स्त्राव हाेताे त्याची काळजी घेणे अावश्यक अाहे. हा याेनीमार्गाचा भाग स्वच्छ ठेवणे, त्या भागात इन्फेक्शन हाेऊ न देरे व त्या स्त्रावाचा व्यवस्थित निचरा हाेणे हे प्रत्येक स्त्रीने बघितले पाहिजे. 

जगामध्ये पाळी यायच्या वयातील मुली या वयाच्या १० वर्षांपासून ते तिचे वय जसजसे वाढत जाते तसे म्हणजे अगदी पाळी बंद हाेईपर्यंत तिला स्वत:च्या अाराेग्याची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. गर्भाशयातून हाेणारा स्त्राव, मग ती पाळी येणे असू शकते किंवा पांढरा स्त्राव अथवा गर्भपात झाल्यानंतर, बाळंतपण झाल्यानंतर, गर्भाशयाचे अाॅपरेशन जाल्यानंतर कुठल्याही कारणामुळे स्त्रियांना जाे याेनीमार्गाकडून स्त्राव हाेताे त्याची काळजी घेणे अावश्यक अाहे. हा याेनीमार्गाचा भाग स्वच्छ ठेवणे, त्या भागात इन्फेक्शन हाेऊ न देणेे व त्या स्त्रावाचा व्यवस्थित निचरा हाेणे हे प्रत्येक स्त्रीने बघितले पाहिजे. शरीराची जशी इतर भागाची काळजी व स्वच्छता अापण ठेवताे तशीच याेनीमार्गाचीही काळजी घेणे याकडे लक्ष देणे अावश्यक अाहे. कधी-कधी अतिघामामुळेसुद्धा या भागात इन्फेक्शन हाेते अाणि बॅक्टेरिअल (जंतूंचा हानिकारक प्रभाव) हाेताे, अनेक प्रकारच्या जंतूंमुळे याेनीमार्गाला सूज येऊ शकते, त्यामुळे पुन्हा पांढरा किंवा पिवळा स्त्राव सुरू हाेताे. या भागाला अतिशय खाज येते, याेनीमार्ग सुजताे अाणि हे जंतू गर्भाशयातही जाऊ शकतात व यामुळे गर्भाशयाला सूज येण्याची शक्यता निर्माण हाेते. त्यामुळे अाेटीपाेट दुखणे, कंबर दुखणे, पाळीमध्ये बिघाड हाेणे, इन्फेक्शन्समुळे गर्भाशयाच्या नळ्या बंद हाेणे व त्यामुळे गर्भधारणेला अडचण निर्माण हाेते. स्त्रियांना वयात अाल्यापासून ते पाळी बंद झाल्यावरसुद्धा याेनीमार्गातून स्त्राव हाेऊ शकतात. कधी-कधी हे स्त्राव गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळेही हाेऊ शकताे. गर्भाशयाचा कॅन्सर झाला किंवा गर्भाशयातील फ्रायब्राइड‌्समुळेसुद्धा जास्त रक्तस्त्राव हाेऊ शकताे. या सर्व कारणांमुळे लहान मुलींपासून ते अगदी जास्त वय झालेल्या स्त्रियांना स्वत:ची काळजी कशी घ्यावी हे शिकले पाहिजे.  याेनीमार्गाची जागा ही अांघाेळीच्या वेळी स्वच्छ अांघाेळीच्या साबणाने धुतली पाहिजे. तसेच प्रत्येकवेळी लघवी केल्यानंतर ती जागा स्वच्छ साध्या पाण्याने धुतली पाहिजे, तसेच शारीरिक संबंध झाल्यावरही याेनीमार्ग स्वच्छ ठेवला पहिजे. 
 
स्त्रियांची जी अंतर्वस्त्रेअसतात तीस्ुद्धा स्वच्छ असावी तसेच या काळात ते दाेन वेळा बदलावे
मासिक पाळीमध्ये हाेणार रक्तस्त्राव शाेषला जाईल अशाप्रकारचा सॅनिटरी नॅपकीन वापरला पाहिजे. प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे सॅनिटरी नॅपकीनचा अाकार ठरवता येईल. पाळीच्या काळात दर २-३ तासाने सॅनिटरी पॅड बदलला पाहिजे. म्हणजे पॅड जास्त भिजल्यामुळे त्यात बॅक्टेरिया हाेणार नाहीत व त्यामुळे त्या भागाला जास्त अाेलावा जाणवणे, त्रास हाेणार नाही, खाज येणार नाही याची काळजी घ्यावी जेव्हा-जेव्हा रक्तस्त्राव हाेताे तेव्हा जड काम करू नयेत. किंवा खूप जास्त व्यायाम करू नये. जेणेकरून रक्तस्त्राव जास्त हाेणार नाही, पण जर जास्त रक्तस्त्राव हाेत असेल तर माेठ्या साईजचा नॅपकीन वापरावा. वयात येणाऱ्या मुलींना सॅनिटरी पॅड कसा वापरावा, केव्हा बदलला पाहिजे व ताे वापरून झाल्यावर ताे कुठे टाकावा याची माहिती प्रत्येक अाईने अापल्या मुलीला दिली पाहिजे. सगळ्या महिलांनी स्वच्छ, निर्जंतूक अशाप्रकारचे नॅपकीन्स वापरावे. काही ठिकाणी अजूनही जुने कपडेच मासिक पाळीच्या वेळी वापरतात अशा महिला-मुलींना सॅनिटरी पॅड वापरण्यासाठी अापणही जागृत करावे. अापल्याला मासिक पाळी येते याबद्दल घृणा करू नये, त्याबद्दल काळजी घ्यावी, स्वच्छता ठेवावी, पाळी येते हे अतिशय नैसर्गिक अाहे. याेग्य वयामध्ये पाळी येणे व याेग्य वयापर्यंत ती असणे हे सगळंच 
नैसर्गिक अाहे. त्यामुळे पाळीचा किंवा याेनीमार्गातून हाेणाऱ्या स्त्रावाची याेग्य काळजी घेतली तरी त्यामुळे त्रास हाेणार नाही व पाळी येणारे दिवसही सुखाचे हाेतील.
बातम्या आणखी आहेत...