आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई होण्यापूर्वी…

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. पूनम वराडे - Divya Marathi
डॉ. पूनम वराडे
प्रेग्नन्सी राहिलीय हे कळल्यावर गरोदर स्त्री तर स्वतःची काळजी घेतेच पण अख्खं कुटुंब तिला जपण्यात गुंतून जातं. खर तर स्त्रीने तिची काळजी प्रेग्नन्सी राहण्याच्या कितीतरी आधीपासून घेणे गरजेचे आहे. एवढेच नाही तर होणाऱ्या पित्यानेही काही काळजी घेणे हितावह आहे. जसे पेरणी करण्याआधी जमीनीचा पोत सुधारणे अत्यावश्यक आहे तसेच गर्भधारणेआधी वरील काळजी अत्यावश्यक आहे...

पाळीची तारीख उलटली तशी स्मिता मनोमन सुखावली. पण लगेच कशाला सांगा म्हणून ती कोणालाच बोलली नाही. चांगले पंधरा दिवस उलटल्यावर तिने हि बातमी आईला सांगितली. त्यानंतर  त्या दोघी स्त्रीरोगतज्ञाकडे गेल्या. युरिन -टेस्ट करून या बातमीवर शिक्कामोर्तब झाले. सगळं घर आनंदून गेले.डॉक्टरांनी इतरही काही तपासण्या सांगितल्या होत्या.त्याचे रिपोर्ट आले आणि सगळं घर चिंतेत पडलं. स्मिताला आर्यनची ( लोहाची ) चांगलीच कमतरता होती फाॅलिक अॅसिडच्या आणि आर्यनच्या गोळ्या आधीपासून सुरू केल्या असत्या तर फायदा झाला असता, अश्या डॉक्टरांच्या उद‌्गारांनी सर्वांना चुटपूट लागून राहिली. अशी चुटपूट टाळायची असेल तर जोडप्याने, विशेषतः स्त्रियांनी अधिक काळजी घ्यायला हवी. 
बातम्या आणखी आहेत...