Home | Magazine | Niramay | dr. shalaka shinde writes about Breastfeeding

चिमुकल्यासाठी अमृत; स्तनपान

डॉ. शलाका शिंदे | Update - Jul 31, 2017, 03:05 AM IST

बाळ जन्माला अाल्यानंतर लगेचच एक तासाच्या अात स्तनपान सुरू केले तर ते दाेघांच्याही दृष्टीने अाराेग्यदायी ठरते. यासंदर्भात

 • dr. shalaka shinde writes about Breastfeeding
  १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त
  जगभरातील नवजात शिशुंच्या अाराेग्यात सुधारणा व्हावी अाणि मातांनी स्तनपान करण्यासाठी प्राेत्साहित व्हावे या हेतूने जवळपास १७० पेक्षा अधिक देशांमध्ये दरवर्षी १ अाॅगस्ट ते ७ अाॅगस्टदरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जाताे. डब्ल्यूएचअाेने सांगितले अाहे की, अाईचे पिवळे अाणि दाट कॅलरीज असलेले दूध नवजात बाळासाठी एकदम उत्तम अाहार अाहे. बाळ जन्माला अाल्यानंतर लगेचच एक तासाच्या अात स्तनपान सुरू केले तर ते दाेघांच्याही दृष्टीने अाराेग्यदायी ठरते. यासंदर्भात हा विशेष लेख....
  मातुरेव पिबेत स्तन्य तत् परं देहवृद्धया!
  आईचे दूध हे बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी श्रेष्ठ मानले आहे. म्हणून स्तनपानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आईचे दूध हे बाळासाठी तर गाईचे दूध तिच्या वासरासाठी असते. स्तनपानामुळे बाळाला आणि आईला खूप फायदे होतात. हे सर्व फायदे गायीच्या, म्हशीच्या किंवा पावडरच्या दुधामुळे मिळत नाहीत. थोडक्यात बाळाला आईचेच दूध आरोग्यदायी बनवते.
  सर्वप्रथम बाळाला स्तनपानाचे काय फायदे मिळतात ते पाहू -
  आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व पोषकतत्त्वे योग्य प्रमाणात असतात आणि हे दूध पचायला सोपे असते. आईच्या दुधाचे तापमान योग्य असते. हे दूध निर्जंतुक असते. कारण ते आईच्या स्तनातून सरळ बाळाला मिळते आईच्या दुधामुळे बाळाची रोगप्रतिकारक्षमता चांगली होते. यामुळे न्यूमोनिया, जुलाब, दमा, अॅलर्जी इतर संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण मिळते. आईच्या दुधावर वाढणाऱ्या मुलांची बौद्धिक व मानसिक क्षमता जास्त असते. भावी आयुष्यात स्थुलता, रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह या रोगांपासून संरक्षण मिळते. तसेच काही प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण होते. आई आणि बाळाच्या प्रेमाचे नाते मजबूत होते .
  आईला मिळणारे फायदे
  प्रसूतीनंतर लवकर स्तनपानाला सुरुवात केल्याने गर्भाशयाचे आकुंचन होऊन पूर्वस्थितीत येण्यास मदत होते. प्रसूतीनंतर होणारा अतिरिक्त रक्तस्राव कमी होतो. गरोदरपणाने वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. पाळणा लांबतो. स्तनाच्या गर्भाशयाचा तसेच अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. स्तनपान सुलभ असते. कोणत्याही पूर्वतयारीची गरज नसते. मातेचे उतारवयातील हाडांच्या ठिसूळपणापासून संरक्षण मिळते. प्रसूतीनंतर पहिले दोन ते तीन दिवस दूध येत नसले तरी चिक दूध येते. या चिक दुधाचे प्रमाण कमी असले तरी ते फार पौष्टिक असते. चिक दुधात रोगप्रतिकारशक्ती भरपूर असल्याने जंतूपासून बचाव होतो. त्यामुळे चिक दूध एका अर्थाने बाळाची पहिली लसच आहे. असे दूध बाळाची तहानभूक भागवण्यात पुरेसे असते. याच चिकामुळे बाळाला पहिली शी होण्यास मदत होते त्यामुळे कावीळ वाढण्याचा धोका कमी होतो. आतड्यांचा विकास पूर्ण होण्यास मदत होते. चिक दुधात अ आणखी क जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात असते. नुकत्याच झालेल्या संशोधनात असे आढळले आहे की, मानवाला वरदान ठरलेल्या मूलपेशी अर्थात स्टेमसेल्स मातेच्या दुधात असतात. प्रसूतीनंतरच्या पहिल्या तीन दिवसांतील घट्ट दुधात कोलॉस्टम म्हणतात. यात मूळ पेशींचे प्रमाण सर्वात जास्त असते. सुरुवातीलाच आईच्या दुधातून बाळाला मूळ पेशी मिळतात. नवजात बालकांमधील पचनसंस्थेच्या रचनेमुळे त्या आतड्यांमधील स्रावांमध्ये नष्ट होत नाहीत तर रक्ताभिसरणातून विविध अवयवांपर्यंत जातात. चिक दूध व्यवस्थित मिळण्यासाठी बाळाला वारंवार आईचा स्पर्श द्यावा व बाळांनी इच्छा दाखवल्यास त्वरित स्तनपान करावे. यासाठी आईला प्रोत्साहित करण्याचे काम नातेवाइकांनी रुग्णालयातील व रुग्णालयातील परिचारिकांनी करावे. या काळात बाळ थोडे जास्त रडण्याची शक्यता असते. तरीसुद्धा वरचे दूध, मध, पाणी देण्याचा मोह टाळावा. कारण यामुळे जंतुसंसर्गाचा धोका वाटतो. त्यापेक्षा स्तनपान वारंवार देणे खूप फायदेशीर ठरते. प्रथम स्तनपानापूर्वी किंवा आईला दूध उतरण्याआधी पहिल्या एक-दोन दिवसांत बाळाला जुन्या प्रथेनुसार काहीवेळा मध-पाणी दिले जाते. हे देणे चुकीचे आहे. कारण जास्त प्रमाणात दिले तर बाळाचे पोट भरते आणि बाळ स्तनपानाला निरुत्साही होते. त्यामुळे प्रथम किंवा नंतर स्तनपानास उशीर होतो.
  आईचे दूध वाढण्यासाठी उपाय : आनंदी आणि चिंताविरहित मनस्थिती, पुरेशी विश्रांती, समतोल आहार आणि बाळाला दूध पाजून स्तन पूर्णपणे रिकामे करणे. या गोष्टींमुळे स्तनात दूध निर्माण होण्यास उत्तेजना मिळते .
  अाहार : आईने पोटभर पुरेसा समतोल आहार घ्यावा, अन्न मऊसर शिजलेले, गरम, ताजे असावे. द्रवाहार, दूध, खीर यांचा समावेश नक्की असावा. दुधातून शतावरी कल्प घ्यावे.
  अळीव, खसखस, सुके खोबरे, डिंक, मेथी, गोडंबी, तूप, गूळ यांनी तयार केलेले लाडू बाळंत बत्तीसा औषध टाकून करावे. अशा लाडूंमुळे दुधाचे प्रमाण तर वाढतेच त्याच प्रमाणे दर्जा
  पण सुधारतो.
  पुढील स्लाइडवर, बाळासाठी स्तनपानाचे फायदे...

 • dr. shalaka shinde writes about Breastfeeding
  बाळासाठी स्तनपानाचे फायदे
  - आईच्या दूधात चरबी, कॅलरीज, दुग्धशर्करा, जीवनसत्त्वे, लोह, खनिजे, पाणी मुलांसाठी आवश्यक प्रथिने आणि enzymes पुरेसे आहेत. {अाईचे दूध पचायला हलके असते अाणि पचनही लवकर हाेते. 
  - मुलांची रोगप्रतिकार प्रणाली वाढते. भविष्यात येणाऱ्या संसर्गजन्य राेगांपासून त्यांचे संरक्षणही हाेते. 
  - बाळाला मेंदूच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते.
  -  स्तनपान बाळ आणि आईदरम्यान भावनिक संबंध दृढ वाढते.
 • dr. shalaka shinde writes about Breastfeeding
  डॉ. शलाका शिंदे

Trending