आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Aditya Nanoti Article About Beautiful Skin, Divya Marathi

सौंदर्य - संवर्धन व होमिओपॅथी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या या धकाधकीच्या व चढा-ओढीच्या जीवनात लहानांपासून तर अगदी पंचाहत्तरीच्या आजी-आजोबांपर्यंत सर्वांना सुंदर दिसायचे असते. खरं तर सुंदर दिसणे ही मानवी मनाची भूक आहे.

विज्ञानाप्रमाणे आपल्या शरीरातील कोणता ना कोणता अवयव, भाग ङ्म१ँल्ल हा कमकुवत असतो व ज्यावेळेस मानसिक ताण त्या अवयवाच्या सहनशक्तीपेक्षा जास्त होतो तेव्हा तो त्याची विरोधी प्रतिक्रिया दाखवतो.

जसे की घरातील जुने आजार जर त्वचेसंबंधी असतील, तर त्या घराण्यात त्वचेसंबंधीच्या तक्रारी असण्याची दाट शक्यता असते.जर मधुमेह असेल, तर त्यासंबंधातील आजार होण्याची शक्यता असते. तसेच केस गळती, दमा, ब्लड प्रेशर, कॅन्सरसारखे आजारसुद्धा होण्याची शक्यता असते.

आज आपण ‘सौंदर्य-संवर्धन व होमिओपॅथी’ हे जाणून घेऊ:
जेकाही निसर्गदत्त असेल, त्यात फार संघर्ष करून न बदल करता त्याचा स्वीकार आनंदाने करावा. परंतु, त्यात थोडाफार पुरक बदल मात्र नक्की करता येऊ शकतो. त्यासाठी सौंदर्यप्रसाधने, ब्युटी-पार्लर आणि आजीबाईच्या बटव्यातील काही नुस्खे, अति महागड्या सौंदर्यवर्धक उपचारांचा उपयोग घेता येईल.

याखेरीज व्यक्तिनिष्ठ होमिओपॅथिक उपचार हा एक आदर्श पर्याय ठरू शकतो. स्त्रिया, वयात येणार्‍या मुला-मुलींच्या अनेक सौंदर्य निगडित समस्यांसाठी अचूक औषध योजना होमिओपॅथीद्वारे आपण करू शकतो.

प्रथम आपण केसांपासून सुरुवात करू या.. आजकाल केस गळणे ही जवळपास प्रत्येक स्त्रीची तक्रार असते. त्याचबरोबर याचे प्रमाण आजकाल पुरुषांमध्येसुद्धा वाढले आहे. त्याचबरोबर, वयात येणारी मुले/मुली, आजी, आजोबा यांनासुद्धा केस गळतीने त्रस्त केले आहे. यासाठी योग्य कारण शोधून उपचार केले पाहिजेत. उदा. आनुवंशिकता, आहार, अ‍ॅनिमिया, रासायनिक शाम्पूचा भडिमार, चाळिशीचे टप्पे, प्रदूषण, बाळंतपण, पचनाच्या तक्रारी, मासिक पाळीचे विकार आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मानसिक ताण-तणाव.

ढोबळ मानाने काही औषधे ही आपण विचारात घेऊ शकतो:
प्रदूषणामुळे जर केस गळत असतील तर सल्फर आर्सेनिक आल्बम, फॉस्फरस ही औषधे वापरता येतात. बाळंतपण व आजारानंतर - सेविया, उल्फाअल्फा ही औषधे मदत करतात. मानसिक ताण-तणावात - नद्वम नूर, अ‍ॅसिड फॉस आपणास दिलासा देऊ शकतात.यानंतर सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे, अकाली केस पांढरे होणे, यात आजकाल वय वर्षे 5 पासूनचे लहान मुलेसुद्धा या तक्रारीने ग्रस्त आहेत. त्यांच्यासाठी लायकोपीडियम, जॅबोरँडी, सेलेनियम अ‍ॅसिड फॉस, क्रीसबायडीयन ही औषधे खूप चांगल्या प्रकारे उपयुक्त ठरताना दिसतात. त्यानंतर महत्त्वाची तक्रार म्हणजे केसातील कोंडा त्याची महत्त्वाची कारणे म्हणजे प्रदूषण, खूप कोरडी-तेलकट त्वचा, तेल न लावण्याची फॅशन, जाहिरातीतील शाम्पूची फॅशन (गंधकयुक्त), घाव व सिब्यासीस ग्रंथींचे आजार अन् सोरायसिससारखे त्वचारोग कारणीभूत असतात. प्रत्येक व्यक्तीचा वेगळा अभ्यास करूनच होमिओपॅथी औषधोपचार केले पाहिजेत: चेहर्‍यावर होणारी केसांची अनावश्यक वाढ (लव), केस दुभंगणे (फाटे फुटणे), त्यांची वाढ खुंटणे, ते राठ होणे, निस्तेज होणे यासाठी तज्ज्ञ होमिओपॅथी डॉक्टरांकडून उपचार करता येतो. आवश्यकता असते ती म्हणजे श्रद्धा व सबुरीची. ‘‘पी हळद अन् हो गोरी’’ हा प्रकार इथे होत नाही.

जीवनशैलीत व खानपानात काही औपचारिक बदल केल्यास त्याचा जास्त फायदा होतो :
रोज सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जाणे, नियमित व्यायाम करणे, तेलकट कमी खावे, कैरी, आमसूल, चिंच, लिंबू, दही, ताक, कढी, लस्सी, श्रीखंड हे पदार्थ टाळावे. त्याचसोबत वांगी, गवाराची शेंग, शेंगदाणे, शाम्पू, मेथी हे पदार्थ पण टाळावे. दारू, तंबाखू, सिगारेट, विडी, सुपारी, मिश्री, गुटखा खाऊ नये. अंगाला साबणाऐवजी बाजरीचे पीठ चांगले. केस धुण्यासाठी शिकेकाईचा वापर करावा. मेडिटेशन हा मनाचा व्यायाम जर आपण करू शकलो, तर आपला आपल्या मनावर ताबा मिळवण्यास मदत होते. या सर्वांबरोबर आजकाल ब्यूटीपार्लर्सही सौंदर्याचा आत्मा आहेत. परंतु, त्याचबरोबर ग्रंथालय हे मनाचे ब्यूटीपार्लर आहे, हे विसरून चालणार नाही.

डॉ. आदित्य नानोटी, अकोला