आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उभयचरांचं प्रजनन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उभयचर प्राणी बाकी पाण्यातच अंडी घालतात. यालादेखील कारण आहे. बहुतेक उभयचरांची अंडी टणक कवचाची नसतात. ती ओलसर राहणं इष्ट असतं. त्यामुळे डबकी, पाणथळ जागा ते निवडतात. अथवा अन्य प्रकाराने ती ओली ठेवण्याचा प्रयत्न करतात.

अंडी घालण्याच्या तऱ्हाही अनेकविध असतात. बहुतेक पक्षी आणि बरेच जलचर जमिनीवर अंडी घालतात. उभयचर प्राणी बाकी पाण्यातच अंडी घालतात. यालादेखील कारण आहे. बहुतेक उभयचरांची अंडी टणक कवचाची नसतात. ती ओलसर राहणं इष्ट असतं. त्यामुळे डबकी, पाणथळ जागा ते निवडतात. अथवा अन्य प्रकाराने ती ओली ठेवण्याचा प्रयत्न करतात. सॅलॅमॅन्डर, युरोपात आढळणारा न्यूट, सापासारखा दिसणारा सापकिरम, असे अनेक उभयचर अंडी ओली ठेवण्यासाठी निरनिराळ्या क्लृप्त्या करतात. आफ्रिकेतील रेन फ्रॉग हा अपवाद. हा बेडूक जमिनीवर अंडी घालतो.

उभयचर प्राण्यांची प्रजनन प्रक्रिया सहसा दोन टप्प्यांत होते. अंड्याचा llarva (अळीसदृश अवस्था) तयार होतो. त्यापासून पिल्लू तयार होतं. अंड्यांच्या अळ्या तयार होण्यास साधारणपणे दोन आठवड्यांचा कालावधी लागतो. तर त्यातून पिल्लं बाहेर पडण्यास दोन-तीन महिनेही लागतात. या अंड्यात अन्नसाठा बराच कमी असतो. त्यामुळे अळ्यांना आपलं अन्न शोधावं लागतं. रेन फ्रॉग इथंही अपवाद ठरतो. अंडे ते पूर्ण बेडूक या साऱ्या अवस्था अंड्यातच पूर्ण होतात. आणि पाच आठवड्यांनी बेडूक बाहेर पडतो.

इक्थिओफिस हा उभयचर चिखलातील खळग्यांत अंडी घालतो. काही इक्थिओफिस पाणथळ भागातील खडकांतही हे कार्य उरकतात. अंड्यांना वेटोळे करून मादी त्यांचं संरक्षण करते. गर्भ आणि विकसित होणाऱ्या अळ्यांना कल्ले असतात. अंड्यातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांचे कल्ले झडतात. बाहेर पडलेली पिल्लं पाण्यातच वाढतात. सापकिरम बाबतीत काहीसं असंच होतं. त्यांची पिल्लंही जन्मताच पोहू लागतात. पण मादी अंडी घालत नाही. ती तिच्या शरीरातच असतात. ती तिथंच विकसित होतात. आवाजाची देणगीही काही उभयचर प्राण्यांना लाभली आहे (उदा. बेडूक). त्यांच्या शरीरात आवाज निर्मितीची स्वरथैली (vocal sac) असते. काही उभयचरांना स्वरथैली नसते. परंतु निसर्ग काहीतरी सोय करायला विसरत नाही. गंध, रंग ही त्यांची प्रजनन माध्यमं असतात. मादी वासाला आकर्षित होते. काहीचं रंग हे माध्यम असतं. उदा. न्यूट. न्यूट सहसा जमिनीवर राहतात. प्रजनन काळात (सहसा वसंत ऋतू) पाण्यात जातात. या काळात त्यांच्यातील नर-मादी हा भेद ठळक होतो. नराच्या पाठ व शेपटीवर लांबट उंचवटा तयार होतो. तसाच शिरोभागी तुराही उठतो. हे बदल मादीला आकर्षित करतात. महत्त्वाचं, प्रजनन काळात न्यूट नराचं शरीर भडक गडद रंगाचं बनतं. हा रंगीबेरंगी नर मादीचं आकर्षण बनतो. त्यातच तो प्रणयनृत्य सादर करतो आणि ‘जमलं हो जमलं’ चित्रपट सुरू होतो. नर शेपटीने मादीवर पाण्याचा वर्षाव करतो. जमलं की महत्त्वाचा कार्यक्रम. नर शुक्राणूंच्या थैल्या पाण्यात सोडतो. मादी त्या थैल्या गुदद्वारामार्फत आपल्या शरीरात घेते. या क्रियेनंतर तीन-चार दिवसांनी मादी अंडी घालू लागते. साधारणपणे २००-४०० अंडी ती घालते. अंडी शुक्राणूंतर्फे शरीरातच फलित होतात. साधारणपणे तीन एक महिन्यांनी पिल्लं पाण्यातून जमिनीवर येतात. बऱ्याच उभयचरांची फलधारणा शरीराबाहेर होत असली तरी सॅलॅमॅँडर या उभयचराची फलधारणा बाकी शरीरांतर्गत होते. त्यांची प्रजननप्रक्रिया थोडीशी वेगळी.

पाणथळ भागात पाण्याच्या तळाशी नर आपल्या शुक्राणू थैल्या (spermatophores) ठेवतो. नर सॅलॅमॅँडरच्या शरीरात काही ग्रंथी असतात. त्यातून पाझरणाऱ्या द्रवांना विशिष्ट वास असतो. या वासाला मादी आकर्षित होते. मादी आपल्या गुदद्वाराच्या मांसल भागाद्वारे(cloaca) त्या शुक्राणू थैल्या उचलून आपल्या शरीरात सारते. थैल्यांचे संरक्षक कवच तिथं विरघळतं. शुक्राणू मोकळे होतात. त्यांचा मादीच्या अंड्यांशी संबंध आला की, गर्भधारणा होते. त्यानंतर मात्र फलित अंडी पाण्यात सोडली जातात. उभयचरांची अंडी उबवण पाण्यात असल्याने त्यांच्या संरक्षणाची खास अशी यंत्रणा असते. ही अंडी पारदर्शक जेलींच्या(jelly) आवरणांनी वेढलेली असतात. जेलींमुळं अंडी पाण्यात तरंगू शकतात वा एखाद्या जलवनस्पतीला चिकटूही शकतात. जेली तथा तिच्या नकोशा वासांमुळं इतर जलचर ही अंडी खाऊ इच्छित नाहीत.
पश्चिम अमेरिकेत आढळणारी मडपपी, जलकुत्रा ही सॅलॅमॅँडरची एक प्रजाती. यांचा प्रजनन कालावधी काहीसा मोठा. नर-मादीचं मिलन शिशिर ऋतूत होतं. मादी शुक्राणूंच्या थैल्या आपल्या शरीरात साठवते. फलधारणा झाली की, मादी घरटे तयार करून वसंत ऋतूत अंडी घालते. अंड्याभोवती जेली असते. घरट्याच्या छताला अंडी चिकटवून ठेवते. अंडी उबवताना मादी त्यांची जोपासना करते. पाण्याच्या तापमानावर उबवण्याचा कालावधी अवलंबून असतो.

डॉ. प्रकाश जोशी
बातम्या आणखी आहेत...