आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Pravinkumar Mohod Article About Piles, Divya Marathi

प्रत्येक त्रास हा मूळव्याध नसतो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्‍याच डॉक्टरांकडे इलाज केला. इलाज करेपर्यंत बरं वाटतं. त्यानंतर त्रास जसाचा तसाच सुरू होतो. एकतर मलप्रवृत्ती एकदम कडक होते व मलत्यागानंतर गुद्द्वाराच्या ठिकाणी अर्धा एक तास जीवघेणी आग होते. कित्येक वेळा तर संडासात मलत्यागाच्या वेळी रक्तसुद्धा दिसूून आलेले आहे.

रुग्णाच्या या कथनावरूनच लक्षात आले की, याला मूळव्याधीचा त्रास नसून फिशरचा त्रास आहे. ज्याप्रमाणे जीभ हा पचनसंस्थेचा आरसा आहे. पचनसंस्था खराब झाली असता जीभसुद्धा पांढरी होते. त्यावर फोड येतात. त्याचप्रमाणे येथे गुद्द्वारसुद्धा आरशाचेच काम करते. गुद्द्वारात होणार्‍या सर्व काही आजारांचेमूळ हे खराब झालेले पचनसंस्थाचेच आहे. पचनसंस्था व्यवस्थित आहे व गुद्द्वाराचा त्रास आहे. अशी घटना शंभरातून एखादीच फिशर म्हणजे गुद्द्वारात जखम होणे, गुद्द्वाराच्या कोपर्‍यांना चिरा पडणे होय.

कारणे : या रोगाच्या उत्पत्तीकरिता तसेच हा रोग बरा करण्याच्या दृष्टिकोनातून कारणांना फार महत्त्व आहे.
1) मलबद्धता : हे या रोगाचे प्रमुख कारण मलप्रवृत्ती कडक होणे व त्यासाठी लावला जाणारा जोर याच्या परिणामी गुद्द्वाराच्या जागी चिरा पडतात आणि हा रोग तयार होतो.
2) प्रवाहिका : सआव मलप्रवृत्ती हे या रोगाचे दुसरे महत्त्वाचे कारण पोटात मुरडा येऊन चिकट फेसाळ मलप्रवृत्ती होणे हे प्रवाहिकेचे प्रमुख लक्षण. बरं, रुग्णाला किमान 4-5 वेळा शौचास जावं लागतं. परिणामी, मोठ्या आतड्यासह गुद्द्वाराची जागा अलवार होते. सुजते परिणामी गुद्द्वाराच्या ठिकाणी जखमा तयार होतात.
3) मूळव्याधचा त्रास : बहुतांश मूळव्याध असणार्‍या रुग्णांना फिशरचा त्रास दिसून आलेला आहे. मूळव्याधीची गाठ व सोबत मलबद्धता परिणामी फिशर उत्पन्न होताना दिसून येते.
4) प्रसूतीच्या वेळी गुदमार्ग ताणला जाऊन व्रण होणे.
5) मूळव्याध शस्त्रकर्म करताना चुकीने व्रण होणे.
6) अतिसार अधिक झाल्याने तसेच अत्याधिक उष्ण औषधीच्या प्रयोगामुळेसुद्धा गुद्द्वाराच्या ठिकाणी जखमा होणे.

लक्षणे : मलप्रवृत्तीनंतर गुद्द्वाराच्या ठिकाणी अत्याधिक प्रमाणात आग होणे, हे या रोगाचे प्रमुख लक्षण. ज्या रुग्णांना फिशरचा त्रास पुष्कळ दिवसांपासून असतो, त्यांना सतत गुद्द्वाराच्या ठिकाणी आग होण्याची अनुभूती होत राहते. शरीरातील असे दोनच अवयव आहेत की, ज्यांना थोडासुद्धा आघात किंवा त्रास सहन होत नाही. 1) डोळे. 2) गुद्द्वार. जेव्हा कडक मलप्रवृत्ती होते तेव्हा बाहेर निघणारा मल हा गुद्द्वारातील जखमांना घासून बाहेर येतो. परिणामी भयानक वेदनांची निर्मिती होते. पुष्कळ वेळा बाहेर येणार्‍या मलाला रक्तसुद्धा चिटकून येताना दिसून येते. गुद्द्वाराचे परीक्षण केले असता गुद्द्वाराच्या जागी जखमा व त्याच्या आजूबाजूला सूज येते. रोगामध्ये अंगुली अथवा गुदपरीक्षण करू नये. केले असता जखमा वाढण्याचा धोका असतो.

चिकित्सा : उपचार करताना प्रथम हा त्रास उत्पन्न करणार्‍या कारणांचा त्याग करणे गरजेचे आहे. याशिवाय सतत बसून राहणे, सायकल, गाडी चालवणेसुद्धा कमी करावे लागते. मलत्यागानंतर गरम पाण्यात अथवा तुरटीयुक्त कडूनिंबाच्या काढ्यात बसले असता रुग्णाचा ठणका काही क्षणातच कमी होताना दिसून येतात.
जात्यादी तैलाने भिजवलेला कापसाचा बोळा हा गुद्द्वाराच्या ठिकाणी ठेवावा. यामुळे जखमा बर्‍या होतात. हे लक्षात ठेवावे की, गुद्द्वारातील जखमा बर्‍या होताना त्या ठिकाणी खाज उत्पन्न होणे. ती उत्पन्न होणारी खाज म्हणजे आपला त्रास कमी होण्याचे गमक.

औषधी उपचार
मलप्रवृत्ती साफ होण्यासाठी रात्री झोपताना 2 चमचे एरंड तेल घ्यावे. याशिवाय त्रिफळा गुग्गुळ 10 ग्रॅम, ग्रहणी कपाटरस 10 ग्रॅम, कांकायन गुटी 10 ग्रॅम, अर्शकुठारस 10 ग्रॅम, कुटजचूर्ण 40 ग्रॅम या सर्वांचे मिश्रण करावे त्याच्या समभाग 20 पुड्या बनवून 1-1 पुडी सकाळ -संध्याकाळ गरम पाण्यासोबत घ्यावी.

पथ्य पालन
हलका, सुपाच्य, गरम आहार घ्यावा, ताकाचा उपयोग या रोगात अधिक हितकारक आहे. पालेभाज्या तूप याचे प्रमाणसुद्धा वाढवावे.

डॉ. प्रवीणकुमार मोहोड,
डॉ. हेमा मोहोड, अमरावती