आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Rohini Pisolekar Article About TB, Divya Marathi

उपचार न मिळू शकणारे टीबीचे बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतामध्ये 37 % टीबी रुग्णांची संख्या असून ती दारिद्रयरेषेखालील जनतेत प्रामुख्याने आढळते. याचे प्रचंड ओझे भारतीय आरोग्य व संशोधन विभागावर असून याचे आर्थिक ओझे भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रमाणात आहे. टीबी कुणामध्ये जास्त प्रमाणात आहे. त्याचे विश्लेषण करताना शास्त्रज्ञ म्हणतात- मधुमेही रुग्ण, एचआयव्ही बाधित रुग्ण, तंबाखू-सिगारेट इत्यादी व्यसनाधीन रुग्ण, कुपोषण रुग्ण, कोळशाच्या खाणीत व सतरंजा तयार करणारे कामगार, पासष्ट वर्षांवरील वृद्ध, टीबी रुग्णासोबत काम करणारे लोक किंवा नातेवाईक ही सर्व मंडळी टीबीचे रुग्ण सहजतेने होतात. या शिवाय अशिक्षित, अडाणी, गरिबीने ग्रस्त लोक, कैदी, कुपोषणग्रस्त ज्यांना वैद्यकीय उपचार मिळू शकत नाहीत ते लोक टीबीचे बळी होतात.

टीबीचे कारण -
24 मार्च 1882 मध्ये रॉबर्ट कॉक याने प्रथम रोगजंतूचा शोध लावला. म्हणून 24 मार्च जागतिक टीबी दिवस आहे. या जंतूचे नाव ‘मायकोबॅक्टेरीयम ट्युबरक्युलॉसीस’ आहे. हा रोग हवेच्या माध्यमातून होतो. रुग्ण खोकल्यावर त्याचे छोटे छोटे कण हवेत पसरतात. हे छोटे कण दूर दूर वार्‍याबरोबर वाहत जातात. इतर लोकांच्या शरीरात श्वासाच्या माध्यमातून शिरतात. फुप्फसात जाऊन स्थायिक होतात. या रोगाला अशी सुरुवात होते. जर तुमची प्रतिकार शक्ती उत्तम असेल तर शरीरातील सुरक्षा यंत्रणा कमकुवत असेल किंवा तुम्ही अनेक रोगाने बाधित रुग्ण असाल तर टीबीचे जंतू तुमच्या शरीरात वाढ करतात व रोग पसरवतात.

कोणते अवयव रोगग्रस्त होतात -
प्राथमिक स्तरावर फुप्फुसे टीबी जंतूचे शिकार होतात, पण नंतर अनेक अवयव रोगग्रस्त होतात. यात पचनसंस्था उत्सर्जनसंस्था, जननसंस्था, हाडे इत्यादी अवयव रोगग्रस्त होतात.

लसीकरण -
बीसीजी लस ही शाळेतून देतात, बाळ जन्मल्यावर सरकारी, निमसरकारी दवाखान्यात मोफत देतात, पण या लसीकरणाची जागरूकता समाजात कमी प्रमाणात आहे. शिक्षित समाजात थोडी फार जागरूकता असली तरी अशिक्षित समाजात जागरूकता नाही.असे अहवाल सांगतो. पॉझिटिव्ह ट्युबरक्युलीन टेस्ट ही रोगजंतू शरीरात असल्याचे सांगतो. पण निगेटिव्ह ट्युबरक्युलीन टेस्ट ही टीबी इन्फेक्शन नाही, हे सांगू शकत नाही.

रोगबाधित घटक -
स्त्री-पुरुष दोघांमध्येही या रोगाचे प्रमाण चिंताजनक आहे. तरी त्याचे प्रमाण वयावर अवलंबून असते. पुरुष-स्त्री प्रमाण 2:1 आहे.
वय - टीबीला जरी वयाचे बंधन नसले तरी मध्यम वयात याचे प्रमाण जास्तच असते.
राष्ट्र - गरिबी व दारिद्र्यता राष्ट्रात जितकी जास्त तितका या रोगाचा फैलाव जास्त आहे. अस्वच्छता हे प्रमुख कारण मानल्या जाते.
प्रगतिशील राष्ट्रात दारिद्र्यता, गरिबी कमी प्रमाणात असते व सार्वजनिक स्वच्छता, जितकी उच्च प्रतीची आहे, तेथे रोगाचे प्रमाण कमी असते.

सामाजिक - आर्थिक परिस्थिती -
दारिद्र्यता व रोग दोन्हींचा गहन संबंध आहे. गरिबीमुळे रोग होतात. दारिद्र्यामुळे उपचार घेता येत नाहीत. उपचार फुकट जरी दिले, तरी उपचार घ्यावेत याचे ज्ञान नाही. गंडे दोर्‍याने आजार बरा होता ही अंधश्रद्धा आजही आहे.

स्थलांतरित लोक -
टीबी रुग्ण ज्या ज्या भागात स्थलांतरित होतात, त्या भागामध्ये टीबी रोग पसरत जातो.

लोकसंख्या -
ज्या भागात लोकसंख्या जास्त आहे, दाटी दाटीने लोक राहतात तेथे रुग्ण सहजतेने खूप लोकांना एकदम इन्फेक्शन देऊ शकतात.

व्यसनाधीनता -
सिगारेटचा धूर फुप्फसांना दुर्बल बनवतो, म्हणून सिगारेट, बिडी, तंबाखू या व्यसनाधीन लोकांत जसे कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. तसे टीबीचे प्रमाणही जास्त आहे. गुटखा, दारू, तंबाखू, सिगारेट इत्यादी शरीरातील सुरक्षा यंत्रणा कमकुवत - क्षीण करून टाकतात.

सुरक्षा प्रतिनिधी -
डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी, नर्सेस, परिचारिका, रुग्णसेवक, प्राथमिक केंद्रावरील कर्मचारी ही मंडळी जर सातत्याने टीबी रुग्णाच्या सोबत राहिली, तर सोशल वर्कर्सप्रमाणेच टीबी रुग्ण होऊ शकतात. असे एका पाहाणीत आढळून आले आहे.

एचआयव्ही आणि टीबी -
हे दोन्ही रोग परस्पराशी निगडित आहेत. एचआयव्ही म्हणजे एड्समध्ये प्रतिकार शक्ती मंदावलेली असते, म्हणून टीबी संक्रमण जलद असते. ज्यांना पूर्वी टीबी रोग आहे, त्यांना एचआयव्ही बाधा सहजतेने होते. हा महत्त्वपूर्ण निष्कर्ष आहे.

रुग्णाच्या तक्रारी -
खोकला तीन महिने व त्यापेक्षा जास्त काळाचा असणे,संध्याकाळी ताप असणे, बेडक्यासहित खोकला असणे, बेडका रक्तमिश्रित असणे, अशक्तपणा, थकावट-गळावट असणे, जेवण कमी होणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, सतत सर्दी पडसे असणे, रात्री घाम येणे.

रोग निदान -
एक्स रे, सीटी स्कॅन, बेडकाची जंतू तपासणी, तुकडा तपासणी इत्यादी.
उपचार - कॉट, डीओटी गोळ्या, सहा महिने उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यांनी करावेत. हाय प्रोटिन डायट, मल्टी व्हिटॅमिन, व्यायाम, आहार, प्राणायाम सर्व करावेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार पद्धती निर्धारित करावी. ओसोन उपचार टीबी रोगासाठी फायदेशीर आहेत.

सामाजिक स्थिती -
टीबी रोग हे समाजावर फार मोठे ओझे आहे. 1.8 कोटी लोकांना दरवर्षी या जंतूची लागण होते. त्यापैकी 80 हजार लोक संसर्गजन्य असतात. 3 लाख 70 हजार रुग्ण दरवर्षी मृत्युमुखी पडतात. म्हणजे 1 हजार लोक टीबीने मरतात. आर. एन. टी. सी. पी. ही राष्ट्रीय संस्था या संदर्भात कार्य करते. प्रत्येक वर्षी ही संस्था टीबी रुग्णांना शोधून काढते व त्यांना मोफत उपचार देते. त्यांचा पाठपुरावा करते व रोग मुक्त करते. या संस्थेचे 6 लाख कर्मचारी भारतभर कार्य करीत आहेत. लवकर रोगनिदान व पूर्ण उपचार देणे, प्रतिबंधक उपाययोजना व पूर्ण रोग नियंत्रण, हे या संस्थेचे मुख्य ध्येय आहे. रुग्ण ही दीर्घकाळ उपचार पद्धतीत टाळाटाळ करतात, पूर्ण उपचार घेत नाहीत. धरसोड करतात. त्यामुळे रुग्णांना खूप क्वॉँप्लिकेशन होतात. रोग पसरतो व ड्रग रेझिस्टंट निर्माण होतो. हे कमी व्हावे या उद्देशाने टीबी रोगाला नोटीफायेबल डिसिज म्हणून दर्जा दिला आहे. याचा अर्थ अधिक जाणीवपूर्वक रोगी शोधून त्याला पूर्ण उपचार देण्यासाठी सर्वच स्थरावर खूप प्रयत्न करणे.

एनजीओ म्हणजे नॉन गव्हर्नमेंट आॅर्गनायझेशन हे पण टीबी निर्मूलनासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या योजनांमध्ये सक्रिय सहकार्य करतात. एमसीआय मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया ही संस्थाही डॉक्टरांना चेस्ट डिसिजेस हया वर्गात टीबी निर्मूलन व उपचार पद्धती या विषयात अधिक ट्रेनिंग देऊन हया डॉक्टरांना खेड्यातून रोग निर्मूलनासाठी योगदान द्यावे म्हणून सक्रिय आहे. पब्लिक हेल्थ हा विभागसुद्धा डॉक्टर, वैद्यकीय टीबी अधिकारी नेमून रोग निर्मूलन व उपचार या कार्यात कार्यरत आहेत. अनेक सरकारी व बिनसरकारी संस्था टीबी निर्मूलनासाठी व उपचारासाठी कार्यरत आहेत.