आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Sangita Deshpande Article About Diet For Heart Patients

हृदयविकारातील आहार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हृदयविकार म्हटल्यावर शक्यतो प्रत्येकाला रक्त तपासणी, stress test, 2-D echo मग अँजियोग्राफी व नंतर अँजिओप्लास्टीसारख्या प्रक्रियांना सामोरे जावे लागते. बर्‍याच हृदयरोगी असणार्‍या व्यक्ती बायपास किंवा अँजिआोप्लास्टीनंतर आहार व दिनचर्या कशी असावी, याबद्दल साशंक असतात. हा आजार टाळण्यासाठी व आजाराचे पुढील उपद्रव टाळण्यासाठी मुख्यत: आहारावर नियंत्रण हवे असते, ही संकल्पना रुग्णांना पेलवत नाही. मात्र, ही गोष्ट तितकीच खरी आहे की, हा आजार आटोक्यात राहणे व पुढील उपद्रव टाळण्यासाठी आहार हा एक महत्त्वाचा घटक आहे.

हृदयरोगातील आहार याबद्दलची चर्चा फार व त्याची अंमलबजावणी कमी होताना दिसते. बरेच लोक हृदयासाठी अमुकचांगले, अमुक वाईट असा समज करून घेतात. तसे बघता प्रत्येक हृदयरोग्याची मूलभूत विकृती (Pathology) भिन्न असते. प्रत्येकाची हृदयरोग होण्याची कारणे वेगवेगळी असतात व त्यानुसार त्यांना आहारविषयक सल्ला द्यावा लागतो.

सर्वसाधारणपणे हृदयरोगी व्यक्तींना फळे, फळांचे रस, काळा किंवा ग्रीन टी, नारळपाणी, पंचकर्म यांचा सल्ला दिला जातो व बर्‍यापैकी रुग्ण यांचा अवलंब करतात. ज्या व्यक्ती मद्यसेवन करतात ते या गैरसमजामध्ये असतात की मद्य हृदयाला चांगले असते व या गैरसमजाखाली दररोज ते गळ्याखाली उतरवत असतात. काही लोक जे मांसाहार सेवन करतात ते मासोळीमध्ये प्रथिने व आवश्यक मेदाम्ल मुबलक असल्या कारणाने मासोळीचे तळून वा भाजी या स्वरूपात सेवन करताना आढळतात.

वास्तविक पाहता अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तिपरत्वे व व्याधीच्या कारणपरत्वे आहारयोजना करावी लागते.
सर्वसाधारणपणे मांसाहाराबद्दल बोलायचे झाल्यास Red Meatचे प्रमाण हृदयरोग असलेल्यांनी अत्यल्प ठेवावे किंवा नाही घेतलेले अधिक बरे.
मासोळीचा आहारात समावेश करायचा झाला तर ती उकडून किंवा भाजून सेवन करावी. चिकन किंवा तत्सम मांसाहार घ्यावयाचा झाल्यास तो पंधरा दिवसांत एक वेळा याप्रमाणे घ्यावा. तत्त्वत: हृदयरोग्यांनी मांसाहार घेण्याचे शक्यतो टाळावे.

मद्याच्या बाबतीतसुद्धा असा विचार करता येईल. बर्‍याच वेळा हृदयरोग असलेल्या व्यक्तींमध्ये मेदयुक्त यकृत Fatty Liver ही अवस्था असते. ही अवस्था कदाचित Non-Alcoholic Fatty Liverमुळेसुद्धा असेल. अशा व्यक्तींनी शक्यतो मद्याचे सेवन करू नये. मद्य अत्यंत कमी मात्रेत हृदयाला उत्तेजित करते, पण प्रत्येक वेळा हृदयाला उत्तेजित करण्याची आवश्यकता नसते. मात्र सातत्याने घेण्यात येणार्‍या मद्यामुळे यकृत व हृदयाच्या पेशींवर ताण पडून त्यांची कार्यक्षमता कमी होते. अशा व्यक्तींना मद्य प्यावेसे वाटल्यास द्राक्षे खावीत, तीही थोडीशी. त्यामध्ये Resveratrol सारखे सक्रिय तत्त्व असल्याने हृदयगत रक्तवाहिन्यांचा विस्फोट होतो व Antioxidant कार्य घडून येते.

हृदयरोग झाल्यावर चहा व कॉफी याबद्दलसुद्धा संभ्रम असतो. चहा हा हृदयाला उत्तेजना देणारा तर कॉफी ही हृदयअवसादक आहे. त्यामुळे कॉफी हृदयरोगामध्ये टाळणे जास्त सोयीस्कर असते. चहा स्थूल हृदयरोग्यांमध्ये चांगला आहे. मात्र चहामधील Tannin व इतर Flavonoids हृदयाला उत्तेजना देणारे असल्याने ज्या व्यक्तींची हृदयाची गती अनियमित असते त्यांनी चहाचा वापर मर्यादित ठेवावा. त्यातल्या त्यात खूप दूधयुक्त किंवा पूर्ण दुधाचा चहा टाळावा.

बर्‍याच वेळा Green Teaचा अतिरेक होताना दिसून येतो. चहामुळे हृदयाच्या गतीमध्ये काही व्यक्तींमध्ये अनियमितता आढळून येते. चहामुळे आपणास काही दुष्परिणाम तर होत नाही ना याची खातरजमा करून चहाची लज्जत घ्यावी.

हृदयरोग्यांनी फळांचे रस व नारळपाण्यासारखी पेये टाळावीत किंवा वारंवार घेऊ नये. फळांमध्ये असणाराच्या fructoseया शर्करेमुळे शरीरात Insulin व Ghrelin या संप्रेकावर विपरीत परिणाम होतो व या आजाराची Pathologyवाढण्यास मदत होते. नारळपाण्यामध्ये Potassiumचे प्रमाण अत्यधिक असल्याने ते हृदयाच्या पेशींसाठी कधीकधी अनावश्यक ठरते. त्यामुळे वरील सर्व पदार्थ सेवन करताना विचारपूर्वक व आपल्या प्रकृतीला जे योग्य आहे तेच सेवन करणे हितावह ठरते.

sangitahdesh@rediffmail.com