आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr Sanjay Padole Article About Chikungunya Disease

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विषाणूबाधित डास चावल्यानंतर तीन ते सात दिवसांत लक्षणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाधित लोकांना पुढे जुनाट सांधेदुखीचा त्रास
लक्षण : अचानक तीव्र वेदना, थंडी-ताप, सर्व सांध्यांवर सूज येऊन प्रचंड वेदना होतात. चिकुनगुन्या हा विषाणूजन्य आजार आहे. हा विषाणू एडिस अल्बोपिकट्स व एडिस इजिप्ती या दोन डासांपासून पसरतो. चिकुनगुन्या विषाणूने बाधित डास मनुष्याला चावल्यानंतर तीन ते सात दिवसांत सर्वप्रथम जाणवणारे लक्षण अचानक येणारा ताप १०२ ते १०४ डिग्रीपर्यंत असतो, एकापेक्षा जास्त सांधे दुखणे व शरीरावर पुरळ येणे व याबरोबर डोकेदुखी, थकवा, अपचन व डोळ्यात जळजळ होऊन लाल होणे ही प्रमुख लक्षणे आहेत. दोन-तीन दिवसांत तापाचे प्रमाण कमी होत जाते; परंतु सांधेदुखीत वेदना आहे तशीच राहते. ही सांध्यातील वेदना पुढे दोन ते पाच आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त दिवस राहते. झोप लागत नाही आणि प्रचंड थकवा जाणवत असतो. २००६ मध्ये चिकुनगुन्याची साथ आली होती. त्या वेळेस बाधित झालेल्या बर्‍याच लोकांना पुढे जुनाट सांधेदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या आजाराचे निदान लक्षणावरून व रक्तातील काही सहायक तपासण्यांवरून केले जाते. अचानक येणारा ताप व प्रचंड सांधेदुखी हे चिकुनगुन्याचे पहिले लक्षण आहे.

अँटिबायोटिक्स प्रभावी नाहीत, डासांचा प्रतिबंधच हवा
प्रतिबंधक : बचाव करण्यासाठी कुठलीही प्रतिबंधक लस सध्या तरी उपलब्ध नाही किंवा यावर कुठलेही प्रतिजैविक अँटिबयोटिक्स प्रभावी ठरत नाही. डासांचा प्रतिबंध हाच एकमेव प्रतिबंधक उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी परिसरात पाणी साचू न देणे. कारण साचलेल्या पाण्यात डास आपली अंडी घालतात. या पाण्याचा निचरा होणे शक्य नसेल तर त्या पाण्यात पेस्ट कंट्रोल करणारे कीटकनाशक टाकावे, ज्याने डासांचे प्रमाण कमी होते.

प्रतिकारशक्ती वाढवणे हा उपाय
उपचार : खालावलेली प्रतिकारशक्ती वाढवणे हाच उपाय आहे. उपचार पद्धतीत कुठलेही अँटिबायोटिक्स प्रभावी ठरत नसल्यामुळे चिकुनगुन्यावर फक्त वेदनाशामक औषधीच दिली जातात. मात्र, अति प्रमाणात वेदनाशामक गोळ्यांचे सेवन शरीराला व किडनीला हानिकारक असते. चिकुनगुन्याच्या विषाणूविरोधात आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतींमध्ये कोणतीही उपाययोजना उपलब्ध नाही. त्यामुळे या विषाणूमुळे बाधित व्यक्तीला प्रचंड थकवा, ताप व सांधेदुखीचा त्रास होत असतो. होमिओपॅथिक औषधी रुग्णाची बिघडलेल्या प्रतिकारशक्तीत सुधार करून तिला वाढवण्यास मदत करते. चिकुनगुन्यासाठी आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी होमिओपॅथिक औषधी घेतली त्यांना औषधी घेतल्यापासून तीन ते चार दिवसांतच सुधारणा जाणवू लागली. ताप कमी होऊन सांधेदुखी व सांध्यावरील सूज कमी झाल्याचे निदर्शनास आले. वेदनाशामक गोळ्यांसारखा कुठलाही दुष्परिणाम होमिओपॅथिक औषधींचा होत नाही. उपचाराबरोबर भरपूर पाणी व फळांचा रस सेवन करणे खूप फायद्याचे ठरते.
डॉ. संजय ग. पडोळे, औरंगाबाद.