आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Subhash Bhandari Article About Hair Loss, Divya Marathi

टकलावर निसर्गोपचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टक्कल पडणे म्हणजे भाग्याचे लक्षण समजले जाते. अनेक व्यक्ती आपण भाग्यवान आहोत या समाधानात जगत असतात. टक्कल बरी न होणारी समस्या असल्याने अनेक लोक कुठलाही उपाय करून बघत नाहीत. मात्र टक्कल मिरवत जगणे मोठे कठिण कर्म असल्याने जाहिराती वाचून टकलावर उपाय करू पाहणारा मोठा वर्ग आहे.यामुळेच या टकलावर उपाय सापडला, असा दावा करणार्‍या जाहिराती अधूनमधून झळकत असतात. टकलावर केस उगवतात, असा दावा करणारी शेकडो तेले मार्केटमध्ये उपलब्ध असताना टकलु व्यक्तींची संख्या लाखोंच्या घरात आहे.

केशवर्धक तेलांचा फोलपणा लक्षात आल्याने लोक अन्य उपचार करू लागले आहेत. वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घेतला जात आहे. असाच एक चांगला पर्याय म्हणजे निसर्गोपचार होय. माझ्या या क्षेत्रातील गेल्या 4-5 वर्षांच्या अनुभवावरून मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की काही टक्कलग्रस्ताना या उपचाराचा आश्चर्यकारक अनुभव आला असून टक्कल असलेल्या व्यक्तींना अगदीच डोक्याला हात लावून बसण्यासारखी परिस्थिती नाही.

टक्कल पडण्याची कारणे
टक्कल पडण्याची अनेक कारणे असून सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अनुवांशिकता होय. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे रोज भरपूर प्रमाणात गळणार्‍या केसांकडे दुर्लक्ष करणे. स्त्रियांमध्ये वारंवार घट्ट वेणी बांधल्याने केसबीजांना इजा होऊन टक्कल पडण्याची शक्यता असते. अपघात, विजेचा झटका यामुळेसुद्धा टक्कल पडू शकते. असे टक्कल कायम राहते. मोठे आजारपण सुद्धा टक्कलाचे कारण असू शकते. ताप, वारंवार औषधाने दाबून टाकल्यास अनेक लोकांना टक्कल पडते. असा अनुभव आहे. मानसिक ताणतणाव हेसुद्धा टक्कल पडण्याचे महत्त्वाचे कारण आहे. सांधेदु:खीत वापरले जाणारे कॉल्चिसीन हे औषध, रक्तातील गाठी कमी करणारे हेपॅरिन औषध, कॅन्सरवर वापरली जाणारी सायक्लोफॉस्मामाइड व मेथोट्रिकसेटसारखी औषधीसुद्धा डोक्याचा गोटा करतात. एवढेच काय तर ‘अ’जीवनसत्त्वाचा अतिरेकी वापरसुद्धा कधीकधी टकलाचे कारण होऊ शकते.

चाई (alopecea areata) या प्रकारात अचानक काही भागावरचे केस जातात. यामध्ये कधी कधी सर्व डोके, भुवया व अंगावरचे सर्व केस जातात. याला अ‍ॅलोपेशिया युनिव्हर्सलिस असे म्हणतात. चाईवर निसर्गोपचारानंतर बर्‍याचशा रुग्णांमध्ये परत केस येतात.

वयात आल्यावर सर्व पुरुषांच्या डोक्यावर टक्कल पडण्याची प्रक्रिया सुरू होते. यामध्ये डोक्यावरील विशिष्ट भागातील केसबीजांमध्ये राठ केस (terinal hairs) गळून त्याजागी अतिशय लहान केस (vellus hairs)येतात.

टकलावर उपाययोजना
अ‍ॅलोपॅथीत यासाठी बाहेरून लावण्यासाठी हार्मोनयुक्त मलमे, पोटातून हार्मोनयुक्त औषधे देण्यात येतात. काही रुग्णांमध्ये यापासून फायदा होतो. परंतु बहुतेक रुग्णांत याचे दुष्परिणाम दिसून येतात. मिनॉक्सिडील नावाचे लोशन काही रुग्णात लाभदायक ठरते. परंतु ते बरेच महाग असते. आयुर्वेदात विविध वनस्पती वापरून बाहेरून लावण्यासाठी विविध प्रकारची तेले तयार केली जातात. या वनस्पतीत प्रामुख्याने माका, त्रिफळा, आवळा यांचा समावेश असतो. टकलाची कारणे विविध असल्याने व्याधीच्या मुळापर्यंत ही तेले पोहोचू शकत नाही, असे दिसून येते.

होमिओपॅथीत टकलासाठी बरायटा कार्ब-30, सिलिका-30, सिफीलीनम-200, फ्लूरिक अ‍ॅसिड-30, लायकोपोडियम-30, अनाकार्डीय-30 व व्हिनका मायनर-30 ही औषधे देण्यात येतात. अकाली टक्कल पडलेल्या रुग्णात या औषधांचा खूप चांगला परिणाम दिसून येतो. विविध कारणांचा विचार करून यापैकी एका औषधाची निवड करण्यात येते. याकामी तज्ज्ञांची मदत जरूर घ्यावी.

निसर्गोपचारात विविध प्रयोगांचा एकत्रित वापर करण्यात येतो. परिणामी फायदा खूप चांगला जाणवतो. टक्कलग्रस्तांसाठी खालील प्रयोग केले जातात.
1. केसांच्या निरोगी वाढीसाठी प्रोटिन्स, विविध जीवनसत्त्वे, लोह, कॉपर, आयोडिन, झिंक, सेलेनियम हे घटक अत्यावश्यक असतात. ते प्राप्त होतील असा विशिष्ट आहार निसर्गोपचारात सुचविला जातो. शिवाय नियमित गव्हाचा तृणरस पिण्यासाठी दिला जातो.
2. सूर्यप्रकाश व शक्तिशाली चुंबक याने प्रभावित केलेल्या तेलाने केसांना मसाज केला जातो.
3. कपाळावर नियमित तासभर चुंबकीय हेडबेल्ट बांधला जातो. तसेच दिवसातून एकदा चुंबकीय हेअरब्रशने केस विचरण्यास सांगितले जाते.
4.मानसिक ताणतणाव नष्ट करण्यासाठी पुष्पौषधींचा वापर केला जातो. तसेच रुग्णास रेकी देण्यात येते.
5. झोपताना स्वमूत्राने डोक्यास मसाज केला जातो.
6. नियमित शवासन करण्याचा सल्ला देण्यात येतो.
7. काही विशिष्ट बिंदूंवर नियमित अ‍ॅक्युप्रेशर करणे. हे बिंदू तज्ज्ञाकडून शिकून घ्यावेत.
8. होमिओपंक्चर हा अगदी नवीन व आगळावेगळा प्रयोग असून यात यशाचे प्रमाण खूप आहे. यात टकलावर उपयुक्त ठरलेल्या लायकोपोडियम - 30 या
होमिओपॅथिक औषधात अ‍ॅक्युपंक्चरची सुई बुडवली जाते व या सुईने पायाच्या घोट्याजवळील के - 3 हा अ‍ॅक्युपंक्चर बिंदू उत्तेजित केला जातो. चाई असल्यास हाच प्रयोग मध्यभागी असणार्‍या बिंदूवरसुद्धा केला जातो.

शेवटचा, पण खात्रीचा उपाय
वर उल्लेखलेल्या कुठल्याही ट्रिटमेंटचा लाभ न झाल्यास केस रोपण (hair transplant) हा प्रयोग करावा.
केसरोपण ही पद्धत ओरेनट्रीच (orentreich या शास्त्रज्ञाने 1959 मध्ये चालू केली. टकलासाठी केसरोपण आता जगभर मान्यताप्राप्त झाले आहे. या पद्धतीत मानेकडील केस असलेल्या भागातील (donor sites) 4. 0 m. m. आकाराचे संपूर्ण जाडीच्या त्वचेचे (full thickness grafts) गोल तुकडे काढले जातात. टकलावर 3 mmmचे खड्डे (recepiant site) योग्य अंतरावर पाडून त्यामध्ये ते तुकडे (grafts) भरले जातात. एका वेळेला असे साधारण 50 ते 100 तुकडे बसवता येतात. नंतर सर्व डोक्याला बँडेज करण्यात येते. बसवलेल्या त्वचेतील केस प्रथम जाऊन नंतर तीन महिन्यांनी परत त्यावर केस येतात. मग हे केस टकलावर कायम राहतात.