आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Sumita Jain Article About Diabetes, Divya Marathi

मधुमेहासाठी आयुर्वेदिक उपचारातून उत्कृष्ट जीवनशैली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जा गतिक पातळीवर झालेल्या सर्वेक्षणात मधुमेहाच्या रुग्णसंख्येत भारताचा 6 वा क्रमांक आहे. मूळ संस्कृती सोडून पाश्चात्त्यांचे अनुकरण करणे बंद झाले नाही, तर भारत प्रथम क्रमांकावर येईल. सद्य:परिस्थितीत मधुमेहाला आनुवांशिक किंवा वयानुसार उद्भवणारी कारणे दिसत नाही, हा व्याधी विशेषकरून जीवनशैलीवर निर्भर झालेला आहे. प्रमेहाचे 20 प्रकार आहेत. त्यातील एक म्हणजे मधुमेह, त्यातही रुग्णाच्या देहयष्टीवरून 2 प्रकार आहेत.

1.स्थूलप्रमेही-अधिक पोषण आणि कमी व्यायामामुळे उद्भवणारा मधुमेह.
2.कृशप्रमेही-शारीरिक क्षयामुळे उद्भवणारा मधुमेह.
यावरून जीवनशैलीचा प्रकार ठरतो. मधुमेहासंबंधित काहीही माहिती मिळाली तर ती प्रत्येक मधुमेहीला चालेलच असे नाही. आयुर्वेदाप्रमाणे सर्व मधुमेहींसाठी कारले हितकर आहे, असे नाही. तर नवीन उद्भवलेल्या मधुमेहींना अधिक लाभदायी आहे. कृश मधुमेहींनी फार खाऊ नये.
2. तळलेल्या बटाट्यापेक्षा भाजलेले बटाटे उपयोगी आहे.
3. जुन्या मधुमेही रुग्णांना तूप खाणे आवश्यक आहे. म्हणून त्यांनी औषधी सिद्ध तूप सेवन करावे.
वारंवार प्रयोग करून मिळालेल्या सफलतेवर आधारीत माहिती
जसे - 1. मधुमेहींनी काय खावे, काय खाऊ नये (अपथ्य)
2. मधुमेहींनी उपवासाला काय खावे.
3. लहान मोठ्या लक्षणांवर काय खावे, घरगुती उपाय.
4. दिनचर्या कशी असावी.
पथ्य - काय खावे, काय खाऊ नये, (पथ्य) सेवन योग्य.
जुने गहू, जुने तांदूळ, लाल/ पिवळे तांदूळ (पॉलीश कमी केलेले), नाचणी, ज्वारी, कुळीथ, हरबरे, मटकी, मसूर, मूग, उडीद (साली सकट) या डाळी आलटून-पालटून खाणे विशेषत: भाजलेल्या डाळींचा उपयोग उत्तम आहे.

अपथ्य - नवे तांदूळ, मका, बाजरी (जुने मधुमेही खाऊ शकतात), मैदा, ब्रेड, नुडल्स, उडद डाळ, चवळी.
फळे भाज्या (योग्य) - शेवगा, मेथी, कारले, पडवळ,घोळ, भेंडी, करडई, भाजलेला बटाटा, टमाटर (न शिजवलेला), काकडी, कांदा, गाजर, पत्ताकोबी, कढीपत्ता, कोंथबीर, कच्च्या केळी, उंबराचे फळ, जाभूळ, कविट, ओले खारीक, पपई, आवळा, हिरडा, कैरी, कच्चा पेरू.
सेवन अयोग्य - फणस, तळलेला बटाटा, तोंडली, भोफळा, गोड फळे त्यांचा रस, सीताफळ, उसाचा रस, गळ, आंबा, केळी, द्राक्ष, चिकू.
कंद (योग्य) - लसूण, आल्याचा रस, हळद, गाजर, मुळा, कांदा. हळद -आल्याचे लोणचे खाणे उत्तम.

अयोग्य- रताळे, बटाटे, साबुदाणा, असवी मसाल्यांचा उपयोग भरपूर करावा. त्यात विशेष करून जिरे, मिरे, ओवा, लवंग, हिंग, तेजपान, खसखस, भाजलेली तीळ, इलायची. सुखे मेवे- भाजलेले काजू, बदाम.

मधुमेहींनी उपवासात काय खावे- काय खाऊ नये
०भिजलेल्या साबुदाण्यापेक्षा साबुदाण्याच्या फुल्या खाव्या.
०बटाट्याचे चिप्स (भाजलेले) तसेच केळीचे चिप्स खावे.
० दूध- सुंठ, मिरे घालून कमी साखर घालावी.
० ताक, पपई, कच्चा पेरू खावा, दही कमी प्रमाणात.
० दिवसभर कोमट पाणी पिणे.
० राजगिरा, भगर कमी मात्रेत सेवन करू शकता.
०भाजलेले शेंगदाणे खावे.
दिनचर्या - प्रतिदिन व्यायाम, वरीलप्रमाणे आहार, प्राणायाम, तणावमुक्त राहणे, मधुमेहाला सकारात्मक रूपाने मित्र बनवणे, याप्रमाणे जीवनशैली ठेवल्यास मधुमेहाचे उपद्रव नियंत्रणात राहतील व इतर आजार शरीराला जडणार नाहीत.

लहान-मोठ्या विकारात घरगुती उपाय
हातपायाची आग होणे - काकडीच्या सालीचा वाटून लेप लावणे.
पोट साफ होत नसल्यास- अर्धा कप गोमुत्रात रात्री 3 बाळहिरडे भिजवून सकाळी चावून खाणे.
मूत्रमार्गात खाज येत असल्यास- पानकोबीच्या रसाने त्या जागेवर धुवावे