आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Viraj Borgaonkar Article About Jaundice, Divya Marathi

कावीळ आजाराचे योग्य निदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कावीळ दोन प्रकारची असते. ज्याला वैद्यकीय भाषेत मेडिकल जॉँडिस आणि सर्जिकल जॉँडिस असे म्हणतात. मेडिकल जॉँडिस हा कावीळ औषधोपचाराने बरा होतो. सर्जिकल जॉँडिस हा कुठल्याही औषधाने बरा होत नाही. बर्‍याच वेळेस कावीळचे योग्य निदान होण्यास चूक होते किंवा विलंब होतो. ज्यामुळे योग्य उपचाराची जी सुवर्ण संधी असते ती आपण गमावून बसतो. बरेच रुग्ण कावीळ झाली, असे समजले की लगेच वेगवेगळे गावठी उपचार सुरू करतात, परंतु ते आपल्या प्रकृतीसाठी खूप घातक ठरते. असे होऊ नये त्यासाठी काविळीचे योग्य निदान करणे खूप गरजेचे आहे.

मेडिकल जॉँडिसमध्ये आपल्या यकृतमध्ये जंतुसंसर्ग झालेला असतो. त्यामुळे कावीळ होते. त्यासाठी योग्य औषधोपचार करणे गरजेचे असते. या काविळीमधून रुग्ण 10-15 दिवसांत बरा होतो. परंतु 15-20 दिवस उपचार घेऊनदेखील कावीळ कमी होत नसेल तर त्याचे योग्य निदान करणे फार आवश्यक असते. सर्जिकल जॉँडिसमध्ये आपल्या यकृतामध्ये जंतुसंसर्ग असतोच असे नसते. यामध्ये कावीळ असण्याचे कारणे मेडिकल जॉंडिसपेक्षा वेगळे असतात. आपल्या यकृतामध्ये तयार होणारे पित्त पित्तनलिकेद्वारेआपल्या लहान आतडीमध्ये उघडते त्याला अ‍ॅमपूला ऑफ व्हेट्टर असे म्हणतात. परंतु ज्या वेळेस या नलिकामध्ये किंवा अ‍ॅमपूला ऑफ व्हेट्टरमध्ये अडथळा निर्माण होतो त्या वेळेस जी कावीळ होते त्याला सर्जिकल जॉंडिस असे म्हणतात. हा अडथळा कुठल्याही कारणाने असू शकतो. पित्ताच्या खड्यामुळे किंवा कर्करोगामुळे.

उपचार -
मेडिकल जॉँडिसमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून घेणे. सर्जिकल जॉँडिसमध्ये त्याचे योग्य निदान करूनच उपचार करणे गरजेचे असते. कारण या काविळीचे उपचार खूप गुंतागुंतीचे असते आणि शस्त्रक्रियाच हीच उपचार पद्धती असते. सर्जिकल जॉँडिसचे उपचार त्याचे कारण शोधून करणे आवश्यक असते. कारण त्यानुसार उपचार पद्धती बदलत जाते. पित्ताचा खडा हे कारण असेल तर त्याची त्यासाठी वेगळी शस्त्रक्रिया केली जाते.कर्करोग हे जर कारण असेल तर त्यासाठी वेगळी शस्त्रक्रिया असते. कर्करोगामुळे होणार्‍या कावीळमध्ये करण्यात येणार्‍या शस्त्रक्रियेस व्हिप्पल्स ऑपरेशन असे म्हणतात.

व्हिप्पल्स ऑपरेशन म्हणजे काय?
व्हिप्पल्स ऑपरेशन ही एक फार गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. या मध्ये कर्करोग झालेला भाग पूर्णपणे काढला जातो आणि त्याबरोबरच त्याभागाच्या जवळच्या सर्व गाठी काढल्या जातात. कापलेली आतडी आणि पित्ताची नलिका व स्वादूपिंडाची नलिका पुन्हा एकमेकाला जोडली जाते. जे खूप व्यवस्थित करावे लागते आणि त्यातील तज्ज्ञ डॉक्टरच हे करू शकतो. कारण त्या ठिकाणांचा जोड लिक होण्याचा जास्त धोका असतो. त्यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण घ्यावे लागते आणि ज्यांनी ते प्रशिक्षण घेतले आहे त्यानेच ही शस्त्रक्रिया करावी, जेणेकरून रुग्णाला त्याचा पूर्णपणे लाभ होईल.

व्हिप्पल्स शस्त्रक्रिया कुठे करावी आणि का?
ही शस्त्रक्रिया आपण अशा ठिकाणी करावी ज्या ठिकाणी दर वर्षाला कमीतकमी 10 व्हिप्पल्स शस्त्रक्रिया केल्या जातात, तेथेच ही शस्त्रक्रिया करावी. दर वर्षाला कमीतकमी 10 व्हिप्पल्स शस्त्रक्रिया केल्या जातात या रुग्णालयाला isgps (international study group of pancreatic surgery) नुसार high volume center असे संबोधले जाते आणि अशा ठिकाणी ही शस्त्रक्रिया केल्यास जास्त फायदा होत असतो. असे संशोधनाने सिद्ध झाले आहे. ज्या ठिकाणी आपल्याला शस्त्रक्रिया करायची आहे. त्याठिकाणी सर्व सुविधा आणि शस्त्रक्रियासाठी लागणारी विशिष्ट प्रकारची अत्यावश्यक साधने उपलब्ध पाहिजेत. उदा. thomsons retractor, hormonic, bipolar हे अत्यावश्यक साधने आपली शस्त्रक्रिया करण्यास गरजेची असतात. अशा ठिकाणीच का करावे याचे कारण ही शस्त्रक्रिया खूप गुंतागुंतीची आणि धोक्याची असते. आपल्याला या शस्त्रक्रियेपासून जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजेत. आपला कर्करोग पूर्ण निघणे गरजेचे असते. नसता तो पुन्हा उदभवण्याचा संभव असतो. आणि पुन्हा उदभवल्यावर दुसर्‍यांदा ही शस्त्रक्रिया करता येत नाही. त्यामुळे पहिलीच शस्त्रक्रिया विचार पूर्वक आणि योग्य ठिकाणी करावी, जेणेकरून रुग्णाची फसगत होणार नाही.

ही शस्त्रक्रिये प्रशिक्षण न घेतलेल्या डॉक्टरांकडून केल्या जाऊ शकते. रुग्णाच्या जीवाला धोका होऊ शकतो. फुफ्फसाचा निमोनिया होऊ शकतो. आजार पुन्हा येऊ शकतो. आतडी, पित्ताची नलिका व स्वादूपिंड नलिकामध्ये दिलेला जोड व्यवस्थित बसला नाही तर त्या ठिकाणी लीक होऊन फिश्चुला होऊ शकतो. ज्यामुळे पोटामध्ये जंतू संसर्ग होऊ शकतो. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णाला पूर्वी मुंबई शिवाय दुसरे ठिकाण नव्हते. रुग्णांची हेळसांड व्हायची. बर्‍याच दिवस रुग्णालयात गर्दी असल्याने नंबर लागत नसायचा खूप सारा पैसा खर्च व्हायचा, परंतु ही शस्त्रक्रिया आता आपल्या शहरात सर्रासपणे आणि स्वस्तात केली जातो.