आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Eduction News : Abroad Education Scholarship To The Backward Class Student

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षणवार्ता : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण विभागातर्फे खास अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जमाती व भूमीहीन ग्रामीण कृषी मजूर गटातील विद्यार्थ्यांना विदेशातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमध्ये पदव्युत्तर शिक्षण व संशोधनपर पीएचडीसाठी देण्यात येणा-या शिष्यवृत्तीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी, उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
* शिष्यवृत्तींची संख्या व तपशील : एकूण उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या 30 असून यापैकी 27 शिष्यवृत्ती अनुसूचित जातीच्या, 2 शिष्यवृत्ती अनुसूचित जमातीच्या तर 1 शिष्यवृत्ती ग्रामीण कृषी मजूर गटातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.
* विषयांनुसार शिष्यवृत्तींचा तपशील : वर नमूद केल्याप्रमाणे उपलब्ध असणा-या 30 शिष्यवृत्तींपैकी 20 शिष्यवृत्तींच्या अभियांत्रिकी व व्यवस्थापन 5 शिष्यवृत्ती विज्ञान तर 5 शिष्यवृत्ती कृषी व वैद्यकशास्त्र क्षेत्रातील अभ्यासक विद्यार्थ्यांना देण्यात येतील.
* आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांजवळ खालीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता असायला हवी.
* संशोधनपर पीएचडी : अर्जदार विद्यार्थ्यांनी त्यांच्या संबंधित विषयातील पदव्युत्तर परीक्षा कमीत कमी 60% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
* पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम : त्यांची पदवी पात्रता परीक्षा कमीत कमी 60% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांच्या शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
* वयोमर्यादा : अर्जदार विद्यार्थ्यांचे वय 35 वर्षांहून अधिक असावे.
* विशेष सूचना : अर्जदारांच्या कुटुंबाचे एकत्रित मासिक उत्पन्न 25 हजार रुपयांहून अधिक नसावे व त्यांना विदेशातील संबंधित विद्यापीठवा संशोधन संस्थेत प्रवेश मिळालेला असावा.
* शिष्यवृत्तीचा कालावधी व रक्कम : निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर कोर्ससाठी 3 वर्षे तर संशोधनपर पीएचडीसाठी 4 वर्षे शिष्यवृत्ती देण्यात येईल.
वरील कालावधीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना खाली नमूद केल्याप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येईल.
* अमेरिकेतील संस्था : वार्षिक 14000 अमेरिकी डॉलर्स.
* इंग्लंडमधील संस्था : वार्षिक 9000 ग्रेट ब्रिटन पाउंड्स.
याविषयी संबंधित विद्यार्थी त्यांच्या संशोधन प्रकल्पाच्या आधारे आनुषंगिक उत्पन्न मिळविण्यास पात्र असतील आणि त्यांना वार्षिक आकस्मिक खर्च, पुस्तके व शैक्षणिक सामग्री खर्च, प्रवास खर्च पण देण्यात येईल.
* अर्जाचा नमुना व तपशील : अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 2 ते 8 मार्च 2013 च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सहकृषिकरण विभागाची जाहिरात पाहावी. www.socialjustice.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
* अर्ज पाठवण्याचा पत्ता व शेवटची तारीख : अर्ज अंडर सेक्रेटरी टू दि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, एसीडी-व्ही सेक्शन, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, रूम नं. 622, ‘ए’ विंग, शास्त्री भवन, डॉ. राजेंद्र प्रसाद मार्ग, नवी दिल्ली-110001 या पत्त्यावर पाठवण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2013.
अनुसूचित जाती व इतर राखीव गटातील ज्या विद्यार्थ्यांना विदेशातील शैक्षणिक संस्था वा विद्यापीठांमध्ये शिष्यवृत्तीसह पदव्युत्तर अभ्यासक्रम वा संशोधनपर पीएचडी करायची असेल अशांना या शिष्यवृत्ती योजनेचा फायदा होऊ शकेल.