आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी विशेष संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इन्स्टिट्यूट रिसर्च ‘सीएसआरआय’च्या अकादमी ऑफ सायंटिफिक अँड रिसर्च ‘एसीएसआयआर’ योजनेअंतर्गत पदवीधर इंजिनिअर्सना एमटेक, पीएचडी विशेष अभ्यासक्रमासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत-

जागांची संख्या व तपशील : याअंतर्गत एकूण उपलब्ध जागांची संख्या 199 असून त्यापैकी 50 जागा प्रशिक्षणार्थी-संशोधक उमेदवारांसाठी आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी अभियांत्रिकी वा तंत्रज्ञान विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी 70% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय त्यांनी ‘गेट’ प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 1 जुलै 2013 रोजी 28 वर्षांहून अधिक नसावे.

अभ्यासक्रमाचे स्वरूप : निवड झालेल्या उमेदवारांना सीएसआयआरच्या एमटेक-पीएचडी संयुक्त अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल. हा संपूर्ण अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणार्‍या उमेदवारांना सीएसआयआरतर्फे संशोधक म्हणून सामावून घेतले जाईल व त्या वेळी त्यांना दरमहा 15600-39100+6600 या वेतनश्रेणीत इतर भत्ते व फायद्यासह नेमण्यात येईल.
पाठ्यवृत्तीची रक्कम व तपशील : अभ्यासक्रम, प्रशिक्षणाच्या कालावधीत प्रशिक्षार्थी, संशोधक म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 34650 रु. व इतर भत्ते तर फेलोशिपअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25000 रु.ची पाठ्यवृत्ती त्यांच्या अभ्यासक्रम कालावधीसाठी देण्यात येईल.

संपर्क : http://acsir.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2013.
ज्या पदवीधर इंजिनिअर्सना त्यांच्या क्षेत्रात एमटेक-पीएचडी करून ‘सीएसआयआर’सारख्या प्रतिष्ठित संशोधन संस्थेत आपले करिअर करायचे असेल त्यांनी या संधीचा जरूर फायदा घ्यावा.