आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऋतुबदलामुळे होणारे आजार थांबवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्वेदशास्त्रात सांगितलेली औषधी चिकित्सा दोन प्रकारची असते. 1) रोग झाल्यानंतर बरी करणारी, 2) रोग न होऊ देणारी. दुस-या प्रकारच्या चिकित्सेत आयुर्वेदात ब-याच औषधीचा उपयोग सांगितला आहे. त्यापैकी एक प्रमुख म्हणजे हरितकी म्हणजेच ‘हिरडा’ होय. विविध ऋतंूमध्ये वेगवेगळ्या द्रव्यांबरोबर हिरडा औषध घेतल्यास त्या- त्या ऋतूमधील आजार होतच नाहीत, असा अनुभव अनेक रुग्णांना आलेला आहे. म्हणून आपल्या घरात हिरडा असलाच पाहिजे.
हिरडा कोणकोणत्या द्रव्यांसोबत घ्यावा, त्याची माहिती पुढीलप्रमाणे - वसंत ऋतू : साधारणपणे मार्च-एप्रिलमध्ये हा ऋतू येतो. या काळात मधासोबत हिरडा सेवन केल्यास दमा, खोकला, ताप, येत नाही. ग्रीष्म ऋतू (मे-जून) : हिरडा आणि गूळ सेवन केल्यास खोकला, अतिसार, वाताचे रोग दूर पळतात. वर्षा ऋतू (जुलै-ऑगस्ट) : हिरडा व साखर खाल्ल्यास पोटाची आग, पित्तविकार व पित्ताशय विकृतीजन्य त्रास होत नाही.
हेमंत ऋतू (नोव्हेंबर-डिसेंबर) हिरडा व सुंठ खाल्ल्यास सांधेवात, गाठिया वात आणि अतिसार होत नाही. शिशिर ऋतू (जानेवारी-फेब्रुवारी) हिरडा व पिप्पली चूर्ण सेवन केल्यास छातीत होणारी जळजळ, सर्दी-ताप, अग्नी मंद होणे असे त्रास होत नाहीत. आयुर्वेदाच्या ग्रंथात या सर्व उपाययोजना सांगितल्या आहेत.