आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्रक्रिया झाल्यावरही व्यायाम सुरू ठेवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सी - सेक्शन ही महिलांमध्ये पोटाची एक महत्त्वाची शस्त्रक्रिया असते. ही गर्भावस्थेच्या काळात होते. इतर शस्त्रक्रियांप्रमाणेच सी-सेक्शन शस्त्रक्रियेचे टाके भरण्यासही वेळ लागतो, पण याचा अर्थ तोपर्यंत व्यायाम
करायचा नाही, असे नाही. या शस्त्रक्रियेनंतरही व्यायाम बंद करू नका. व्यायामामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. पण व्यायाम प्रकाराची निवड काळजीपूर्वक करा. शरीरावर कमीत कमी ताण पडेल, असा व्यायाम करा. शस्त्रक्रियेनंतर नियमित व्यायाम सुरू करण्यापूर्र्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

शस्त्रक्रियेनंतर लगेचच कठीण व्यायाम करू नका. श्वसनाचे व्यायाम किंवा पोटाच्या सर्वात सोप्या व्यायामाने सुरुवात करता येईल. यामुुळे पोटावर फार ताण पडणार नाही आणि टाके भरण्यात अडचण येणार नाही. दररोज 5 ते 10 मिनिटे चालण्याचा व्यायाम करता येईल. पहिल्या आठवड्यात चालण्याचा वेग कमी ठेवा. चालण्याने शरीरात रक्ताभिसरण वाढेल आणि टाके भरण्यास मदत होईल.

प्रत्येक आठवड्यात व्यायामाचा वेळ 5/7 मिनिटांनी वाढवा. बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी चेस्ट स्टेÑचिंग व्यायाम करू शकता. बाळाला दूध पाजण्यातही या व्यायामामुळे लाभ होईल. खांदे बळकट करण्यासाठी शोल्डर एक्झरसाइज करता येईल. शस्त्रक्रियेच्या 6 आठवड्यानंतर स्त्री रोग तज्ज्ञाच्या सल्ल्याने स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि क्रंचीज करता येईल. हे व्यायामप्रकार शस्त्रक्रियेनंतर लगेचच केल्यास हर्निया किंवा प्रोलॅप्ससारखे गंभीर विकार उद्भवण्याचा धोका असतो. शस्त्रक्रियेनंतर खाण्यापिण्यातही काही बदल करा. उदाहरणार्थ पातळ पदार्थांचे प्रमाण वाढवा. प्रथिने, लोह आणि कॅल्शियम हे घटक असलेल्या पदार्थांचा वापर वाढवा. व्यायाम हळूहळू वाढवण्याचा प्रयत्न करा.

झटपट करण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर त्रास होण्याचा धोका आहे. स्थिती वेगाने बदलत जाणारे व्यायामप्रकार किंवा जर्क, बाउन्स होण्याची भीती असलेला व्यायाम करू नका. व्यायाम करताना जराही वेदना झाल्या किंवा रक्तस्राव झाला तर तत्काळ व्यायाम बंद करा आणि वेळ न दवडता दवाखान्यात जा.
प्रिव्हेन्शन नियतकालिकातून