आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड वर्षापासूनचा खांदेदुखीचा त्रास महिन्यात झाला बरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मला मागील दीड वर्षापासून खांदेदुखीचा जीवघेणा त्रास होत होता. यामध्ये माझा उजवा हात अडकलेला होता. त्या हाताने काहीही काम करता येत नव्हते. हात मागे जात नव्हता, वर देखील होत नव्हता. मला घरचे काहीही काम करता येत नव्हते. अस्थिरोग तज्ज्ञाला दाखवले असता त्यांनी एक्स रे एमआरआय करण्यास सांगितले. त्यामध्ये त्यांनी फ्रोझन शोल्डर, असे निदान केले व त्यावरील उपचार दिला. वेदनानाशक औषधे दिली, परंतु त्याने काहीही फायदा झाला नाही. केवळ दुखणे कमी झाले होते तेही तात्पुरते. नंतर त्यांनी फिजिओथेरपी करण्यास सांगितली. एक महिना हा उपक्रम केला, परंतु तरीही हात वर जात नसे सगळे उपाय करून थकल्यानंतर शेवटी आयुर्वेद पंचकर्मतज्ज्ञाला दाखवावे, असे निश्चित केले. माझ्या नातूचा उपचार ज्या सिडको येथील प्रसिद्ध वैद्यांकडे चालू होता त्यास दाखवायचे ठरले. औरंगाबाद सिडको येथील त्या पंचकर्म आयुर्वेद रिसर्च सेंटरचे वैद्य यांना दाखविले असता त्यांनी दीड महिन्याचा कोर्स करण्याचे सांगितले.
यामध्ये सुरुवातीला 8 दिवसांचा एक विशेष प्रकारच्या आयुर्वेदिक फिजिओथेरपीचा कोर्स त्यामध्ये औषधीयुक्त मसाज व औषधीचा शेक त्यांनी केला व नंतर एक महिन्याचा औषधीचा (आयुर्वेदिक) कोर्स दिला. त्यात खांद्यावर लावण्यासाठी संशोधित लेप व पोटातून घेण्यासाठी आयुर्वेदिक औषधी दिली व घरगुती उपाय सांगितले. आणि काय आश्चर्य सुरुवातीच्या 10 दिवसांच्या काळातच खांदे दु:खी कमी झाली.

जखडण कमी झाली हात वर जाणे व मागे नेणे सहज करता येऊ लागले. एक महिन्याच्या औषधीने माझा त्रास पूर्णपणे कमी झाला. आज या गोष्टीला एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. परंतु हा त्रास पुन्हा झाला नाही. खरोखरच आयुर्वेदिय उपचाराने माझा खांदा पूर्ण बरा झाला. यासाठी त्या सिडको येथील वैद्यांचे आभार. कारण त्यांच्या व्यवस्थित निदान व निश्चित उपचारानेच माझा खांदा बरा झाला. या आजारावर त्यांनी बराच रिसर्च केला आहे, असे त्यांनी खांदा बरा झाल्यावर सांगितले. आपल्या भारतीय चिकित्सा पद्धतीचा प्रचार प्रसार व अभिमानासाठी ही केस (प्रकरण) मी प्रसिद्धीसाठी दिली. जेणेकरून आयुर्वेदाचा प्रसार व्हावा व असा त्रास ज्यांना आहे त्यांचा फायदा व्हावा.