आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटिझम मुलगी झाली बरी, अशा मुलांवर उपचार करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीतू ही माझी सहा वर्षांची मुलगी आहे. तिला स्वमग्न म्हणजे ऑटिझमचा रोग आहे. ती नेहमी खूपच उत्तेजित असे, वेड्यासारखी वागे. सारखी न सांगता सातत्याने उड्या मारे, थकतच नसे, हातवारे करायला लागली की सारखे हातवारे करी, सारखी कुरकुर-रडणे चालूच असे, रात्री तर कहर असे, झोपतच नाही, आम्हा सर्वांना जागरण होई, तिचे मन शरीर कधीच शांत नव्हत. आम्ही सारेजण कंटाळलो शेवटी मानसोपचाराकडे दाखवले. त्यांनी झोपेसारख्या गोळ्या दिल्या त्यामुळे ती सारखी झोपून असे. तिला कधीही शौचास नियमित झाली नाही. तीन-चार दिवसांनीही ती बरोबर होत नसे. आणि ती झाल्यावर घरभर घाण वास सुटत असे. जेवायला तिला हाताने भरवावे लागे. थोडेसेच खायला पण ती खूप त्रास देत असे. यामुळे आम्ही सर्वजण खूपच वैतागून गेलो होतो.
यानंतर काही दिवसांनी आम्हाला औरंगाबादच्या एका दवाखान्यातील ओझोन उपचार केंद्राची माहिती कळाली. ताबडतोब आम्ही तिला तेथे नेले. तेथे तिच्यावर ताबडतोब ओझोन उपचार सुरु झाले. आठवड्यातून दोन वेळेस तिला उपचार देतात. आतापर्यंत २४ सेटींग झाल्या, तिची झोपेची औषधे बंद झाली. ती आता आपल्या हाताने जेवण करते, तिला भूकही लागते. आणि तिची शौच साफ होऊन ती बिनवासाची झाली आहे. (म्हणजे घाणेरडा वास दुर्गंधी येत नाही) सांगितलेली कामे करते. खूपच शांत झाली आहे.
उड्या मारणे, हातवारे करणे थांबले आहे. तिची विचार करण्याची क्षमता तिच्यात आता आली आहे. रडणे, चिडचिड करणे, कुरकुर करणे, दुस-यांना त्रास देणे थांबले आहे.
ज्या मुलांना स्वमग्न, ऑटिझम आहे त्यांच्या पालकांनी जरुर त्यांच्या आशा मुलांवर उपचार करावे. मी जे म्हणते तिला कळले, छोटी- छोटी कामे ती करते. तिला आता खूप समज आली आहे. अजून उपचार चालू आहेत. जरुर तुम्ही तुमच्या ऑटिझम मुलांना हा उपचार द्या हेच माझे आग्रहाचे सांगणे आहे कारण ते या उपचाराने बरे होऊ शकतात.