आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती औषधे:हिरडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुर्वेदात जेवढी म्हणून औषधे सांगितली आहे. तेवढ्या सगळ्या औषधात हिरडा श्रेष्ठ म्हटला आहे. स्वर्गात देवांसाठी साठविलेले अमृत पृथ्वीवर पडले आणि त्याचे हिरडे झाले. खरेच हिरडा अमृत आहे. ह्याच्या नित्य सेवनाने वृध्दत्वपणा जाणवत नाही.
चांगला उत्तम वजनदार हिरडा आणून त्याची वस्त्रगाळ भुकटी करुन १ ग्रॅम भिजेल एवढे तूप घालून रोज घेतल्याने आरोग्य चांगले राहते. कोणत्याही प्रकारचा रोग होत नाही. बुध्दी, स्मृती तरतरीत होते. ऋतूपरत्वे थोडेसे अनुपान बदलून िहरड्याची बारीक केलेली पूड ग्रीष्म ऋतूत - पावसाळ्यात सैंधवाबरोबर, शरदऋतूत - आश्विन, कार्तिकात- साखरेबरोबर, हेमंत ऋतूत - मार्गशीर्ष - पौषात सुंठीबरोबर व शिशीर ऋतूत माघ, फाल्गुन महिन्यात पिंपळीबरोबर व वसंत ऋतूत चैत्र, वैशाख महिन्यात मधाबरोबर घेतल्यास फार फायदेशीर होते.
१. मुळव्याधीवर हिरड्याइतके उत्तम औषध नाही. - १ ग्रॅम हिरडा, दूध व खडीसाखर एकत्र घेतल्यास थोड्याच दिवसात अनुभव येतो.
२. आव आणि मुरडा िहरड्याने बरा होतो. १ ग्रॅम हिरडा, दोन चिमट्या सुंठीचे चूर्ण, भिजेल एवढे तूप व गोड लागेल एवढी साखर घालून आव झालेल्या व्यक्तीस द्यावी. संडास साफ होऊन मुरडा थांबतो व त्वरित आराम पडतो.
३. पोटात होणारे सर्व विकार हिरडा घेतल्याने बरे होतात. वाढलेले यकृत, प्लीहा, फुगलेले पोट यावर हिरड्याचा गुलाब वर सांगितलेल्या प्रमाणात द्यावा.
४. रोज एक टक असे पाच - सहा दिवस घेतल्याने उदरातील विकार बरे होतात.
५. हिरडा अनुलोमन म्हणजे वात सरविणारा असल्यामुळे खास िहरड्याने बरा होतो.
६. ३ ग्रॅम हिरड्याची भुकटी भिजेल एवढा मध व दुप्पट तूप घालून चाटावी, श्वास थांबतो, हिरडा मधात खाल्ला तर खोकला कमी होतो. हिरडा, बेहडा आणी आवळा सारखे वजनाचे घेऊन त्याचे वेगळे वेगळे चूर्ण करुन ते एकत्र केले म्हणजे त्यास त्रिफळा असे म्हणतात. ही त्रिफळा जेवढे म्हणून हिरड्याचे गुण सांगितले. तेवढ्यात तशीच वापरतात.