Home | Magazine | Madhurima | fashion-women

फॅशन

divya marathi | Update - Jun 04, 2011, 12:56 PM IST

ऊन सुसह्य करणारे कॉटनचे कुर्ते वा कुर्ती यांना सर्व वयाच्या महिलांची पसंती आहे.

 • fashion-women

  कॉटन कुर्ते आणि स्टोल्सचा जमाना
  चु भती जलती गर्मी का मौसम आया... वाढलेल्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत असल्याने मराठवाड्यात सगळ्यांच्या तोंडी सध्या हेच एेकायला मिळत आहे. पण अशा गरम वातावरणातही आपण मात्र कूल दिसावं, असं प्रत्येकीलाच वाटत असतं. त्यामुळे या हॉट हॉट वातावरणाचा सामना करण्यासाठी स्टोल्स आणि सुती कुडत्यांनी सध्या बाजार फुलून गेलाय. केवळ डोक्याला बांधता येणारा रुमाल आता काहीसा आउटडेटेड झाल्यासारखा वाटतो. त्यामुळे उन्हापासूनही संरक्षण आणि वेळ पडल्यास ओढणीसारखे
  वापरता येणारे मल्टीपर्पज स्टोल्स जोरात आहेत. अगदी 50 रुपयांपासून ते 250 रुपयांपर्यंत हे स्टोल्स उपब्ध आहेत. कॉटन आणि सिंथेटिक अशा दोन्ही प्रकारांत आणि विविधरंगी अशा या स्टोल्सना सध्या खूप मागणी आहे.
  ऊन सुसह्य करणारे कॉटनचे कुर्ते वा कुर्ती यांना सर्व वयाच्या महिलांची पसंती आहे. काळ्या वा पांढ:या लेगिंग्जवर कोणत्याही रंगाचे, प्रकारचे, बाह्यांचे वा बिनबाह्यांचे असे अनेक कुडते वा टॉप्स खरेदी करण्याकडे महिलांचा कल आहे. हे टॉपही दीडशे रुपयांपासून मिळतात, अर्थात मग तुमच्यासारखा टॉप इतर चार जणींकडे दिसणार. तुम्हाला एकदम खास काही हवे असेल तर मोठ्या दुकानांमध्ये अधिक चांगले आणि एक्सक्लुझिव्ह टॉप्सही अर्थातच आहेत. असा एखादा टॉप, त्याखाली मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट मॅचिंग लेगिंग्ज आणि मस्तसा स्टोल्स घेऊन बाहेर पडलात तर उन्हाळा तुमच्यासाठी नक्कीच कूल होईल.

  पुण्यात मलखाची चलती
  या दिवसांत सन बर्न टाळण्यासाठी लाइट शेडचे, पेस्टल कलरचे कपडे वापरावेत. विशेषत: यलो, ब्ल्यू, पिंक आणि ग्रीन फॅमिलीतल्या फिक्या रंगाचे कपडे छान वाटतात. वयाच्या चाळिशीपेक्षाही तापमानाच्या पा:यानं चाळिशी ओलांडणं किती त्रासदायक असतं, याचा अनुभव आपण पुण्यात सध्या घेत आहोत. पण डोंट वरी, पा-याच्या या चाळिशीवरचा अक्सीर इलाज आता उंबरठ्यावर आला आहे. वरुणराजाचं आगमन या आठवड्यात होतंय. तरीसुद्धा अजून पंधरवडाभर तरी समर हँगओव्हर जाणवणार यात शंका नाही. तेव्हा फ्रेंड्स, एप्रिल-मे महिन्यातलं समर कलेक्शन अजूनही वापरात ठेवायला हरकत नाही, असं पुण्यातल्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि टेलारिंग युनिटच्या प्रमुख शीतल वानावळकर यांचं मत आहे.
  या दिवसांत सन बर्न टाळण्यासाठी लाइट शेडचे, पेस्टल कलरचे कपडे वापरावेत. विशेषत: यलो, ब्ल्यू, पिंक आणि ग्रीन फॅमिलीतल्या फिक्या रंगाचे कपडे छान वाटतात. स्लीवलेस वापरणार असाल तर बाहेर पडताना सनकोट मस्ट! त्यापेक्षा फुल स्लीव्हज्, फेअरी स्लीव्हज्ची निवड करता येईल.
  जीन्सचा वापर कमीच करावा. कॉटन, ट्राऊझर्स, केप्रीज, शॉर्ट केप्रीज आणि लाँग टी शर्ट किंवा शॉर्ट कुर्तीजचा वापर करावा.
  सध्या खादीमध्येही सॉफ्ट मटिरिअल मिळते. त्याचा थिकनेस (किंवा जाडेभरडेपणा) कमी असतो. शिवाय रिंकलफ्री, मंगलगिरी, मलमल फ्लॉवरी प्रिंट वापरता येतील. मलमल आणि खादी यांचं कॉबिनेशन असणारं 'मलखा' हे नवं मटिरिअलसुद्धा ट्राय करायला हरकत नाही. आपली 'बॉडी लँग्वेज' पाहून हे प्रकार वापरावेत. म्हणजे 'समर'मध्येही एक कूल फील मिळेल.

  मुंबईत सुती टी शर्ट आणि केप्रीज...
  आमच्या वेळी नव्हती बाई अशी फॅशन, असे म्हणणा-या आयासुद्धा आता स्वत:ला बदलू लागल्या आहेत,
  नव्या जमान्यातल्या आपल्या तरुण मुली-सुनांच्या बरोबरीनं. . चला तर मग नवीन फॅशन ट्रेंडस जाणून
  घेऊया फॅशनमधून....
  मुं बईत सध्या विचित्र, घामट, गुदमरलेले वातावरण आहे. सकाळपासून आभाळात ढग ठाण मांडून बसलेले आहेत. पाऊस आता येणार याचे आश्वासक चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे अंगावर घातलेले कपडे घरबाहेर पडल्यावर पाच मिनिटांच्या आत घामाने अंगाला चिकटलेले असतात. यावर उपाय म्हणून टीशर्ट, बाह्यांचे किंवा बिनाबाह्यांचे आणि जीन्स किंवा सुती ढगळ पँट असा वेश बहुतांश तरुण मुली करताना दिसतात..नोकरीवर जाणा-या तरुण मुली किंवा मध्यमवयीन स्त्रिया मात्र सुती कुडता आणि पांढरी सलावार असा ऑलटाइम फेवरिट पोशाख पसंत करतात.. शक्यतो ओढणी नाहीच, किंवा घ्यायचीच तर स्टोलसारखी..कुडत्यांसाठी वेस्टसाइड, बिगबाजार, कॉटन वल्र्ड, कॉटन किंग, फॅाइंडिया, कॉटन बाजार अशा अनेक दुकानांमध्ये बायकांची गर्दी असते. किंवा रस्त्यावर ढीग टाकून बसलेल्या फेरीवाल्यांकडून मिळणा-या कुडत्यांवरही बायका-मुलींच्या उड्या पडतात. सुमारे दहा वर्षांपूर्वी उन्हाळा आला की मुंबईतल्या नोकरी करणा-या महिला त्यांचा मस्त कांजी केलेल्या कलकत्ता साड्या बाहेर काढायच्या. कधी कधी एखादीची कोटा वा ऑरगंडी साडी असायची. आता साड्या नेसायचे प्रमाण कमी झाले आहे..आता वेध लागणार आहेत पावसाचे, तेव्हा हे सगळे सुती कपडे आत जातील आणि बाहेर येतील ठेवणीतले सिंथेटिक कपडे. त्याविषयी पुढच्या वेळी.

Trending