आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सामान्यत: स्त्रियांमध्ये जाणवणा-या समस्यांमध्ये बाळंतपणाच्या तक्रारी, पाळीच्या समस्या, रजोनिवृत्तीनंतर उद्भवणा-या समस्या या प्रकारच्या तक्रारी उद्भवतात. या आजारांना आळा घालण्यासाठी वैद्यकीय मार्गदर्शनानुसार आपलीशी केलेली जीवनशैलीही निरामय आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. या आजारांवर योग्य जीवनशैलीद्वारे मात करता येते. यासाठी आरोग्यविषयक ज्ञान थोडेसे जाणून घ्यायची गरज असते.
आहारावर लक्ष महत्त्वाचे : या सर्व टप्प्यांवर आहारात बदल करण्याची गरज असते. या सर्व टप्प्यांवर स्त्रियांमध्ये व्हिटॅमिन्स आणि इतर पोषक द्रव्यांची गरज वाढलेली असते. सोबत गरज वाटल्यास काही शारीरिक तपासण्याही कराव्या लागतात. पण अनेकदा स्त्रिया या तपासण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची उदाहरणे आहेत. यामुळे दुखणे आणखीनच वाढत जाण्याची शक्यता असते. निरामय आरोग्यासाठी शारीरिक स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. शारीरिक वेदना टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेणे टाळणे गरजेचे आहे. योग्य आहार आणि व्यायाम यांची उत्तम सांगड घातल्यास रजोनिवृत्तीच्या काळात होणा-या संप्रेरकांच्या असंतुलनामुळे होणाºया आजारांना आपण आळा घालू शकतो.
अलीकडील काळात स्त्रियांना लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, अॅनिमिया, मधुमेह, थायरॉइडची कमतरता, गर्भाशयाच्या किंवा स्तनांच्या गाठी, मानसिक आजार, गर्भाशयाच्या तक्रारी अशा अनेक आजारांना सामोरे जावे लागते आहे. यासाठी आहार आणि व्यायामसह योग्य जीवनशैलीचा योग साधण्याचाच सल्ला होमिओपॅथी देते.
होमिओपॅथिक दृष्टिकोन
या उपचारांमध्ये रुग्णाच्या केवळ दोषांचा विचार केला जात नाही तर त्यांनी मन:स्थिती, आवडी-निवडी, तहान-भूक यासारख्या लक्षणांचाही सूक्ष्म अभ्यास करण्यात येतो. या उपचार पद्धतीत रुग्णाला योग्य आहार सुचवण्यावर भर दिला जातो व यानुसार उपचार केले जातात. आजाराच्या मुळाशी जाऊन उपचार केले जात असल्याने रुग्णाला यासारख्या आजारांमध्ये दीर्घ कालावधीसाठी आराम पडतो.
कोणती काळजी घ्याल ?
प्रत्येक स्त्रीने टप्प्याटप्प्यावर शरीराची योग्य तपासणी करून घ्यावी. फॅमिली डॉक्टरांकडे फक्त शारीरिकच नाहीत तर मानसिक लक्षणे, कौटुंबिक इतिहास, सभोवतालचे वातावरण याविषयीची माहिती नि:संकोचपणे सांगावी.
या माध्यमातून डॉक्टर आपल्याला संभाव्य आजारांपासून वाचण्यासाठी मार्गदर्शन करू शकतात. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर स्त्रियांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. वयात येताना होणारे शारीरिक बदल, पाळीचा कालावधी, बाळंतपणाचा काळ, स्तनपानाचा काळ, रजोनिवत्तीनंतरचे आजार या टप्प्यांवर आरोग्याकडे विशेष लक्ष हवे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.