आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सण व सयु्क्तिक आहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण आला की सणावारांची रेलचेल सुरू होते; त्याचबरोबर श्रावणातील उपवास, व्रतवैकल्ये व इतर धार्मिक कार्यक्रम सुरू होतात. परंपरेप्रमाणे आपण सणावारांना विविध व ठरावीक पदार्थ तयार करत असतो व त्याचबरोबर अधूनमधून धार्मिक उपवास करत असतो. श्रावण महिन्यातच नाही तर इतर वेळीसुद्धा वेगवेगळ्या सणवारी आपण ठरावीक पदार्थ सेवन करत असतो.


हे वेगवेगळ्या सणवारी होणारे ठरावीक पदार्थ, त्यांचे त्या त्या ऋतूतील महत्त्व व त्यांचा आरोग्यावर होणारा दूरगामी परिणाम बघता आपल्या पूर्वजांनी ही सणवार व परंपरा किती व्यवस्थित ठरवून दिली आहे, हे समजते. या सर्व बाबींची चर्चा करण्यासाठीचा हा लेख!


सणावारी होणा-या पदार्थांचे आरोग्यावर होणारे परिणाम बघण्यासाठी आपणास ऋतुकालाची पार्श्वभूमी व त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम बघणे आवश्यक आहे. फक्त भारताचा विचार केल्यास आपल्याकडे वर्षभरात हवामानामध्ये आमूलाग्र बदल दिसून येतात. या बदलांना आपल्या शरीरातील मेंदू, त्वचा, प्रतिकारशक्ती या सर्व बाबी व्यवस्थितरीत्या बदलास सामोरे जातात व या बदलांचा शरीरावर कुठेही दुष्परिणाम होऊ देत नाहीत. हवामानातील उष्णता, प्रकाश, आर्द्रता व हवामानातील दबाव, थंडपणा या घटकांचा व या घटकातील बदलांचा शरीरावर सातत्याने परिणाम होत असतो. या परिणामी चयापचयात्मक बदल होणे, भूक कमी होणे अथवा मंदावणे, पचन, रक्ताभिसरण, मानसिक भाव व अशा अन्य बाबींवर परिणाम होतो. शरीर वातावरणातील बदलाला विशिष्ट प्रतिक्रिया देत असते. या प्रतिक्रिया देण्यासाठी विशिष्ट वातावरणात विशिष्ट आहार सेवन केल्यास मदत होत असते. या अत्यंत सूक्ष्म गोष्टींचे निरीक्षण भारतीय वैद्यकशास्त्राने केले असून ऋतुचर्या हा वेगळा उपक्रमच वर्णन केला आहे. आपण सणावारी तयार करत असलेले विशिष्ट पदार्थ हे ऋतुचर्येला अनुसरूनच आहेत व त्यांचा अत्यंत अनुकूल परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. याला आधुनिक काळात ‘लाइफस्टाइल मॉडिफिकेशन’ असे म्हणतात.


भारतामध्ये वातावरणातील बदलाचे वर्गीकरण सहा ऋतूत केले आहे. वर्षा (जून-जुलै), शरद (ऑगस्ट-सप्टेंबर), हेमंत (ऑक्टोबर-नोव्हेंबर), शिशिर (डिसेंबर-जानेवारी), वसंत (फेब्रुवारी-मार्च), ग्रीष्म (एप्रिल-मे) असे हे सर्वसाधारण वर्गीकरण आहे.


आयुर्वेदामध्ये मानवाच्या प्रकृतीचे वर्गीकरण वात, पित्त व कफ यांचे द्वंद असे केलेले आहे. यालाच ‘पेनोटाइप क्लासिफिकेशन’ असे आधुनिक वैद्यकात म्हटले जाते. वर्षा ऋतूमध्ये वातदोषाचे प्राबल्य वाढते. शरदामध्ये पित्ताचे व वसंत ऋतूमध्ये कफ दोषाचे प्राबल्य वाढते. हे दोष बलवान होणे व क्षीण होणे हे प्राकृतरीत्या शरीरात चालू असते; मात्र एखाद्या ऋतूमध्ये बलवान असलेल्या दोषाचे उद्दीपन करणारा आहार सेवन केल्यास त्या-त्या ऋतूमध्ये विशिष्ट दोषाचे प्राबल्य वाढून व्याधी निर्माण होण्याची शक्यता असते. अशा व्याधी निर्माण होऊ नयेत म्हणून प्राबल्य असणा-या दोषांच्या विरुद्ध गुणात्मक आहार घेणे अपेक्षित असते. या कारणास्तवच पूर्वजांनी आहाराची त्या ऋतूत योजना केलीय.


वर्षा ऋतूमध्ये भूक मंदावते व दुर्बलता असते. म्हणून पचायला हलके अन्न, जुने धान्य अशा पदार्थांचे सेवन वाढवावे. त्याचमुळे वर्षा ऋतूमध्ये (जून-जुलै) कुठलेही सण आढळत नाहीत. या दिवसांत आहार एकदम साधा व गरम असावा व पचायला हलका असावा. वर्षा ऋतू संपल्यावर शरदामध्ये अग्नी उद्युक्त होतो, भूक वाढते व शरीरास पौष्टिक आहाराची गरज भासते. त्यामुळेच श्रावणात (ऑगस्ट) सणवार सुरू होतात; जेणेकरून आपण पौष्टिक आहार घेणे सुरू करतो. (क्रमश:)