रडारला चकवणारे राफेल / रडारला चकवणारे राफेल

दिव्य मराठी

Feb 10,2012 09:50:18 PM IST

भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात कोणते लढाऊ विमान येईल हे स्पष्ट झाले आहे. फ्रान्सचे राफेल लढाऊ विमान 50 हजार कोटींत देण्याचा सौदा झाला आहे. 126 मध्यम आणि ‘मल्टिरोल’ लढाऊ विमानाची पूर्तता फ्रान्सची दसोल्ट कंपनी करणार आहे. संरक्षण मंत्रालयाने सर्व प्रकारचे कठोर परीक्षण केले. त्यानंतर कसोटीला उतरलेल्या राफेल विमानाचा सौदा फ्रान्सच्या नावावर जमा झाला आहे. जगभरातील विमान बनवणा-या कंपन्यांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. शेवटच्या टप्प्यात राफेल विमानाने अमेरिकेच्या एफ-16 आणि एफ-18, रशियाचे मिग-35 स्विडनचे ग्रिपन आणि युरोपियन देशातील युरो फायटरला मागे टाकले. या मोठ्या सौद्यासाठी मोठे देश लॉबिंग करत होते; परंतु केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिकाच घेतल्याने काहीएक उपयोग झाला नाही. फ्रान्सचे राफेल विमान हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करू शकते. याची इंधनाची टाकीही बरीच मोठी आहे. ज्यामुळे दूरचा पल्ला गाठला जाऊ शकतो. स्टील डिझाइन असल्याने हे विमान रडारच्या टप्प्यापासून बाहेर राहते.

X
COMMENT