आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाइल एक्स्टेंशन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


संगणकावरच्या फाइल्सना वैशिष्ट्यपूर्ण एक्स्टेंशन्स असतात. फाइल तयार करण्यासाठी कोणता प्रोग्रॅम वापरला आहे त्यावर ही एक्स्टेंशन्स अवलंबून असतात. फाइल एक्स्टेंशनमुळे संगणकाला या फाइल्सच्या नोंदी ठेवणे खूपच सोपे जाते. फाइल एक्स्टेंशनमुळे संगणकाला आणि वापरणा-या ला कोणता प्रोग्रॅम उघडणार आहे हे सहज कळते. प्रत्येक फाइलला वैशिष्ट्यपूर्ण अक्षरे असल्यामुळे वेगळ्या किंवा चुकीच्या प्रोग्रॅममध्ये या फाइल्स उघडायचा प्रयत्न केला तर त्या उघडणारच नाहीत. उलट तो प्रोग्रॅमच बंद पडण्याची शक्यता असते. फाइलचा शेवटचा भाग असतो त्यावरून फाइल कोणत्या प्रकारची आहे हे समजते. त्यावरून ती फाइल कोणत्या प्रोग्रॅममध्ये उघडणार आहे हे समजते. संगणकाच्या सुरुवातीच्या काळात फाइल्सची नावे सात अक्षरी असत. त्यानंतर पूर्णविराम देऊन तीन अक्षरी कॅरेक्टर्स फाइलचा प्रकार नमूद करत. परंतु 1995नंतर फाइल्सची नावे मोठी/लांब असली तरी चालतात, फाइलच्या नावाच्या शेवटी असणा-या पूर्णविरामानंतर फाइलचे एक्स्टेंशन लिहिले जाते. उदाहरणार्थ ..exe, .jpg, .xls, .doc

फाइल एक्स्टेंशनचा उपयोग काय?
फाइल एक्स्टेंशन्स दोन प्रकारे उपयोगी आहेत. एक तर तुम्हाला डॉक्युमेंट कुठल्या प्रकारचे आहे ते समजते. उदाहरणार्थ फाइलचे एक्स्टेंशन .jpg असेल तर तो फोटो आहे हे समजते आणि .exe असेल तर तो प्रोग्रॅम आहे. तुम्ही डबल क्लिक केल्यावर फाइल एक्स्टेंशनमुळे तुमचा संगणक ती फाइल योग्य प्रोग्रॅममध्ये उघडतो. विंडोजमध्ये ही एक्स्टेंशन्स कधी-कधी झाकलेली असतात. उदा. फोटोचे नाव समजा holidaysnap.jpg किंवा Windows Explorer मध्ये ते दिसेल फक्त holidaysnap. हे एक्स्टेंशन.jpg दिसणार नाही. परंतु जेव्हा या फाइल्सच्या नावांमध्ये एकापेक्षा जास्त पूर्णविराम वापरले जाऊ लागले तेव्हापासून हॅकर्स हे लपलेले एक्स्टेंशन वापरून चुकीचे प्रोग्रॅम त्या जागी वापरू लागले.
तुम्हाला अनोळखी माणसांकडून ई-मेल द्वारे Funphoto.jpg अशी अटेचमेंट मिळाली तर ती कदाचित प्रत्यक्षात Funphoto.jpg.exe असू शकेल. म्हणजे तुम्ही जर ती उघडली तर कदाचित एखादा व्हायरसचा प्रोग्रॅम रन होऊ शकेल.

फाइल एक्स्टेंशन्स सुरक्षित ठेवणे
या पद्धतीच्या हल्ल्यापासून संगणक सुरक्षित ठेवण्याचे काही मार्ग आहेत. सर्वप्रथम विंडोज एक्सप्लोररमध्ये जाऊन फाइल एक्स्टेंशन्स दिसतील असे सेटिंग केले पाहिजे. त्यासाठी 'Folder Options' menu जाऊन 'View' निवडा. आता 'Hide extensions for known file types' येथील ‘बरोबरची’ खूण काढून टाका. नंतर सर्व फाइल एक्स्टेंशन्स पूर्णपणे दिसतील. फाइल एक्स्टेंशन दिसल्यावर फाइल उघडायची की नाही ठरवू शकता. इतके करूनही तुमचा संगणक खरे एक्स्टेंशन वापरून फाइल उघडण्याचा धोका आहेच. त्यामुळे तुम्ही सतत सतर्क राहणे केव्हाही सोयीचेच आहे.

bhagyashree@cyberedge.co.in