आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाइल्स डाऊनलोड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


इंटरनेटवर अगणित फाइल्स डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत. व्हिडिओज, गाणी, फोटो, ऑनलाइन खेळ आणि मोफत सॉफ्टवेअर्स अशा स्वरूपात या फाइल्स डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत. डाउनलोड म्हणजे काय? इंटरनेटवर उपलब्ध असलेला डेटा तुमच्या संगणकावर उतरवणे/डाउनलोड करणे आणि सेव्ह करणे. तुम्ही तुमच्या माउसचा पॉइंटर वेबपानावरच्या लिंकवर नेला तर विशिष्ट खुणेवरून तुम्हाला समजते की फाइल डाउनलोडला उपलब्ध आहे की नाही. त्या लिंकवर नमूद केले असेल की ती कोणत्या प्रकारची फाइल आहे. उदाहरणार्थ गाण्याच्या फाइलचे एक्स्टेंशन असते ...mp3.एखाद्या ‘एक्झिक्युटेबल’ प्रोगॅमचे एक्स्टेंशन असेल.exe.. पण समजा लिंकवर ..htm किंवा ..html असेल तर ते दुसरे वेबपेज आहे, फाइल नाही, असे समजावे.

डाउनलोड कसे करावे?
मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये फाइल डाउनलोड करायची असल्यास, दिलेल्या लिंकवर राइट (उजवे) क्लिक करा. त्याचबरोबर फाइल कुठे सेव्ह करायची हे ठरवण्यासाठी 'save target as' हा पर्याय निवडा आणि फाइल सेव्ह करा. दुसरा पर्याय म्हणजे लिंकवर क्लिक केल्यावर एक पॉपअप चौकोन येईल आणि विचारेल “Do you want to save or run this file?तिथूनही सेव्ह करून वर सांगितल्याप्रमाणे फाइल सेव्ह करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फाइलचे नावही बदलू शकता. काही फाइल्सना इतकी विचित्र नावे असतात की नंतर तुम्हाला आठवणे मुश्किल होते की कशासाठी तुम्ही ही फाइल सेव्ह केली आहे. नावं बदलताना मात्र फाइलचे तीन अक्षरी एक्स्टेंशन जसे pdf, .exe, .zip अजिबात न बदलण्याची खबरदारी घेतली गेली पाहिजे.

फाइल कुठे सेव्ह करावी?
फाइल डेस्कटॉपवर सेव्ह करू नये. त्यामुळे डेस्कटॉपवर गर्दी होते. त्यामुळे डाउनलोडचे वेगळे फोल्डर करून त्यामध्ये अशा फाइल साठवाव्यात. वेळोवेळी या फोल्डरचा आढावा घेऊन नको असलेल्या फाइल्स डिलिट कराव्या आणि हव्या असलेल्यांचा बॅकप घ्यावा. तुम्ही सिनेमासारख्या मोठ्या (जास्त टइ च्या) फाइल्स डाउनलोड करणार असाल तर फाइल मॅनेजरचा उपयोग करणे केव्हाही चांगले. त्याद्वारे तुम्हाला किती डेटा आणि वेळ राहिलेला आहे हे सहज समजते. फाइल्स डाउनलोड करताना तुमच्या संगणकावर अँटिव्हायरस सॉफ्टवेअर असणे अत्यंत आवश्यक आहे.
shree@marathiworld.com