Home | Magazine | Kimaya | fingerprint oven coffee

फिंगरप्रिंटनुसार आवडीची कॉफी

प्रतिनिधी | Update - Aug 10, 2012, 10:25 PM IST

सॅको जॅलिसिस नावाची मशीन तसे पाहू जाता कॉफी मशीनसारखीच आहे.

 • fingerprint oven coffee

  सॅको जॅलिसिस नावाची मशीन तसे पाहू जाता कॉफी मशीनसारखीच आहे. पण प्रोफाइलनुसार वेगवेगळ्या स्वादाची कॉफी बनवण्याचे तंत्र हे या मशीनचे वैशिष्ट्य आहे. फिलिप्स कंपनीद्वारे विकसित या मशीनमध्ये सहा लोक आपला प्रोफाइल बनवून आपल्या नावाने नोंद करू शकतात. उदाहरणार्थ : कॉफी कडक हवी की साधारण, दुधाचे प्रमाण किती असावे, क्रीम चालते का? यासारखी माहिती आपल्या प्रोफाइलमध्ये असावयास पाहिजे. त्यानंतर प्रत्येक वेळी तुमचे फिंगरप्रिंट जुळताच मशीन त्या व्यक्तीच्या आवडीची कॉफी तयार करेल. व्हरायटी म्हणून ही मशीन कॉफीचे 9 फ्लेव्हर नोंदवते.
  वैशिष्ट्यपूर्ण सुविधा : याच्या वरच्या हिश्शातील पॅनल कॉफी मगाला गरम करतो. कारण त्यात कॉफी ओतताना ती थंड होणार नाही. इतकेच नव्हे तर मशीन आपली स्वच्छता स्वत: ठेवते.
  दुस-यासाठीसुद्धा कॉफी बनवता येते : तुम्हाला जर कॉफी बनवता येत नसेल तर काळजीचे काही कारण नाही. या मशीनला प्रोफाइल एक्झिट कमांड मिळताच तुमच्या आवडीची कॉफी कशी बनवायची याच्या सचित्र पाय-या दाखवते. त्या पाहून तुम्ही कॉफी बनवू शकता.
  कोठे मिळते? : अशी अनोखी कॉफी मशीन अमेझॉन डॉट कॉमद्वारे विक्रीसाठी लवकरच उपलब्ध होत आहे.
  मूल्य : अंदाजे 1,48, 139 रुपये

Trending