अमेयचा फायर फायटर / अमेयचा फायर फायटर रोबो ...

मोहिनी घारपुरे

Feb 10,2012 09:49:18 PM IST

कोलकात्यामधील एका मोठ्या हॉस्पिटलला आग लागल्याची बातमी सुमारे एक -दीड महिन्यापूर्वी टीव्हीवर पाहून नाशिकमधील रचना विद्यालयात आठव्या इयत्तेत शिकत असलेल्या अमेय नेरकरचं मन हेलावलं. हॉस्पिटलमधील अनेक लोक त्या आगीच्या लपेट्यात सापडलेच; परंतु अग्निशमन दलाचे लोक देखील इतर लोकांना वाचवताना मृत्युमुखी पडले. या घटनेवर विचार करताना अमेयला वाटले की, आपण या लोकांसाठी काहीतरी करावे म्हणून त्यानी फायर फायटर रोबो तयार केला.
अशा प्रकारचा रोबो बनवणा-या अमेयला नुकत्याच झालेल्या नाशिक जिल्हा व तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आलेले आहे. तसेच अग्निशमन दलाच्या अधिका-यांकडूनदेखील या रोबोची प्रशंसा करून तसे प्रमाणपत्र देण्यात आले. आता या रोबोचे पेटंट मिळावे यासाठी तो प्रयत्न करत आहे.
आगीच्या ज्वाळांना स्वत: तोंड देत वीरमरण पत्करणा-या अग्निशमन दलाच्या लोकांसाठी हा फायर फायटर रोबो वरदानच ठरेल. आगीच्या तोंडी स्वत: जाण्यापेक्षा या रोबोला आगीच्या ठिकाणी सोडून त्याच्या माध्यमातून पाण्याचा फवारा करता येऊ शकतो. तसेच रोबोवर लावलेल्या कॅमे-याच्या माध्यमातून आगीच्या ठिकाणची आतली परिस्थिती नेमकी कशी आहे, कोणी आगीत होरपळत पडलेले नाही ना हे स्क्रिनवर दिसू शकते.
अशा प्रकारचा रोबो बनवणा-या अमेयला नुकत्याच झालेल्या नाशिक जिल्हा व तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. तसेच अग्निशमन दलाच्या अधिका-यांकडूनदेखील या रोबोची व अमेयच्या कल्पकतेची प्रशंसा करण्यात आली आहे. तशा प्रकारचे प्रमाणपत्र देखील अग्निशमन दलाच्या प्रमुखांकडून अमेयला देण्यात आले.
असा आहे रोबो
* एक्स, वाय आणि झेड अशा तिन्ही डायरेक्शन्सना या रोबोची हालचाल होते.
* रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने हा रोबो चालवता येतो व तसेच तो कुठेही नेता येईल अशा प्रकारे तयार केलेला आहे.
* केमिकल फायर, शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग अशा प्रकारच्या आगीला विझवण्यासाठी हा रोबो वापरण्यात येतो.
* यावर बसवण्यात आलेल्या स्प्रिंकलरमुळे आगीच्या ठिकाणी असलेले तापमान कमी करण्यास मदत होते.
* वॉटर जेटद्वारे पाण्याचा फवारा होतो.
* कॅमे-याच्या साहाय्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी आग लागलेल्या ठिकाणची नेमकी परिस्थिती कशी आहे ते कळू शकते.
* लेझर लाइटच्या साहाय्याने धुरातूनही कॅमे-याच्या साहाय्याने घटनेच्या ठिकाणचे चित्र थेट दिसू शकते.
* सायरनमुळे घटनास्थळी अडकलेल्या लोकांना आग शमवली जात असल्याचा दिलासा मिळतो व घबराट टळते.
* स्मोक डिटेक्टरमुळे आगीचा प्रकार कोणता आहे तो समजण्यास अग्मिशमन दलाच्या लोकांना मदत मिळू शकते.

X
COMMENT