Home »Magazine »Rasik» Football And You

फुटबॉल आणि आपण

अर्चना पाटील | Oct 08, 2017, 02:26 AM IST

  • फुटबॉल आणि आपण
सहा ऑक्‍टोबर पासून सुरू झालेल्‍या फिफा वर्ल्‍डकप मूळे भारत फुटबॉलमय करण्‍याचा प्रयत्‍न चालू आहे. फुटबॉलच्‍या निमित्‍ताने सर्वच खेळांकडे भारताला वळवण्‍याचाही प्रयत्‍न होतो आहे. फुटबॉल म्‍हटलेकी रोनाल्‍डो आणि लियोनेल मेस्‍सी ही नावेसारखी सारखी कण्‍यासारखी वाटतात. भारत आणि फुटबॉल म्‍हटलेकी, बायचुंग भुतियाचेच नाव पहीले डोक्‍यात येते. क्रिकेट म्‍हटले तर टिमची नावे तर माहीती असतात पण राखीव प्‍लेयर, कोच, बीसीसीआयचे अध्‍यक्ष‍, अॅम्‍पायरची नावे सर्व काही गल्‍ली पासून दिल्‍ली पर्यंत सगळ्यांना पक्‍के माहिती असते. सुनिल छेत्री आपला इंडीयन फुटबॉल टिमचा कँप्‍टन किती जणांना गल्‍लीगल्‍लीत माहीती असेल यांत शंका आहे. भारतात फूटबॉलसाठी जी ड्युरान्‍ड कप स्‍पर्धा घेतली जाते ती जगातील जूण्‍या फुटबॉल स्‍पर्धांमधली तीन नंबरची स्‍पर्धा आहे. हेही आपल्‍याला माहिती असणे आवश्‍यक आहे. सहा ऑक्‍टोंबर ते अठ्ठावीस ऑक्‍टोबर २०१७ पर्यंत फिफा कुमार विश्‍वचषक स्‍पर्धेचा थरार आपण अनुभवणार आहोत. या काळात एकूण ५२ मँचेस होणार आहेत. भारतातील नवी मुंबई, कोलकाता, गोवा, कोची, गूवाहाटी आणि दिल्‍ली या सहा शहरांमध्‍ये या मँचेस होणार आहेत. फुटबॉलचे माहेरघर म्‍हणून ओळख असणा-या कोलकाता शहरातील सॉल्‍ट लेक स्‍टेडीयमला अंतिम लढतीचे नियोजन आहे. "कर के दिखलादे गोल", अशा आशयाचे २०१७ फिफा विश्‍वचषकाचे थीम सॉन्‍ग आहे.

मुख्‍य प्रशिक्षक लुईस नॉर्टन डी मँटोस यांनी शक्‍कल लढवली. खेळांडूचेअंतर्गत मतदान घेऊन भारताचा कर्णधार निवडलेला आहे. या प्रितक्रयेत मणिपूरचा मध्‍यमरक्षक अमरजितला सर्वाधिक मते मळून तो फिफा कुमार विचषकासाठी भारताचे
प्रतिनिधीत्‍व करेल. या विश्‍वचषकात फुटबॉलचे माहेरघर असलेला ब्राझील आणि कार्यशाळा असलेला स्‍पेन यांच्‍यातील संघर्ष आपल्‍याला पहायला मिळणार आहे.

पाश्‍चीमात्‍य देशातील खेळांडूच्‍या यशाच्‍या गमकाचा शोध घेतला असता बालपणापासूनच क्रिडा नैपुण्‍यतेचा शोध घेऊन तंत्रशुध्‍द क्रिडा प्रशिणातून हे खेळाडू आपला विक्रम प्रस्‍थापित करीत आहे असे निदर्शनास येते. त्‍यामुळे भारतातील मुलांनाहीमोबाईल आणि कार्टूनच्‍या जाळ्यातून बाहेर काढून मैदानांवर आणि याची नैतीक जबाबदारी आपली आहे. भारतात होणा-या फिफा कुमार विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या निमित्‍ताने नाशिक विभागाचे सन्‍माननीय विभागीय आयुक्‍त महेश झगडेयांनी नाशिक विभागांतर्गत येणा-या पाच जिल्‍ह्यात चला खेळूया हा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमात शाळास्‍तरापासून ते विभाग स्‍तरापर्यंत नर्सरी ते आठवीच्‍या मुलांच्‍या क्रिडा घेतल्‍या जाणार आहेत. या उपक्रमाचा उद्देश केवळ प्रयेक बालकाला खेळण्‍याची संधी दिली गेली पाहिजे असा आहे. नाशिक, विभागातील मुलांसाठी ही मेजवानीच राहणार आहे.

फिफा कुमार विचषकाच्‍या निमित्‍ताने पंधरा सप्‍टेंबर हा दिवस महाराष्‍ट्र शासनाने महाराष्‍ट्रा मिशन, वन मिलीअन म्‍हणून साजमरा केला.? यासाठ? ३३,००० शाळांमध्‍ये एक लाख फुटबॉलांचेवाटप करण्‍यात आले.एका शाळेला तीन फुटबॉल याप्रमाणे वाटप करण्‍यात आले. पंधरा सप्‍टेंबरला दहा लाख मुले आणि मुली फुटबॉल खेळतील असे नियोजन करण्‍यात आले होते. जिल्‍हास्‍तरावर, शाळाशाळांमध्‍ये फुटबॉलच्‍या मँचेस खेळल्‍या गेल्‍या. फिफा कुमार विचषकामुळेहा फुटबॉल ग्रामीण भागातील जिल्‍हा परीषद शाळांमध्‍ये येऊन पोहोचला. फुटबॉलचे नियम माहीत नाहीत, खेळाडू कती? यायचेतेही माहीत नाही. फक्‍त एक फुटबॉल होता. छोटी छोटी मुले त्‍याला पायाने लाथाडत होती आणि जिद्दीने त्‍याच्‍या मागे मैदानावर इकडून तिकडे पळत होती. काय आनंद होता त्‍यांच्‍या चेह-यावर. अवर्णनीय. मुलिंना गुरूजी रिंगण करून गोलमध्‍येच खेळा असे सांगत होते. पण मुलीपण आम्‍ही सुध्‍दा फुटबॉलला लाथाडणारच असा हट्ट करू लागल्‍या. मुलींनीपण फुटबॉल मागे पळण्‍याचा मनसो आनंद लुटला. ते पळत होते. एकमेकांच्‍या अंगावर पडत होते. मध्‍येच फुटबॉल हातात उचलून घेत होते. त्‍या बॉलला लाथ मारण्‍यासाठी ते आसुसलेले होते. पहीलीची मुलेपण? याला केवळ हात लाऊन आनंदाने उड्या मारीत होते. पण ते खेळत होते. त्‍यावेळी त्‍यांना पाहुन खरेच माझा भारत फुटबॉल खेळतोय अशी भावना मनात येत होती.
फिफा कुमार विचषकाच्‍या निमित्‍ताने फुटबॉल ची लोकप्रियता वाढणार आहे आपण क्रिडा प्रेमी समाज निर्मीती होण्‍यास हातभार लागेल ही बाब फुटबॉल साठी भारतात निश्‍चीतच आशादायी आहे.
- अर्चना पाटील, अलमनेर, archup412@gmail.com

Next Article

Recommended