आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे क्षेत्र : फॉरेन्सिक अकाउंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि इनसेस्टिगेशन स्किल्सच्या मिश्रणातून तयार अभ्यासास स्पेशालिटी फॉरेन्सिक अकाउंटिंग संबोधले जाते. अकाउंटिंगच्या या शाखेअंतर्गत कायदेशीर वादात अडकलेल्या फर्म्सना क्लाइंट्सच्या आर्थिक दस्तऐवजाच्या कायदेशीर चौकशी आणि विश्लेषणाची कामे दिली जातात. फोरेन्सिक अकाउंटिंगमध्ये करिअर करण्यासाठी बिझनेसचे आर्थिक बारकावे जाणणे आणि भारताची कायदेशीर व्यवस्था समजणे आवश्यक आहे.
पात्रता :
पदवीसह तीन वर्षांचा व्यावसायिक अनुभव तसेच इंडिया फॉरेन्सिक सेंटर ऑफ स्टडीजच्या सर्टिफाइड फोरेन्सिक अकाउंटिंग प्रोफेशनल(सीएफएपी) परीक्षा कमीत कमी ७५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असावी.
अभ्यासक्रम :
फोरेन्सिक अकाउंटिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्ससोबत सर्टिफाइड अँटी - मनीलाँन्ड्रिंग एक्सपर्ट, सर्टिफाइड बँक फोरेन्सिक अकाउंटिंग आणि सर्टिफाइड व्हिजिलन्स अँड इनव्हेस्टिगेशन एक्सपर्टसारख्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
प्रवेश प्रक्रिया :
भारतात सीएफएपीची परीक्षा इंडिया फोरेन्सिककडून घेतली जाते आणि फोरेन्सिक अकाउंटिंग रिसर्च फाउंडेशनच्या नियमानुसार त्यावर नियंत्रण केले जाते.
संधी :
स्पेशलाइज्ड ऑडिट, आर्थिक गुन्ह्यांची चौकशी, कर आढावा-चौकशी व आर्थिक प्रकरणात कायदेशीर मदतीशी संबंधित कामे करणाऱ्या बड्या अकाउंटिंग फर्म्समध्ये फोरेन्सिक अकाउंटंट्सना मागणी आहे. या व्यावसायिकांना घटस्फोट, व्यापारी दुर्लक्षाची आर्थिक प्रकरणे, चौकशीतील दावे आणि खासगी नुकसानीच्या प्रकरणात त्यांना आपली भूमिका बजावावी लागते. व्यापारी संस्था, नॉन-प्रॉफिट संस्था(जिथे सरकारी व कायदा लागू करणाऱ्या संस्था आहेत), इस्टेट्स व फोरेन्सिंग अकाउंटिंग सर्व्हिसेसला आवश्यक असते अशा कामात संधी आहे.
कोर्स कुठून करावा
- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स आॅफ इंडिया, नवी दिल्ली
- आयसीएफएआय, पश्चिम त्रिपुरा
- इंडिया फोरेन्सिक, पुणे
बातम्या आणखी आहेत...