आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Free Antivirus Must For Every Computer These Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्री ऍन्‍टीव्‍हायरस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक काळ होता तेव्हा असं म्हटलं जायचं की कॉम्प्युटर काळाची गरज आहे; पण आता याहीपुढे म्हणायला हवं की इंटरनेट ही काळाची गरज झालेली आहे. कारण त्यामुळे एका क्लिकसरशी तुमचा जगाशी संपर्क होतो आणि अनेक गोष्टी कळू शकतात. जसे या माध्यमाचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. त्याचा एक भाग म्हणजे व्हायरस, स्पॅम्स, मालवेअर इ.. त्यामुळे आज ज्याच्याकडे कॉम्प्युटर आहे त्याने त्या कॉम्प्युटरमध्ये एकतरी अँटिव्हायरस घालणं गरजेचं झालेलं आहे.
तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर तुम्हाला चांगला अँटिव्हायरस गरजेचा असतो; परंतु घरच्या घरी, कमी वापर असणार्‍या कॉम्प्युटरसाठी 'अव्हास्ट' या कंपनीचे फ्री व्हर्जन उपलब्ध आहे. या फ्री व्हर्जनशिवाय प्रो अँटिव्हायरस आणि इंटरनेट सिक्युरिटी असे दोन पेड व्हर्जन्सही उपलब्ध आहेत. आपापल्या वापरानुसार व आíथक कुवतीनुसार तुम्ही आवश्यक व्हर्जन्स घेऊ शकता.
घरचा किंवा वैयक्तिक कॉम्प्युटर तुम्ही मेल चेक करणे, सोशल साइट्सवर जाणे व इतर कामे करणे अशा कारणांसाठी वापरात असाल तर फ्री व्हर्जन सोयीस्कर आहे. यामध्ये मुख्यत: व्हायरस, मालवेअर ब्लॉक्ड केले जातात. (नेट बँकिंग किंवा तत्सम कारणासाठी कॉम्प्युटरचा वापर होत असल्यास मात्र इंटरनेट सिक्युरिटीसारखा चांगल्या कंपनीचा अँटिव्हायरस घेणं आवश्यक आहे याची नोंद घ्यावी!) सध्या avast.com या साइटवर अव्हास्ट 7 चे वर उल्लेखलेले तीन व्हर्जन्स उपलब्ध आहेत. त्यापैकी फ्री व्हर्शन हे साधारणत: 60 एमबीच्या आसपास असून त्याचा सेट अप डाऊनलोड करा. त्यानंतर त्यावर डबल क्लिक केल्यावर सेट अप रन करा. त्यानंतर अव्हास्ट इन्स्टॉल होईल. अव्हास्टचा मुख्य फायदा म्हणजे त्याचे अपडेट्स लहान म्हणजे कमी साइजचे असतात. त्यामुळे तो अपटेड व्हायला फारसा वेळ लागत नाही. तसेच एखादा व्हायरस सापडल्यास तो ब्लॉक केला जातो आणि तसा ऑडिओ मेसेज लगेचच आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसतो. त्यावर क्लिक केल्यावर तो डिलिट करायचा किंवा चेस्टमध्ये न्यायचा हे कळतं. डिलिट केल्यावर ती फाइल नष्ट होते तसेच त्याची एक कॉपी अव्हास्टच्या डेटाबेससाठी पाठवली जाते.
हा अँटिव्हायरस इन्स्टॉल केल्यावर त्याचं फ्री रजिस्ट्रेशन करता येतं. तुम्ही ऑनलाइन असाल तर लगेचच रजिस्ट्रेशन करता येतं; परंतु ऑफलाइनही रजिस्ट्रेशन करता येईल. तुमचा ई-मेल आयडी दिल्यावर रजिस्ट्रेशन नंबर विशिष्ट वेळात मेल केला जातो. एकदा केलेलं रजिस्ट्रेशन एक वर्षासाठी पुरतं. त्यानंतर तुम्हाला ही सेवा पुन्हा रजिस्ट्रेशन करून वापरता येते किंवा विकतचं व्हर्शनही घेता येतं. फ्री व्हर्शन व्हायरस आणि स्पायवेअर ब्लॉक करायचं काम करते, तर अँटिव्हायरस प्रो व इंटरनेट सिक्युरिटीमध्ये इतरही अनेक सुविधा देण्यात आलेल्या आहेत. यात सँड बॉक्स, ई-मेल स्कॅनिंग