आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फंक्शनल इंग्लिश’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक



कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर काय तर स्पर्धा परीक्षा वा प्राध्यापकपदासाठी झटणे एवढेच सीमित उत्तर मिळते. त्यातच मराठी माध्यमातून बीए करणा-या ना इंग्रजी भाषा न येण्यामुळे ब-या च अडचणींना सामोरे जावे लागते. इंग्रजी या आंतरराष्ट्रीय भाषेचे महत्त्व आजच्या काळात वादातीत आहे. तरी व्यावहारिक इंग्रजी यावी यासाठी गलेगठ्ठ फी असणा-या स्पोकन इंग्लिशच्या वर्गाचा विशेष उपयोग होतोच असे नाही. त्यामुळे कॉलेजच्या अभ्यासक्रमातच व्यावहारिक इंग्रजीचे ज्ञान मिळावे याकरिता पुणे विद्यापीठाच्या बीए अभ्यासक्रमासाठी ‘व्होकेशनल एज्युकेशनच्या ट्रॅव्हल्स अँड टुरिझम’ला समांतर असा 3 वर्षांचा ‘फंक्शनल इंग्लिश’चा कोर्स सुरू आहे. यात विद्यार्थ्यांना आपल्या ऐच्छिक विषयांबरोबरच हा कोर्स निवडता येतो.

इंग्रजी भाषेसंबंधित शैलीचा विकास करणे, नवीन करिअरच्या संधी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक गुणवत्ता आणणे हा या कोर्सचा उद्देश आहे. ज्याद्वारे कला शाखेचे विद्यार्थी भाषेशी संबंधित क्षेत्र जसे की पत्रकारिता, जाहिरातक्षेत्र, मुक्त पत्रकारिता, भाषांतर, टेक्निकल रायटिंग, रेडिओ-टीव्ही क्षेत्र अशा ब-या च क्षेत्रात आपली वेगळी वाट निवडू शकतात. प्रात्यक्षिके, क्लासरूम अ‍ॅक्टिव्हिटी, वार्षिक परीक्षा असे या कोर्सचे साधारण स्वरूप आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना या कोर्सचा खूप उपयोग होऊ शकतो.

बीएच्या प्रथम वर्षी रिमिडिअल इंग्लिशमध्ये शब्दसंग्रह वाढवणे, शब्दांचा योग्य उच्चार करणे, व्याकरण मजबूत करणे याचा अभ्यास करण्यात येतो. विद्यार्थ्यांचा मनोरंजनातून अभ्यास व्हावा यासाठी वर्गात भाषिक खेळ, ग्रुप डिस्कशन, वादविवाद, वृत्तवाचन, जाहिरात तयार करणे, एकपात्री अभिनय अशा मनोरंजक माध्यमातून इंग्रजीचा जास्तीत जास्त वापर कसा केला जाईल याकडे लक्ष दिले जाते. या माध्यमांच्या वापरामुळे इंग्रजीविषयीची भीती नाहीशी होते, आत्मविश्वास जागा होतो आणि व्यक्तिमत्व विकासास मदत होते.
बीएच्या द्वितीय वर्षात ‘अ‍ॅडव्हान्स रायटिंग स्कील’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया’ची ओळख हा विषय असतो. त्यामध्ये आकाशवाणी, टीव्ही या क्षेत्रात भाषेचा उपयोग कसा होतो, वृत्तांत लेखन, बायोडेटा लेखन, परिच्छेद लेखन, पत्रलेखन, बिबिलियोग्राफी लेखन याचा समावेश होतो. विविध प्रसंगांमध्ये बोलताना व्हॉइस क्वालिटी कशी असावी, देहबोली कशी असावी, कार्यक्रमांचे सूत्रसंचालन कसे करावे, पॅनल डिस्कशन कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचबरोबर आकाशवाणी, न्यूज चॅनलसारख्या ठिकाणी क्षेत्रभेट देण्यात येते. तसेच ऑ न द जॉब ट्रेनिंग ही सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांना भाषेचा उपयोग होईल अशा ठिकाणी काही काळासाठी अनुभव मिळविण्याकरिता नोकरी करण्यासाठी संधी मिळते. स्क्रॅपबुकमधून विद्यार्थ्यांची संशोधनासाठीची प्राथमिक तयारी करून घेतली जाते.
तृतीय वर्षामध्ये प्रिंट मीडियाची ओळख करून देण्यात येते. वृत्तलेखन, पुस्तक परीक्षण, चित्रपट परीक्षण शिकवण्यात येते. त्यासाठी विविध विषयांवरील इंग्रजी चित्रपट दाखवण्यात येतात. कॉलेजच्या मासिकासाठी विद्यार्थ्यांकडून लेखही लिहून घेतले जातात. माहितीच्या अधिकाराचा वापर कसा करावा याचीदेखील माहिती देण्यात येते. आंत्रप्रेन्युरशिप डेव्हलपमेंटच्या पेपरमधून उद्योग क्षेत्राची ओळख, कायद्याच्या बाबी समजावल्या जातात. एखाद्या विषयावर प्रोजेक्ट रिपोर्टदेखील विद्यार्थ्यांना सादर करावा लागतो. तसेच एक छोटेखानी संशोधनपर थिसिसदेखील लिहावा लागतो तोही इंग्रजीतून. या तीन वर्षात साध्या साध्या ट्रान्सस्क्रिप्शन्सपासून निबंधापर्यंत, प्रोजेक्ट रिपोर्टपासून शोधनिबंधापर्यंत विद्यार्थ्यांचा इंग्रजी पक्के होण्याचा प्रवास घडवून आणण्यात येतो मग स्पोकन इंग्लिशच्या कोर्सची गरजही उरत नाही.

असा वेगळ्या धाटणीचा कोर्स विद्यार्थ्यांना रोचक वाटतो. शिवाय या कोर्सचे मिळणारे प्रमाणपत्रदेखील भविष्यात नोकरीसाठी उपयोगात येऊ शकते. कॉर्पोरेट जगतात या कोर्समध्ये ट्रान्सस्क्रिप्शनद्वारा शिकवल्या जाणा-या प्रोनाउन्सिएशन स्कीलचा उपयोग करता येतो. चाऊसची डिक्शनरी आणि ऑ क्सफर्डची लर्नर्स डिक्शनरी या कोर्सकरिता कामात येते तसेच ऑ डिओ कॅसेट्सचादेखील या कोर्सकरता उपयोग होतो. थोडक्यात :
*डिक्शनरीमधल्या ट्रान्सस्क्रिप्शन्सचा शास्त्रशुद्ध उपयोग.
*डिक्शनरीचा पूर्णत: वापर.
*बिबिलिओग्राफीसारख्या बाबींशी परिचय.
*इंग्रजी नाटकांच्या सादरीकरणातून भाषेतील चढउतारांशी, भाषेच्या संस्कृतीशी परिचय,
*निबंधलेखन व वाचनातून भाषा व विचारसमृद्धी
*शोधनिबंधामधून इंग्रजी भाषेतून संशोधन करण्याचे कौशल्य विकसित होते.
*नोकरीच्या ठिकाणी इंग्रजीतून व्यवहार करण्याचे प्रशिक्षण मिळते.
*व्हॉइस कल्चर विकसित होते.