Home | Magazine | Akshara | fund for upcoming writer

नवलेखकांना अनुदान

दिव्‍य मराठी | Update - Dec 30, 2016, 03:00 AM IST

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून २०१७ या वर्षासाठी ज्याचे एकही पुस्तक प्रकाशित झाले नाही अशा नवलेखकांच्या पहिल्या प्रकाशनाला अनुदान देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत

  • fund for upcoming writer
    महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून २०१७ या वर्षासाठी ज्याचे एकही पुस्तक प्रकाशित झाले नाही अशा नवलेखकांच्या पहिल्या प्रकाशनाला अनुदान देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. नवलेखकांना कविता, नाटक, एकांकिका, बालवाङ‌्मय (६४ ते ९६ टाइप केलेली पृष्ठे – ८० कविता), कथा (१२८ ते १४४ टाइप केलेली पृष्ठे – ४५००० शब्द), नाटक/एकांकिका (६४ ते ९६ टाइप केलेली पृष्ठे – २८००० शब्द), कादंबरी (१२८ ते १४४ टाइप केलेली पृष्ठे – ४५००० शब्द), बालवाङ‌्मय (६४ ते ९६ टाइप केलेली पृष्ठे – २८००० शब्द) वैचारिक लेख, ललितलेख,चरित्र / आत्मकथन, प्रवास वर्णन (१२८ ते १४४ टाइप केलेली पृष्ठे – ४५००० शब्द) या सहा वाङ‌्मय प्रकारातील पहिल्या प्रकाशनासाठी वरील पृष्ठसंख्येच्या मर्यादेतील मुद्रित (टाइप) मजकुराला अनुदान देण्यात येणार आहे. किमान पृष्ठसंख्येपेक्षा कमी पृष्ठसंख्येचे मुद्रित पाठविल्यास सदर मुद्रिताचा या योजनेत विचार केला जाणार नाही. नवलेखकांनी आपले अप्रकाशित साहित्य मुद्रित स्वरूपात (टाइप केलेल्या) पाठवून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे. नवलेखकांनी त्यांचे साहित्य दिनांक १ ते ३१ जानेवारी, २०१७ या कालावधीत पुढील पत्त्यावर पाठवावे. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई ४०००२५ दूरध्वनी क्रमांक ०२२- २४३२५९३१. या योजनेसाठीचे माहितीपत्रक, विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर तपशील मंडळाच्या http://msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे

Trending