Home | Magazine | Kimaya | g mail id password leak in america yahoo

तुमचा 'GMail' धोक्यात ! त्याचा असा करा बचाव

वृत्तसंस्था | Update - Jul 20, 2012, 11:42 PM IST

माहिती तंत्रज्ञान मानवी जीवनाचे अविभाज्य अंग बनत चालले आहे.

  • g mail id password leak in america yahoo

    माहिती तंत्रज्ञान मानवी जीवनाचे अविभाज्य अंग बनत चालले आहे. ई-मेल, इंटरनेट आदींचा वापर करणा-या यूजर्सची संख्या आता कोटींच्या घरात पोहचली आहे. त्यात अनेक इंटरनेट कंपन्यांचे पासवर्ड लिक करण्याच्या प्रयत्नात हॅकर्स गुंतले आहेत. याहूच्या लाखों यूजर्सचे पासवर्ड लिक झाल्यानंतर आता जीमेल सह अनेक इंटरनेट कंपन्याचे धाबे दणाणले आहेत.
    अमेरिकन इंटरनेट कंपनी याहूच्या लाखो यूजर्सचे पासवर्ड लीक झाल्यानंतर जीमेल, एओएल, हॉटमेल, कॉमकास्ट, एमएसएन, एसबीसी ग्लोबल, वेरीजोन, बेलसाऊथ आणि लाइव्ह डॉट कॉम वर धोक्याचे ढग जमू लागले आहेत. कारण ज्या सर्व्हरच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे ते याहू व्हाइसचा हिस्सा आहे. आणि याहू व्हाइस नॉन याहू ई-मेल अ‍ॅड्रेस सोबत साइन इनची सहमती देतो.
    याहूचे चार लाख 53 हजार युजर्स आहेत. त्यांचे पासवर्ड लीक झालेले आहेत. त्यांना ते आॅनलाइन पोस्ट करण्यात आले आहेत. स्वत:ला the D33Ds Company म्हणवणा-या समूहाची ही कामगिरी आहे. त्यांनी या गोष्टीची जबाबदारीही स्वीकारली आहे. एका सुरक्षा एजन्सीचे म्हणणे असे की, पासवर्ड रदछ इंजेक्शन अ‍ॅटकद्वारे मिळवण्यात आले आहेत. पासवर्ड लीक होण्याची ही घटना नवीन नाही. यापूर्वीही अन्य एका सोशल नेटवर्किंग साइट लिंकड्‍इनच्या 64 लाख खात्याच्या सुरक्षेबाबत छेडछाड करण्यात आली होती. या घटनेमुळे लिंकड्इनच्या संचालकांना माफी मागावी लागली होती.

Trending