आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणकारी तुळस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नासाने नुकतीच चंद्रावर काही प्रकारच्या वनस्पतींची लागवड व काही बीजांचे बीजारोपण करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यात भारतीय उपखंडात आढळणा-या ‘तुळस’चाही समावेश आहे. आपल्या हिंदू संस्कृतीचे विचारवंत हे कित्येक वर्षांपासून नव्हे, तर युगांपासून किती दूरदृष्टी ठेवतात, हे त्यामुळे पुन्हा प्रकाशात येईल.
मागे भुवनेश्वर येथे 99 वी राष्‍ट्रीय विज्ञान परिषद झाली. तिथे 4 वरिष्ठ शास्त्रज्ञांनी तुळशीचे अनेकविध गुण विज्ञानाच्या कसोटीवरून सांगितले. मुख्यत्वे अणुबॉम्बच्या स्फोटावरून होणारे दुष्परिणाम यावर सर्वात जास्त गुणकारी काय असेल, तर ती तुळसच, अशी शास्त्रज्ञांनी सखोल माहिती दिली. भविष्यकाळात जर अणुयुद्ध झाले, तर आपल्या सैनिकांना बचावासाठी विचार करावा लागेल, त्यासाठी तुळस ही सगळ्यात गुणकारी असल्याचेही त्यांनी सांगितले. तुळस ही बहुगुणकारी औषधी आणि पर्यावरण रक्षक असल्याचेही नेहमीच म्हटले जाते. ही वनस्पती प्रामुख्याने भारतीय उपखंडात आढळते. सर्दी, खोकला, कफ, पडसे, हृदयरोग या शिवाय त्वचारोग यावरही ती अतिशय गुणकारी आहे. आपल्याकडील आयुर्वेदिक औषधीमध्ये तुळशीचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. तुळशीची पाने जर रात्रभर तांब्याच्या भांड्यात पाण्यात भिजवली आणि ते पाणी जर सकाळी रिकाम्या पोटी पिले, तर दमा, मधुमेह व हृदयरोगावर त्याचा चांगला परिणाम होतो. तुळशीच्या मंजूळा यादेखील वात रोगावर आणि विशेषत: महिलांच्या आजारावर खूप गुणकारी ठरतात. उत्तर अमेरिका आणि कॅलिफोर्निया या भागातील ओझोनच्या थराला जेव्हा भगदाड पडले, त्या वेळी संशोधकांनी शीतकरण यंत्र (रेफ्रिजरेटर) व वातानुकूलित यंत्र (ए.सी.)चा अतिवापर, असा निष्कर्ष काढून त्यांना दोषी ठरवले; पण भारतातही या गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. मात्र, भारतात याचे दुष्परिणाम का होताना दिसत नाहीत, याचा जेव्हा परकीय संशोधकांनी अभ्यास केला, तेव्हा त्यांनी खूप धक्कादायक निष्कर्ष काढला. तो म्हणजे भारतात आढळणा-या पाच वनस्पती.
1. तुळस 2. वड 3. पिंपळ 4. उंबर 5. कडुलिंब
यांना प्रकाश संश्लेषणाचा नियम लागू होत नाही. इतर वनस्पती सूर्यप्रकाशात कार्बन डायऑक्साइड घेतात व ऑक्सिजन सोडतात. या पाच वनस्पती मात्र या नियमाच्या वर असून दिवसा अथवा रात्री (सूर्यप्रकाशात व चंद्रप्रकाशात) या केवळ कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन सोडतात. या पाच वनस्पती हिंदू धर्मात पूजनीय आहेत.
तुळशीचे प्रकार
राम तुळस - राम तुळशीचा रंग गडद हिरवा असतो.
कृष्ण तुळस - कृष्ण तुळशीचा रंग काळपट असतो आणि वास राम तुळसीपेक्षा जास्त उग्र असतो.
रान तुळस - रान तुळस ही जास्त करून रानात आढळते, पण तिच्या पानांचा वास अति उग्र असतो. तिच्या मंजुळांचा आकारही मोठा असतो.
अशा तीन प्रकारच्या तुळस आपण पाहतो. या तिन्ही तुळशी कोणत्या ना कोणत्या रोगावर खूप उपयोगी पडतात. महाराष्‍ट्रात तर वारकरी संप्रदाय हा खूप वर्षांपासून तुळशीची माळ गळ्यात घालताना आपण पाहतो.