आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड टेबल टेनिस चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताला दोन सुवर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालम्पूर - भारतीय संघाने शनिवारी एेतिसहासिक कामगिरीची नाेंद करताना वर्ल्ड टेबल टेनिस चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडाकेबाज विजय संपादन केला. भारताचे महिला अाणि पुरुष संघ अवघ्या २४ तासामध्ये सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. भारताच्या संघाने बलाढ्य लक्झेमबर्ग अाणि ब्राझील टीमचा पराभव केला. भारतीय संघाने दुसऱ्या विभागात हे साेनेरी यश संपादन केले.

महिला टीमने लक्झेमबर्गविरुद्ध ३-१ ने एकतर्फी विजयाची नाेंद केली. माैमा दास, मनिका बत्रा अाणि के. शामिनी यांनी सलग विजयाची नाेेंद केली. माैमा दासने काेनब्रुकवर ३-० ने मात केली. त्यापाठाेपाठ मनिकाने टेस्सीचा पराभव केला. तसेच शामिनीने नुट्टीवर मात केली.