आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीग्राम रुरल इन्स्टिट्यूटचे अभ्यासक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीग्राम रुरल इन्स्टिट्यूट, डिंडीगल, तामिळनाडू येथे उपलब्ध असणार्‍या विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागवण्यात येत आहेत-
पदविका अभ्यासक्रम : कृषी विज्ञान विषयातील पदविका.
पदवी अभ्यासक्रम : बीएस्सी - कृषी.
बीए - गांधीयन सोशल वर्क.
बीबीए -रुरल इंडस्ट्रीज अँड मॅनेजमेंट.
बीकॉम - को-ऑपरेशन.
पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम : फलोत्पादन व विक्री विषयातील पदव्युत्तर पदविका.
पदव्युत्तर अभ्यासक्रम : पाच वर्षे कालावधीची डेव्हलपमेंट अ‍ॅडमिनिस्ट्रेशन विषयातील पदव्युत्तर पदवी.

को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, रुरल इंडस्ट्रीज मॅनेजमेंट, रुरल प्रोजेक्ट मॅनेजमेंट, फूड सायन्स, डेव्हलपमेंट अ‍ॅडमिनिस्ट्रेशन यासारख्या विषयांसह एमबीए.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदवी परीक्षेत प्रवेश घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थ्यांनी 10+2 शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ते पदवीधर असावेत व त्यांना कृषी, ग्रामीण विषयांमध्ये आवड असायला हवी.

अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास 225 रु.चा दी गांधीग्राम रुरल इन्स्टिट्यूट डिम्ड युनिव्हर्सिटी यांच्या नावे असणारा व कॅनरा बँक, गांधीग्राम रुरल इन्स्टिट्यूट, गांधीग्राम (कोड नं. 8500) किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया, अंबाथुरल (कोड नं. 3372) येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.

अधिक माहिती व तपशील : यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी दी गांधीग्राम रुरल इन्स्टिट्यूटच्या दूरध्वनी क्र. 0451-2445566 वर संपर्क साधावा अथवा संस्थेच्या www.ruraluniv.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज रजिस्ट्रार, दी गांधी रुरल इन्स्टिट्यूट, गांधीग्राम, 624302 जि. डिंडीगल (तामिळनाडू) या पत्त्यावर पाठवण्याची शेवटची तारीख 24 मे 2013.