आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोशपूर्ण भक्तिरस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘ग्रु व्ही गणेशा’ - गायक, संगीतकार स्वरूप यांचा अनोखा अल्बम. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ‘चिकनी चमेली-शीला-मुन्नी’ अशी गाणी सर्रास वाजत असतात. ही गाणी प्रसंगाशी विसंगत असतात. पण पारंपरिक गाणी लोकांना वाजवावीशी वाटत नाहीत. कारण त्यात ºिहदम नसतो, जोश नसतो, अशी तक्रार असते. यावर विचार करून संगीतकार-गायक स्वरूप भालवणकर यांनी ‘ग्रुव्ही गणेशा’ हा अल्बम आणलेला आहे. जोशपूर्ण भक्तिरस असे या अल्बमचे वर्णन करता येईल. या अल्बममध्ये संगीतातील महारथी उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी एक गाणे गायले आहे. काकड आरतीसारखे हे गाणे आहे. मनात पवित्र भावना जागवणारे याचे बोल असे आहेत : केसरीया किरणों से
पावन हुआ ये जल अंबर
सुनके मधुर बांसुरी सरगम
मगन हुआ हर घर आंगन
तेरे दरस को व्याकुल है मन
अब निद्रा त्यागो भगवन

हे लिहिले आहे स्वरूप यांच्या पत्नी रोशनीने. उस्तादांनी यात ‘मोरया’ हा शब्द वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारला आहे. तौकिफ कुरेशी हे ºिहदमचे उस्ताद. महाराष्टÑातील लोकगीताच्या ºिहदमचा वापर करत यात जुगलबंदी आहे. तौकिफ यांनी तबल्याचे बोल म्हटलेले आहेत, तर लगेच त्याच लयीत स्वरूप यांनी बाप्पाची नावे गायलेली आहेत. हे खूप जोशिले गाणे आहे. लोकल ट्रेनमध्ये आरती गाणारी भजनी मंडळी असतात. या ट्रेनच्या बीटवर आधारित एक गाणे शान आणि स्वरूपने गायलेले आहे. शब्द रोशनी व हेमंत यांचे आहेत. यातील एक गणपतीची आरती डिस्कोमध्ये वाजवता येईल, अशी आहे. ही गायली आहे स्वरूप, अवधूत गुप्ते आणि भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारींनी. चाळीमध्ये राहणारे हिंदी भाषी जसे ‘चलत मुसाफिर मोह लिया रे ’ हे लोकगीत म्हणतात, तसे हे गाणे आहे.

नासिक ढोलच्या ठेक्यावर एक जोशपूर्ण गाणे आहे; ‘एक बार नहीं, कहू सौ बार, तेरी लीला अपरंपार.’ हे गाणे गाण्यासाठी स्वरूपने पाचारण केले तितक्याच जोशपूर्ण व्यक्तिमत्त्वाला अर्थात सचिन पिळगावकर यांना. स्वरूप खान हा एक राजस्थानी लोकगीत गायक. त्यांनी व स्वरूप यांनी मिळून एक गाणे गायले आहे. राग पतियालीचा उपयोग यात केलेला आहे. हनीसिंग हा खरे तर रॅप गाणारा गायक. पण यात त्याने महाआरतीचा माहोल तयार करणारे गाणे गायले आहे, तर बाप्पाचा रॅप गायला आहे स्वरूपने. आणि या रॅपला नाव आहे बाप्पागिरी! उस्ताद गुलाम मुस्तफा खान ते हनीसिंग अशी रेंज असणारा हा अनोखा अल्बम. ‘टाइम्स म्युझिक’तर्फे हा अल्बम लवकरच रिलीज होत आहे. या अल्बमसाठी थर्ड रॉक मल्टिमीडियाचे राज सुरी यांचे पाठबळ लाभले. याचा स्वरूप कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात.
(kuluday@rediffmail.com)