आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकुलती एक मुलगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बऱ्याच दिवसांनी मीराकडे जाण्याचा योग आला. खूप दिवसांपासून तिचा आग्रह होता, पण योग येत नव्हता. परवा मात्र तिचं नवीन घर पाहायच्या निमित्ताने जायचं ठरवलं. तिचा संपूर्ण पत्ता घेऊन मी तिच्या घरी गेले.

अगदी प्रशस्त असा टुमदार बंगला, अंगणात छोटीशी बाग. त्यातच एका बाजूला छोटंसं गणपती व विठ्ठलरुक्मिणीचं मंदिर. त्यासमोर चारपाच जण बसतील असा आेटा. हे सारं पाहात पाहात आम्ही घरात पोहचलो. थोड्याशा गप्पा, फराळपाणी झाल्यावर तिने संपूर्ण घर दाखवण्यास सुरुवात केली. मध्यमागी दिवाणखाना व त्याच्या सर्व बाजूंना एक एक खाेली. आिण साऱ्या खोल्यांचे दरवाजे दिवाणखान्याकडे. मी जरा आश्चर्याने विचारले. पण माझ्या प्रश्नाच्या आधीच तिचे उत्तर तयार होते.
अगं, यातली एक खोली माझी एक सासू-सासऱ्यांची आणि एक माझ्या आईबाबांची. आिण या सर्व खोल्या जोडलेल्या असण्याचे एकमेव कारण म्हणजे सगळ्या खोल्यांमध्ये दिवाणखान्यातून लक्ष देता येते. आता आई-बाबा, सासू-सासरे सगळेजण थकलेत. या साऱ्यांना सांभाळणं माझं कर्तव्य. आणि तुला तर माहीतच आहे, मी एकटीच. आई-बाबांना सांभाळण्याची जबाबदारी माझीच. माझ्याशिवाय त्यांना दुसरं कोण सांभाळणार. आईबाबांनी मला शिकवण्यात कुठेच कमतरता ठेवली नाही.मुलगा-मुलगी भेद केला नाही. त्यामुळे माझ्या लग्नानंतर त्यांना एकटं ठेवणं हे माझ्या विचारसरणीला पटत नव्हतं. त्यामुळे पारंपरिक मानसिकता बाजूला ठेवून सत्य परिस्थितीशी तडजोड करून त्यांनीही इथेच राहण्याचा निर्णय घेतला. कारण ‌वारंवार माझ्या कामाच्या व्यापामुळे मी माहेरी जाऊ शकत नाही. आिण सासू-सासऱ्यांनाही एकटं घरी सोडू शकत नाही. या व्यवस्थेमुळे मला माझी आ‌वड, माझी बाहेरची कामं बिनधास्त करता येतात. त्यांनादेखील चौघांना समवयस्क भेटल्यामुळे त्यांचाही दिवस आनंदात जातो. माझ्या मुलांनादेखील दोन्हीकडच्या आजी-आजोबांचं प्रेम मिळतं. तिच्या या बोलण्याने मी अ‌वाक झाले. किती छान आदर्श तिने समोर मांडला होता. तिचं हे सारं वैभव बघितल्यानंतर माझ्या मनात विचार आला, अजूनही बऱ्याच ठिकाणी मुलगी सासरी गेल्यानंतर तिच्यावरचा आई-वडिलांचा हक्क संपतो असं मानणारी एक पिढी आहे. त्यातल्या त्यात एकुलती एक मुलगी असेल तर काहीजणांनी उतरत्या वयासाठी आर्थिक नियोजन केलेले असते. मग अशा वेळी मनात येते की, मानसिक नियोजनाचे काय. या बदलत्या काळात या साऱ्या प्रश्नांना बाजूला सारून सक्षम नवविचारांची एक पिढी अस्तित्वात आलीय. आिण बऱ्याच कुटुंबात सासरच्या मंडळाचे खास खूप मोठे सहकार्य असतेच. त्यामुळे मुलांची सगळी कर्त‌व्ये मुली छान पद्धतीने व जबाबदारीने पार पाडू शकतात. खरे तर उतरत्या वयात मानसिक आधाराची, माणसांची जास्त गरज असते. जर त्या अपेक्षा आपण पूर्ण केल्या तर साऱ्यांनाच त्याचे समाधान. मीराचं, तिच्या कुटुंबाचं खूप कौतुक वाटलं. मनात आलं, आसपास खरं तर कितीतरी अशी कुटुंबं आहेत. आपल्या मुलींचं उज्ज्वल भविष्य घडवणारे आई-वडील तर आपल्या दोन्हीही कुटुंबाच्या जबाबदारी आहे. आपल्याला स्वत:ला ती समर्थपणे निभ‌वायची आहे. या साऱ्या गोष्टींचा समतोल साधणारी ही पिढी. अनेक अडचणींवर मात करून आनंदाने स्वीकार करणारी ही पिढी. मात्र एकुलत्या एक मुलींच्या आणि त्यांच्या पालकांचा हा सकारात्मक मतप्रवाह सार्वत्रिक व्हायला हवा.
बातम्या आणखी आहेत...