आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधारण दहा पैकी एकाला अपस्मार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपस्मार (एपिलेप्सी, फिट्स, मिरगी किंवा झटके) हा अत्यंत महत्त्वाचा मेंदूचा आजार आहे. या आजारात मेंदूच्या एका भागातून किंवा पूर्ण मेंदूमध्ये अचानक प्रचंड विद्युतलहरी निर्माण होतात, ज्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो. जेव्हा दोनपेक्षा जास्त फिट्सचे अ‍ॅटॅक काही कारण नसताना येतात तेव्हा त्याला अपस्मार जडला असे सांगितले जाते. जगात या क्षणी जवळपास 6.5 कोटी अपस्माराने पीडित रुग्ण आहेत. साधारणात: 10 पैकी एकाला जीवनभरात कधी ना कधी तरी एक फिट येतो.

अपस्माराचे वेगवेगळे प्रकार असतात. काही छोटे तर काही मोठे, काही शरीराच्या एका भागात तर काही पूर्ण शरीरात. काहीमध्ये शुद्ध हरपते, तर काहीत नाही. फक्त दचकल्यासारखं होणं, अचानक भोवताली संबंध तुटून वापस जुळणं किंवा काही मिनिटांसाठी वर्तनुकीत बदल घडणं हे सर्व अपस्माराने होऊ शकते. काही अपस्मार प्रायमरी असतात. अपस्माराचा प्रकार कोणता याची ओळख, प्रत्यक्षदर्शीय अहवाल eeg, CT Scan आणि MRI अशा तपासण्यांची गरज असते.

या आजाराविषयी समाजात खूप अंधश्रद्धा आढळते. भूतप्रेत, जादूटोणा आणि दैवीशक्तीचा प्रकोपामुळे अ‍ॅटॅक येतात असा गैरसमज असतो. आज वैद्यकीय क्षेत्राच्या प्रगतीमुळे नवनवीन औषधी अपस्मारासाठी उपलब्ध आहेत. ती फक्त प्रभावीच नसून त्यांचे दुष्परिणामदेखील कमीआहेत. अपस्माराच्या विविध प्रकारांसाठी वेगळी औषधे असतात. उपचाराचा कालावधी प्रत्येक रुग्णासाठी वेगळा असतो. तो 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे, 5 वर्षांपासून ते आजन्मापर्यंत होऊ शकतो. काही रुग्णांना कित्येक प्रकारची औषधे देऊनसुद्धा अ‍ॅटॅक नियंत्रित होत नाहीत. अशा विशिष्ट निवडक रुग्णांसाठी Epilepsy Surgery (शस्त्रक्रिया) आता भारतात उपलब्ध झाली आहे. जर अचूक निदान आणि बरोबर उपचार तर बहुतांश रुग्ण साधारण जीवन जगू शकतात.